आपली शेती आपली प्रयोगशाळा कापूस शेती जर कमी खर्चात झाली तरच कापूस शेती फायदेशीर ठरेल. कापूस पिकात खर्च कमी करुन उत्पादन वाढीसाठी काय करायला पाहिजे. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #कापूसलागवड #deepakbunge #aplisheteeapliprayogshala
आदरणीय दिपक भाऊ नमस्कार, मेथड कोणतीही असो आदरणीय दादा लाड साहेबांची असो किंवा आदरणीय रामभाऊ चांडक साहेबांची असो तुमच्या मार्गदर्शनामुळे ती सक्सेस होती, मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे आहे खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि ते ही अत्यंत कमी खर्चात ही गोष्ट महत्त्वाची, कारण मुळात कापूस हे पीक परवडत नाही, कमी झालंं तर दहा हजार भाव व जास्त झालं तर चार हजार भाव, त्यामुळे कमी खर्चात योग्य उत्पादन व सखोल मार्गदर्शन तेही वेळोवेळी त्यासाठी आपले मनापासून शतशः आभार 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
काहीजण माझे पीक महाराष्ट्र मध्ये नंबर 1 म्हणून टाकतात पण काय केलं कधीच सांगत नाहीत, परंतु आपण सर्व माहिती सांगून आमच्या ज्ञानात भर घालता भाऊ मनापासून धन्यवाद,
सांगली जिला कापुस बियाने भेटत नाही बियाने कोटुन घायची कोटे भेटतील चांगल बियने व गंगा कावेरी व पंच गंगा भेटल बोंड फार कमी लागले काय करावे मार्ग दर्शन करावे
3/३ वर कपाशी ची लागवड एका ठीकाणी दोन रोप लावली तर झाडांची संख्या ही वाढते व दोन झाडातील अंतर पण चांगले रहाते तेव्हा ही पध्दत चांगली का वाईट व कां ? यावर खुलासा करावा .