प्रस्तावित बरीच आलापी व नंतरचं अभंग गायन यांत साम्य नव्हतं. त्यामुळं प्रथम निर्माण केलेल्या स्वरावकाशाचा स्वरप्रभाव अभंग गायनात घालणं अवघड झालं आणि त्यामुळं श्रोत्यांचा हिरमोड झाला. ...आवाजाची जातकुळी एकदम सुंदर आहे. खरंतर अभंग उठावाला साजेशीच आहे. आलापीचा मोह टाळल्यास परिणाम छान होईल. ............................!! जय हरी विठ्ठल !!
अभंग छान आहे, त्याला नवीन चाल लावून केलेला गाण्याचा प्रयत्नही चांगला आहे. मात्र बुलबुल तरंगाच्या जागी जर संवादिनीची साथ असती तर हाच अभंग अधिक बहरला असता असे वाटते.
थोडक्यात, संवादिनी अभंग गायकाच्या बरोबरीने साथ करीत असते तर बुलबुल तरंग बहुतांशी गायकाच्या सुराचा पाठलाग करताना दिसते. त्यामुळे सुसंगत सुरामध्ये जरा तुटकपणाचा भास होतो असे वाटते. अभिप्रायामध्ये माझे कही चुकले असल्यास क्षमस्व.