Тёмный

"त्यांनी काय नाही लिहिलं!"| Book Bro Episode 82| संवाद: नीलिमा बोरवणकर|डॉ. आशुतोष जावडेकर  

Ashu's Tunes
Подписаться 4,9 тыс.
Просмотров 3,1 тыс.
50% 1

नीलिमा बोरवणकर : ज्यांच्या पहिल्याच संग्रहाला विजय तेंडुलकर यांची अप्रतिम प्रस्तावना प्राप्त झाली होती अशी ही लेखिका. त्यांनी काय नाही लिहिलं? - कधी मच्छीमारांच्या जगाचा अभ्यास करून लिहिलेली कादंबरी, अनेकानेक कथा - कधी तर गे मुलाच्या आईच्या भावना मांडणारी दीर्घकथा, कधी पंचतारांकित हॉटेल संस्कृतीवर ललितेतर पुस्तक, कधी दीडशेहून अधिक त्यांनी घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह, कधी पर्यावरण आणि जंगल यांचा घेतलेला ललित वेध, कधी कुमारवयीन मुलांसाठी कानडी भाषेचा मांडलेला मेळ, आणि आगामी नव्या पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांच्या विलीनीकरणानंतर बदललेलं जग शोध घेऊ बघण्याचं लेखनस्वप्न ( रशियन भाषेची त्यांची पदवी आहेच!)
सकाळी शूटिंगच्या आधी कामांची धावपळ, तसंच पळत गाठलेलं नीलिमाताईंचं घर. आता इथे एकदम शांत माहोल आहे.नीलिमाताई आणि त्यांचे यजमान माझं स्वागत करतात. शूट सुरु होतं. कधी मध्ये फोन वाजतो, कधी बेल, शेवटाला तर माईक तुटतो! पण बोलण्यात खंड पडत नाही, एक लेखिका आयुष्यभर आपण इतकं का लिहिलं, काय लिहिलं, काय घालमेल ते लिहिताना होती आणि या सगळ्या अवघड लेखनयात्रेतून काय गवसलं हे उत्कटपणे मांडत राहते. मी संवाद जोडत जातो इतकंच. अवश्य बघा, शेअर करा बुक ब्रो एपिसोड 82
Dr. Ashutosh Javadekar interviews famous author Neelima Borwankar who speaks on her journey of penning down fiction and non fiction over last 25 years of her literary career.
#ashutoshjavadekar #marathi #books #authorinterviews #BookBro #authors #marathipustak

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 36   
@shobhanatirthali2326
@shobhanatirthali2326 12 дней назад
नीलिमाताई फार छान मुलाखत झाली.आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळात तुम्ही दोनवेळा तुमच्या मुलाखतीवर आधारित व्याख्यानाने प्रभावित केले होते.सकारात्मकता पेरली होती.आजच्या व्याख्यानाने नव्याने कळलात.
@swatiathavale1677
@swatiathavale1677 10 дней назад
सुंदर मुलाखत.. खूप खूप अभिनंदन 🎉
@sunitatillu4281
@sunitatillu4281 10 дней назад
नीलिमा, फार फार आवडली मुलाखत! मुलाखत प्रवाही राहील असे आशुतोषजींचे प्रश्न आणि तुझी अभ्यासपूर्ण व समर्पक उत्तरं....वा! वा!खूप मजा आली! समृद्ध करणारा अनुभव! माझा आनंद मी माझ्या व्यक्तिरेखांमधे उधळून देते आणि मोकळी होते हा तुझा स्वतःच्या लेखनाविषयीचा approach खूप आवडला!तुझ्या अनुभवांची व्याप्ती बघता तुला शतशः नमन! तुझ्यासारख्या व्यक्तीचा स्नेह लाभला हे माझं भाग्य!
@seemanitsure9605
@seemanitsure9605 13 дней назад
फार छान मुलाखत नेहमी प्रमाणे. निलिमा ताईंचं लेखन वाचलं नव्हतं. आता वाचीन. Book bro मुळे अनेक पुस्तकं आणि लेखक कळतात. धन्यवाद
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
मनापासून धन्यवाद !
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
तुम्ही आवर्जून एपिसोड बघून प्रतिक्रिया देता याचा आनंद वाटतो
@aditiabhayrajguru
@aditiabhayrajguru 16 дней назад
खूप छान नीलिमा तुझा प्रवास आणि अर्थात तुझे लेखन ज्याची मी चाहाती आहेच❤
@rajashrimankar5119
@rajashrimankar5119 16 дней назад
बऱ्याच दिवसांनी मी बुक ब्रो चा एपिसोड पाहिला. भावला. निलीमाताईंचे विविध प्रकारच्या अभ्यासपूर्ण लेखनाबद्दल खूप कौतुक. आशुतोष सर तुमच्यामुळे हे पहायला, ऐकायला मिळाले. धन्यवाद. आम्ही मायदेशी, मुले परदेशी ही तर अनेकांची व्यथा असते, माझीही त्यामुळे संवाद जवळचा वाटला.🙏
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
व्हिडिओ बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद राजश्री जी. स्थलांतरीत आणि त्यांचे पालक हा मोठाच विषय आहे... बुक ब्रोचे ताजे काही एपिसोड मस्त रंगले आहेत जरूर बघा. विशेषतः सुनंदा अमरापूरकर यांचा एपिसोड बघितला नसेल तर अगदी नक्की बघा
@leenaborwankar3947
@leenaborwankar3947 15 дней назад
फारच छान 👌 आपल्या घरच्या कोणाची अशी मुलाखत बघायला फार भारी वाटले.
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@asavarikakade684
@asavarikakade684 15 дней назад
छान वाटलं निलीमा बोरवणकरांच्या लेखन प्रवासाविषयी सविस्तर ऐकायला
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
व्हिडिओ बघून आवर्जून प्रतिक्रिया दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद असावरी ताई
@meenagharpure6833
@meenagharpure6833 16 дней назад
खूपच छान झाला episode. 👌👌 निलीमाताई छान मनापासून बोलल्या. त्यांचा नेहमीचा उत्साह या मुलाखतीही जाणवला. निलीमा बोरवणकरांची विविध विषयांवरची वेगवेगळी पुस्तके आहेत हे यातून समजले. आता जमतील तशी वाचीन.
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
त्यांची पुस्तके वेगवेगळ्या विषयांवर असल्यामुळे वाचकांना पर्याय उपलब्ध होतात. प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद मीना मावशी
@AbhivyaktiArt
@AbhivyaktiArt 16 дней назад
लेखनाचा प्रवास छान उलगडत गेला आहे. सुंदर मनमोकळी मुलाखत. मुलं मायदेशीबद्दल बोलताना सांगितलेल्या घटना मन विषण्ण करणाऱ्या आणि त्यावर आशुतोष तुम्ही केलेलं भाष्य हृदयस्पर्शी. रंगभान पुस्तक माझ्याकडे आहे. इतर पुस्तकं मिळवून नक्की वाचेन. बोरवणकरांशी माझं कधी बोलणं झालं नाही पण अमेरिकेतल्या निनाद कथास्पर्धेसाठी त्या, मी रामदास भटकळांसह परीक्षक होतो. - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
व्हिडिओ बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मोहना जी . स्थलांतरितांचे मायदेशी राहिलेले पालक हा खरोखर गंभीर विषय ...
@suneetagadre55
@suneetagadre55 15 дней назад
खूप छान वाटलं. आता पुस्तकं विकत घेणं अनिवार्य झालं. धन्यवाद. 🎉
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ! बुक ब्रो सबस्क्राईब करून अन्य एपिसोड बघावेत ही विनंती 🙏
@prajaktachitre2870
@prajaktachitre2870 16 дней назад
छान च झाला हा एपिसोड आता त्यांची पुस्तक वाचायला आवडतील
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद प्राजक्ता जी
@rahulaphale
@rahulaphale 16 дней назад
सुंदर ! अतिशय ह्रद्य असा संवाद .
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
धन्यवाद राहुल जी
@sps7622
@sps7622 16 дней назад
निजखुण पुस्तकाबद्दल उत्सुकता आहे. छान झालाय व्हिडीओ.
@AshusTunes
@AshusTunes 16 дней назад
मनापासून धन्यवाद ❤
@jyotsnabmc
@jyotsnabmc 16 дней назад
Great त्रिवार वंदन
@AshusTunes
@AshusTunes 16 дней назад
व्हिडिओ प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
@ankitakarle8295
@ankitakarle8295 16 дней назад
वा , छान आहे भाग. 😊
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
धन्यवाद अंकिता
@himanikolhatkar
@himanikolhatkar 16 дней назад
फार छान झाला हा भाग. नीलिमा ताई तुम्हाला माझ्याकडून एक मोठी प्यार की झप्पी. का माहीत नाही पण मला माझ्या आईची आठवण झाली तुमचे बोलणे ऐकताना. मी तुमची काही पुस्तके निजखूण, स्वतः विषयी वाचले आहे. पण आता परत वाचीन गाज पण वाचीन. तुमचा लूक आऊट कळला त्यामुळे आणखी वेगळे काहीसे गवसेल. आणि आशू तू खूपच छान घेतलीस मुलाखत
@AshusTunes
@AshusTunes 16 дней назад
व्हिडिओ बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हिमानी
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 16 дней назад
खुलवंल ताईंना
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
धन्यवाद भारती ताई
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 15 дней назад
पांडुरंग शास्त्री आठवले यांनी मुंबई, गुजरात डहाणू,पालघर येथी मच्छीमार समाजातील स्त्रीपुरूषांशी संपर्क साधून ''परिवर्तन ''कसे घडवले असेल?
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार
@AshusTunes
@AshusTunes 13 дней назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
Далее
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 757 тыс.