Тёмный

Book Bro EP 80 / माई / चरित्र / संवाद : संजय अनंत कुलकर्णी / डॉ. आशुतोष जावडेकर  

Ashu's Tunes
Подписаться 4,9 тыс.
Просмотров 2,4 тыс.
50% 1

कोण होती माई ? कोकणातील सावंतवाडीमधील सिद्धये यांच्या घरातली ही तेज मुलगी. तत्कालीन समाजानुसार झालेला बालविवाह, लगोलग दुर्दैवाने आलेलं वैधव्य, समाजाचा आणि घरच्यांचा विरोध पत्करून धुळ्याच्या प्रागतिक विचाराच्या वकील युवकाशी केलेला पुनर्विवाह, आधी धुळ्यात आणि मग नंतर पुण्यात वाढत आणि विस्तारत गेलेला संसार, गणगोत आणि आप्तस्वकीय. लो. टिळक राहायचे त्या गायकवाड वाड्यात ( टिळकांच्या स्वतःच्या खोल्यांमध्ये!) राहताना सुरु केलेला इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय, सुधीर फडक्यांपासून अनेक नामवंत मंडळींशी असलेला स्नेह, वार्धक्यकाळी आलेलं अपंगपण आणि त्यावरही दुर्दम्य इच्छेने केलेली मात आणि बांधून ठेवलेला स्नेहशील गोतावळा. मरेपर्यंत कालसुसंगत राहिलेली ही लोकविलक्षण व्यक्ती म्हणजे कृष्णा कुलकर्णी उर्फ माई. हा बुक ब्रो चा एपिसोड माईंच्या आयुष्यावर संजय अनंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या अभ्यासपूर्ण आणि उत्तम चरित्रावर आधारित असलेला आहे. संजय अनंत कुलकर्णी यांच्याशी डॉ. आशुतोष जावडेकर यांनी साधलेला संवाद आणि पुस्तकाचं ओघात झालेलं विश्लेषण म्हणजे हा ताजा बुक ब्रो चा एपिसोड 80. तळटीप : पुस्तकाची दुसरी आवृत्ती संपली आहे पण अद्याप ते अमॅझॉनवर उपलब्ध नसल्याने लेखकाचा व्हाट्सअप संपर्क देतो आहे. प्रतीसाठी त्यांना थेट संपर्क करावा. मोबाईल क्रमांक : 9766626040
Book Bro EP 80 has a dilogue with author Sanjay Kulkarni over his recently published book - Mai - a biography of a dynamic woman in last century who lived a courageous life.

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 52   
@umagadgil4102
@umagadgil4102 Месяц назад
'माई ' पुस्तकाला पुरस्कार मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन...कोरोना काळात संजय जी चे रोज सकाळी माई च्या आठवणीने लिहिलेला मेसेज वाचूनच दिवस सुरू व्हायचा आणि काही दिवसातच त्या आम्हा सर्वांच्या 'माई ' झाल्या होत्या.
@kirandeshmukh5221
@kirandeshmukh5221 Месяц назад
खुप सुंदर मुलाख़त 👌👌
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे अन्य व्हिडिओ सवडीने बघावेत ही विनंती.
@vasantmahajan2071
@vasantmahajan2071 Месяц назад
त्याचे शीर्षक...माई तुमची आमची.. !
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@vasantmahajan2071 वाह
@sujatanarsale1693
@sujatanarsale1693 Месяц назад
अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व! अगदी कमाल ! मुलाखत छानच झाली आहे. पुस्तक नक्की वाचणार !
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@sujatanarsale1693 खूप खूप आभार
@vidyadeodhar4780
@vidyadeodhar4780 Месяц назад
मस्त झाला भाग. इंटरेस्टिंग. माझी आजी 2019 मध्ये गेली ती 105 वर्षांची. तिने आपले आत्मचरित्र लिहिले होते. माई जणू माझ्या आजीचीच बहिण.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
काय मस्त प्रतिक्रिया. मनापासून धन्यवाद विद्या ताई
@swati2555
@swati2555 Месяц назад
The best..
@vasantmahajan2071
@vasantmahajan2071 Месяц назад
सुंदर! पुस्तकाचे अभिवाचन Che प्रयोग केले तर माई सर्वांना अधिक भावेल. असे मला वाटते.
@sanjaykulkarni9760
@sanjaykulkarni9760 Месяц назад
खूप छान कल्पना
@ramchandrakhaladkar7145
@ramchandrakhaladkar7145 Месяц назад
माई यांच्याबद्दल माहिती देणारे आणि नवीन पिढीतील लोकांना प्रेरणादायक ठरेल असे पुस्तक लिहिल्याबद्दल धन्यवाद. ❤
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे अन्य व्हिडिओ सवडीने बघावेत ही विनंती.
@pramodbapat289
@pramodbapat289 Месяц назад
माई सभोवतालाचं माहेर झाली....
@sanjaykulkarni9760
@sanjaykulkarni9760 Месяц назад
माननीय रवी जोशी यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले तेव्हा ते म्हणाले,"नवीन राष्ट्रीय शिक्षण शैक्षणिक धोरणात हे पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून नेमले जावे".
@pramodbapat289
@pramodbapat289 Месяц назад
आशुतोषजी, माई हे काय असामान्य व्यक्तिमत्व.. कोरोनाकाळात संजयरावांच्या स्वयंसेवक मित्राने मला एक लेखांक पाठविला होता. पुढे मी संजयरावांशी संपर्क साधला आणि सर्व भाग मिळवले, आमच्या कुटुंबात एकत्र बसून वाचले. आज तुम्ही संजयरावांशी केलेल्या गप्पाष्टकांमधून 'माई' अधिक उमजल्या... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद प्रमोद जी ❤. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे अन्य व्हिडिओ सवडीने बघावेत ही विनंती.
@mugdhadate594
@mugdhadate594 Месяц назад
कुळकर्णी काकांशी माझे सासरे यांची खूप पूर्वीपासून ओळख आहे ,,episod खूप छान आहे.🙏🙏
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे अन्य व्हिडिओ सवडीने बघावेत ही विनंती.
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 Месяц назад
कष्टाळू कै. ति. माईंना सा.नमस्कार
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
😌🙏
@sanjaykulkarni9760
@sanjaykulkarni9760 Месяц назад
'माई' पुस्तक सवलतीच्या दरात घरपोच मिळण्यासाठी ९७६६६ २६०४० या क्रमांकावर WA मेसेज करावा.
@ankitakarle8295
@ankitakarle8295 Месяц назад
कसल्या भारी होत्या माई ❤ छान व्यक्तिमत्त्व ! मी जरूर वाचेन पुस्तक. आमच्या कोकणातल्या त्या होत्या हे ऐकून छान वाटलं. मस्त भाग 😊
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@ankitakarle8295 होय! अगदी कोकणातली ! धन्यवाद अंकिता
@revatiabhyankar6954
@revatiabhyankar6954 Месяц назад
मुलाखतकारानी आपल्या वाणीला थोडा लगाम घालून समोरच्याला जास्तं बोलू द्यावं.असं झालं तर खूप छान झालं असतं.इतकी सुंदर मुलाखत आहे.संपूच नाही असं वाटलं.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
धन्यवाद रेवती जी. या एपिसोडमधे माझ्या पणजीचा विषय असल्याने मीही जास्त बोललो असणार नकळत 😊
@mayakhedikar6219
@mayakhedikar6219 Месяц назад
आशुतोष कृपया मुलाकात घेताना समोरच्याला बोलू द्यावे असे वाटते .तेवढे भान ठेवली तर एकूण कार्यक्रम छान !
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
होय, माया जी. या एपिसोडमधे माझ्या पणजीचा विषय असल्याने मीही जास्त बोललो असणार नकळत 😊
@ajaykulk
@ajaykulk Месяц назад
Excellent. Maiajji cha नातवंडां बरोबर सतत आणि direct संपर्क होता.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खरेच ❤ थँक यू ❤
@vbhosekar61
@vbhosekar61 Месяц назад
Sir you made my Sunday!!😁🙏🙏 ७०/७५ वर्षांपुर्वी इतके बहुआयामी व काळाच्या पुढे असणारया व्यक्तीमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 खुपच प्रेरणादायी मुलाखत. कुटुंबास धरुन ठेवण्याची ताकत व ती ही प्रेमानी ही फार मोठी quality तुमच्या पणजीत होती व मुख्य म्हणजे कतृत्वान ती करारी झाली न्हवती . पुस्तक नक्कीच वाचु.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खूप खूप मनापासून आभार 😍🙏 इतकी मस्त प्रतिक्रिया आहे ही
@minakshipatil1
@minakshipatil1 Месяц назад
अप्रतिम !खूपच आवडला हा भाग ! खूपच प्रेरणादायी ! लवकरच पुस्तक मिळवून वाचते . इतक्या सुंदर कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिल्याबद्दल मनापासून आभार !काळाच्या पुढे असलेल्या 'माईंना ' विनम्र अभिवादन !!❤
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खूप खूप धन्यवाद मीनाक्षी ताई
@shyamtare9119
@shyamtare9119 Месяц назад
अप्रतिम याशिवाय शब्द नाही...❤❤
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
धन्यवाद ❤
@sanjaykulkarni9760
@sanjaykulkarni9760 Месяц назад
'माई' पुस्तक सवलतीच्या दरात घरपोच मिळण्यासाठी ९७६६६ २६०४० या क्रमांकावर WA मेसेज करावा.
@aparnakulkarni7435
@aparnakulkarni7435 Месяц назад
Farach chan...our aji is true inspiration ❤
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@aparnakulkarni7435 indeed! Thank you
@sanjaykulkarni9760
@sanjaykulkarni9760 Месяц назад
'माई' पुस्तक सवलतीच्या दरात घरपोच मिळण्यासाठी ९७६६६ २६०४० या क्रमांकावर WA मेसेज करावा.
@vinayakdravid1341
@vinayakdravid1341 Месяц назад
वा वा , अतिशय सुंदर ❤❤
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
❤❤
@kirandeshmukh5221
@kirandeshmukh5221 Месяц назад
This book is not available on Amazon and where I can get it ?
@sandhyakulkarni730
@sandhyakulkarni730 Месяц назад
खुप छान मस्त. कुठे milal
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
धन्यवाद संध्या जी. व्हिडीओ डिस्क्रिप्शनमधे व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे बघा त्यात
@seemanitsure9605
@seemanitsure9605 Месяц назад
अफलातून episode फक्त माईंचं संपूर्ण नाव सांगायला हवं होतं .
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
कृष्णा कुलकर्णी. खरे आहे, संभाषणात राहिले. Video description मधे मात्र आहे. मनापासून आभार
@sanjaykulkarni9760
@sanjaykulkarni9760 Месяц назад
'माई' पुस्तक सवलतीच्या दरात घरपोच मिळण्यासाठी ९७६६६ २६०४० या क्रमांकावर WA मेसेज करावा.
@jyotsnabmc
@jyotsnabmc Месяц назад
अफाट आहे हे सगळ
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
धन्यवाद
Далее
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
Просмотров 891 тыс.
How many can you smash?🍫 IB : Florin
00:19
Просмотров 2,8 млн
Тренеруем память physics drop 103 - 104
00:51
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 107 тыс.
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
Просмотров 891 тыс.