Тёмный

त्याच्यामध्येच मी शांत होते…\संवाद : प्रतिभा रानडे, दीपाली दातार\Book Bro EP 83  

Ashu's Tunes
Подписаться 4,9 тыс.
Просмотров 2,1 тыс.
50% 1

"त्याच्यामध्येच मी शांत होते..."
संवाद : प्रतिभा रानडे, दीपाली दातार
Book Bro Episode 83
Presented by Dr. Ashutosh Javadekar Ft. Pratibha Ranade, Deepali Datar
कधी अफगाणिस्तानमधील युद्धाच्या घरावर बॉम्ब पडल्याच्या आठवणी, कधी रशियात सुभाषचंद्र बोस असण्याचा मिळालेला पुरावा, कधी शेवटच्या मुगल बादशहाच्या आयुष्याचा योगायोगाने घेतलेला वेध, कधी आता या उतारवयात फक्त आई वडिलांच्या स्मरणात वाटणारी शांतता, कधी समान नागरी कायदा आणि बुरखा, कधी लेखनात कोसळणारा शिलॉंगचा पाऊस, कधी दिल्लीची धुळीची वावटळ, कधी गंगोत्री-गोमुखापाशी विरून जावं अशी वाटलेली जाणीव, कधी कोल्हापूर ते कलकत्ता ते काबुल, लंडन, जेरुसलेम, मुंबई, पुणे असा घडलेला मुक्काम आणि प्रवास, कधी या 'बुक ब्रो' च्या भागात आवर्जून वाचलेल्या स्वरचित कविता आणि आपण लिहिलेल्या अनेकानेक बेहतरीन पुस्तकांच्या अनेक आठवणी… सगळं या 'बुक ब्रो' च्या भागात आहे.
प्रतिभा रानडे. वय 88. अद्याप तल्लख मन असलेली मराठीमधील अत्यंत महत्वाची लेखिका. आणि या अशा 'प्रतिभेचा पैस' संवादाच्या रूपात नेटकेपणे पुस्तकबद्ध करणाऱ्या दीपाली दातार. या दोघींशी लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी साधलेला सहज संवाद म्हणजे बुक ब्रो एपिसोड 83
Dialogue with veteran author Pratibha Ranade and young author Deepali Datar over Pratibha Ranade's literary career with her books spanning from subjects of politics to fiction through wars and epics.

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@neelimaborwankar5618
@neelimaborwankar5618 2 часа назад
केवळ अप्रतिम. किती गोड आहेत प्रतिभाताई. त्यांची अफगाण डायरी, बुरख्याआड च्या स्त्रिया आणि इतरही पुष्कळ पुस्तकं वाचली आहेत. चतुरस्र, विद्वान, बुद्धिमान, जग फिरलेली लेखिका अशी प्रतिमा मनात होती. तुमच्या गप्पात उलगडलेल्या प्रतिभाताई अगदी घरातल्या आई, मावशी सारख्या जवळच्या वाटल्या. दीपाली दातारांचं हे पुस्तक विकत घेऊन वाचायचं ठरवून टाकलं. सुंदर मस्त मुलाखत
@samidhahingne71
@samidhahingne71 5 часов назад
आदरणीय प्रतिभा ताईंच्या मुलाखती मुळे ८८वर्षापर्यंतचा विविध देशांतील त्यांचा प्रवास समजायला मदत झाली.दीपाली ताईंचे या पुस्तकामागचे आनंद दायक कष्ट समजले.दोघींना‌ही नमस्कार..हा योग Book Bro मुळे आम्हाला पाहता, ऐकता ‌आला.यासाठी तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद!!!
@jagrutitrivedi5017
@jagrutitrivedi5017 День назад
सुंदर चर्चा... प्रतिभा ताई खरच एक प्रतिभावंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व...त्यांच्या कडे बघून age is just a number... हे खरंच आहे असं प्रकर्षानं जाणवतं.आणि तुम्ही घेतलेला इंटरव्ह्यू किती मन मोकळा आणि प्रेमळ...
@AshusTunes
@AshusTunes 11 часов назад
@@jagrutitrivedi5017 खूप खूप धन्यवाद जागृती मॅडम
@charusheelafenani5333
@charusheelafenani5333 День назад
खूप छान मुलाखत.खरंच काही व्यक्तिमत्व सध्याच्या युगात स्वप्नवत वाटतात.नेमकी त्यांची भेट तुमच्या कार्यक्रमामुळे होते. तुमचे आणि दिपालिताईंचे आभार
@AshusTunes
@AshusTunes 16 часов назад
खूप खूप मनापासून धन्यवाद चारुशीला जी
@seemanitsure9605
@seemanitsure9605 День назад
प्रतिभा रानडे माझ्या आवडत्या लेखिका. बरीच पुस्तकं वाचली आहेत. हे पुस्तक नक्की वाचणार. आशुतोष जी तुमच्या book bro मुळे छान पुस्तकं कळतात. धन्यवाद
@AshusTunes
@AshusTunes День назад
मनापासून आभार सीमा जी 🙏🙏
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 День назад
वाह वाह काय सुंदर गप्पा प्रतिभाताई साष्टांग दंडवत आम्हाला अफगाण डायरी मुळे अफगाण कळायला सुरवात झाली त्यातील खान अब्दुल गफार खान आणि त्यांची खंत अस्वस्थ करुन गेली ❤🙏 दीपाली ताई दातार आणि आशुतोष सर खूप खूप आभार 🙏🙏
@AshusTunes
@AshusTunes День назад
@@nehanadkarni1001 आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार नेहा जी 🙏
@satyashrimandke6396
@satyashrimandke6396 День назад
Khup chhan gappa... Deepali ....Mast.....Pratibha Tai tar great ch aahet..... Ashutosh Javadekaranni chhan bolat kelay Pratibha Tainna .....
@ajaykulk
@ajaykulk День назад
खूपच रसरशीत व्यक्तिमत्त्व आहे प्रतिभा रानडे यांचे. धन्य आहेत बाई.
@AshusTunes
@AshusTunes 11 часов назад
@@ajaykulk अगदी
@asavarikakade684
@asavarikakade684 День назад
ग्रेट भेट..... 'पैस प्रतिभेचा' या आवडत्या पुस्तकासंदर्भात आवडत्या मैत्रिणींशी गप्पा ऐकायला छान वाटलं...
@sandyandy100
@sandyandy100 2 часа назад
शाळेत वाचलेली अफगाण डायरी. तिचा प्रभाव माझ्यावर अजूनही आहे. त्यानंतर त्यांचं प्रत्येक पुस्तक मी मिळवून वाचलेलं आहे
@डॉ.प्रियानिघोजकर
व्वा! वाचन प्रेरणा दिनाआधीच ही आस्वाद्य मेजवानी . पुस्तक सुंदरच झालंय.धन्यवाद दीपालीताई आणि प्रतिभाताईंना नमन. ही अमूल्य अक्षरभेट दिल्याबद्दल आशुदांचं अभिनंदन 😊🎉🎉.
@AshusTunes
@AshusTunes 11 часов назад
@@डॉ.प्रियानिघोजकर मनापासून आभार प्रिया जी 🙏
@sushmamirashi9357
@sushmamirashi9357 День назад
वा, सुंदर मुलाखत. ' ऐसपैस गप्पा दुर्गाताईंशी ' हे प्रतिभा रानडे यांचं पुस्तक अनेकवेळा वाचायला आवडतं. दीपाली दातार यांचे आभार की अशाच मनमोकळ्या गप्पा ' पैस प्रतिभेचा ' ह्या पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत.
@AshusTunes
@AshusTunes 11 часов назад
@@sushmamirashi9357 मनपूर्वक धन्यवाद
@vidyadeodhar4780
@vidyadeodhar4780 День назад
खूप छान मुलाखत...आनंद दायी अनुभव.🎉
@AshusTunes
@AshusTunes День назад
मनापासून धन्यवाद विद्याताई
@mayakhedikar6219
@mayakhedikar6219 День назад
अतिशय मनमोकळ्या गप्पा मारतात प्रतिभाताई ! प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता .फार छान व्यक्तिमत्व !
@AshusTunes
@AshusTunes 11 часов назад
@@mayakhedikar6219 खरंय
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 День назад
कविता छान
@AshusTunes
@AshusTunes День назад
❤❤
@solotripwithsaurabh
@solotripwithsaurabh День назад
मला कित्ती गोड वाटतंय त्यांना ऐकणं! - long live grey hair cuteness! ❤😅
@AshusTunes
@AshusTunes День назад
हो रे ❤😅 अगदी उतारवय असल की पुन्हा एक निरागस बालपण येतच मागून
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 День назад
मुकुंद....
@ankitakarle8295
@ankitakarle8295 День назад
वाह ! सुंदर मुलाखत. प्रतिभा ताई... गोड व्यक्तिमत्त्व ❤ पुस्तक छान आहे , नक्की वाचेन.
@AshusTunes
@AshusTunes 11 часов назад
@@ankitakarle8295 मनापासून आभार अंकिता जी
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 День назад
प्रतिभताईंना
@mayakhedikar6219
@mayakhedikar6219 12 часов назад
खरंच आशुतोष थोडे कमी बोललात व पाहुण्यांना जास्त बोलू दिलत तर छान होईल .
@AshusTunes
@AshusTunes 11 часов назад
@@mayakhedikar6219 🙏🙏
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 День назад
आपल्या मुळे भेटल्या ह्या
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 День назад
भेटायचं राहून गेले
@revatiabhyankar6954
@revatiabhyankar6954 День назад
आशुतोष खूप जास्त बोलतात.ज्यांना बोलावलंय त्यांना बोलायला वाव द्यायला हवा.आम्हाला प्रतिभाताईंना ऐकण्यात रस आहे.
@AshusTunes
@AshusTunes День назад
@@revatiabhyankar6954 प्रामाणिकपणे सांगायच्या तर प्रतिभाताई अनेकदा विस्मरणात जात होत्या. She needed prompts all the time. त्यांच्या संवाद असा आणि असाच होऊ शकला असता. शुटींग वेळी दीपाली दातार शेजारी होत्या त्या याची साक्ष देतील. प्रतिभाताई यांना ऐकण्यात पहिला मलाच रस आहे but this is the best we can all expect and get when she is 88
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 День назад
दीपाली दातार आली होती घरी
@speechesvideoslectures9401
@speechesvideoslectures9401 День назад
madhe madhe doghehi bolatat tevha aiku yet nahi
Далее
The Special Bond Between Ratan Tata And Sathya Sai Baba
25:02