धनश्री,अत्यन्त आवडतं पुस्तक वाचनासाठी निवडल्याबद्दल प्रथम अभिनंदन!💐 मनाला उल्हसित करणारा, अतिशय श्रवणीय आणि तितकाच प्रेक्षणीय अनुभव दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!💐👌👌
खूप सुंदर लेख आणि अप्रतिम वाचन अगदी प्रत्येक भागात आम्ही ऐकतो.या भागात दुर्गाबाईंच्या शब्दा इतकचं फुलांच्या सुरेख दर्शनाने आजच्या भागाची शोभा दुपटीने वाढली .पुष्कर ची जादू कमाल 👌👌👌
अतिशय सुंदर उपक्रम. दुर्गाबाईंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला अप्रतिम लेख , ओघवते सुश्राव्य वाचन व सोबतीला निसर्गातील सुरेख चित्रण. असा त्रिवेणी संगम झालेला आहे. वैशाखातील व्हिडीओ ची वाट बघत आहे. मला ऋतुचक्र हे पुस्तक ही हवे आहे. कुठे मिळेल ?
१०० वा लाईक माझ्या कडून येणं हा माझ्यासाठी मोठा सुयोग आणि आनंदाचा क्षण आहे असेच मी मानतो. हे असं मानण्याचं कारण असं की दुर्गाबाईंच्या दैवी लेखणीतून साकारलेले ऋतुचक्र हे त्यांचे अजरामर आणि कालातीत पुस्तक माझ्याकडे गेली २० वर्षे आहे. पण तुम्ही ज्या प्रकारे त्यातल्या प्रत्येक ओळी मधल्या वर्णनाचा अर्थ निसर्गाच्या विविध चित्रातून उलगडून दाखवला, त्यामुळेच आज खऱ्या अर्थाने ऋतुचक्र समजायला सुरुवात झाली. इतरही ऋतुंबद्दल असेच व्हिडिओ असतील अशी आशा करतो..तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि असे उपक्रम कायम करत रहा आणि पुढच्या पिढीलाही तुमचे हे व्हिडिओ एक प्रेरणास्रोत ठरो अश्या शुभेच्छा देतो.