देहोपनिषद आयुष्याची झाली रात | मनी तेवे अंतर्ज्योत || भय गेले मरणाचे | कोंभ फुटले सुखाचे || अवयवांचे बळ गेले | काय कुणाचे अडले || फुटले जीवनाला डोळे | सुख वेडे त्यात लोळे || मरणा तुझ्या स्वागतांस |आत्मा माझा आहे सज्ज || पायघडी देहाची ती | घालूनी मी वाट पाही || सुखवेडी मी जाहले | देहोपनिषद सिद्ध झाले ||