Тёмный

नदीकाठी मठातुनि | दिसे दिव्य प्रभेतुनि | रोहिणी गणपुले - भक्तीगीतमाला पुष्प ७  

Krishnakamal कृष्णकमळ
Подписаться 356
Просмотров 119
50% 1

Document from Madhav Puranik
नदीकाठी मठातुनि | दिसे दिव्य प्रभेतुनि |
कृष्णकमळ गीतांची तिसरी मालिका ' माउली माउली 'चे हे सातवे पुष्प - ' नदीकाठी मठातुनि | दिसे दिव्य प्रभेतुनि‌ | सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
मी, कवि डॉ माधव पुराणिक, नेहेमीप्रमाणे, नदीकाठच्या मठात दर्शनाला गेलो होतो. मध्यभागी माउलींची धीर देणारी प्रतिमा होती. खाली वारीतल्या भक्तांची चित्रे होती. त्यांच्या अभंगांचा गजर जणू मठात घुमत होता. तेव्हा माझ्याही मनात शब्दांनी ताल धरला. त्यांचे हे भावचित्र-
मी मठाकडे जात असतो. प्रत्येक वळणावर माझ्या मनाच्या घरातून एक एक काळोखी व्यथा बाहेर येते,माझे बोट धरते,मग माझी चाल मंदावते. पण मी जेव्हा मठात पोचतो ,नमस्कारासाठी हात जोडतो तेव्हा मला जाणवते कि या व्यथा नाहीशा होत आहेत व विठ्ठलाचा मला भास होतो आहे.
माझ्या जीवनदृष्टीतील दैवाचा प्रभाव कमी होत चालला आहे, संसारातील वासनांनी उजळणारे डोळ्यातील भाव जाऊन त्या गूढ अंधारात विठ्ठलाची दिव्य प्रभा दिसू लागली आहे.
मी मठाकडे दु:खाच्या आठवणींमुळे स्वतःला सावरत जात असतो.मठात विठ्ठलासमोर काही वेळ डोळे मिटून उभा असतो. तेव्हा मला भास होतो कि विठ्ठलच मला अदृश्य हातांनी भक्तीचे भस्म लावत आहे व धीर देत आहे.
स्वतः:विषयी, बायकामुलांविषयी न पूर्ण होणाऱ्या अपेक्षा माझ्या मनाला अस्वस्थ करतात. त्या जाळ्यात जीवाची तडफड होते. पण त्या पाशातून विठ्ठलनामाची जादू नकळत माझी सुटका करते.
मी मठात भिंतीला टेकून माउलींकडे पहात असतो. मठाबाहेरचे व मठातील भक्तांचे आवाज केव्हाच थांबलेले असतात. माझे श्वास संथ झालेले असतात. मन विठ्ठलाच्या भजनाच्या एकतारी सारखे एकाच अनामिक नादाकडे जात असते.
अचानक हृदयाला भीतीने व्याकुळ करणारा काळोख मला व्यापून टाकतो. मी आधारासाठी चाचपडत असतो.पण मला जाणवतंय कि कोणीतरी मला कोवळ्या दिव्य प्रकाशाच्या पायरीवर जवळ बसवून समजावत आहे.
मी मठाकडे जात असतो. अव्यक्त सांसारिक दु:खांच्या आसवांनी पापण्यांमध्ये दाटी केलेली असते. मी विठ्ठलाकडे पहाताच गाभाऱ्यासमोर टपटप पडणाऱ्या अश्रूंच्या भक्तीनादात मी बुडून जातो.
हळूहळू काळच भक्तीच्या झंकाराचे शांत गाणे गुणगुणू लागतो. भोवताली सुखदुःखाच्या अदृश्य लहरी जाणवू लागतात. पण त्यांचे :विठ्ठल विठ्ठल| विठ्ठल विठ्ठल| ' अशा निरंतर आनंदाच्या स्वरांत रूपांतर होते .मग मी त्यात अंतर्बाह्य भिजून जातो, विरघळून जातो.
' नदीकाठी मठात | दिसे दिव्य प्रभेतुनि |' या भक्तीगीताचे काव्यगायन रोहिणी गणपुले यांनी अतिशय भावपूर्ण आणि भक्तीने भिजलैल्या स्वरांत केले आहे. त्यामुळे कवितेतला गूढ व तरल अध्यात्मिक आशय श्रोत्यांपर्यंत पूर्ण पोचला आहे.
नदीकाठी मठातुनि | दिसे दिव्य प्रभेतुनि |
नदीकाठी मठातुनि | मनाचिया व्यथांतुनि |
दिसे नमस्कारांतुनि | विठ्ठल विठ्ठल || १ ||
झाकोळल्या दैवातुनि | नेत्रदीप विझवुनि |
दिसे दिव्य प्रभेतुनि | विठ्ठल विठ्ठल || २ ||
नदीकाठी मठातुनि | थरथर चालींतुनि |
भासे भस्मस्पर्शातुनि | विठ्ठल विठ्ठल || ३ ||
जीवघेण्या आशेतुनि | फडफड प्राणांतुनि |
सोडावीत पाशांतुनि | विठ्ठल विठ्ठल || ४ ||
नदीकाठी मठातुनि | मंद मंद श्वासांतुनि |
भासे एकतारीतुनि | विठ्ठल विठ्ठल || ५ ||
विकल हृदयातुनि | भयकरी तमातुनि |
स्थिर करित आतुनी | विठ्ठल विठ्ठल || ६ ||
नदीकाठी मठातुनि | दु:ख झरे नेत्रांतुनि |
भक्ती नाद अश्रुंतुनि | विठ्ठल विठ्ठल || ७ ||
काळ गाई झंकारूनि | सुखदु:ख लहरूनी |
निरंतर स्वरांतुनि | विठ्ठल विठ्ठल |
माधव पुराणिक
...मठ, पुणे, २५/११/२०२२

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@mukundkher
@mukundkher Год назад
सुंदर! अभिवादन! अभिनंदन!
@seemaphadke5856
@seemaphadke5856 Год назад
👌👌
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Год назад
सुंदर!
Далее
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 332 тыс.
Annapurna Stotram
23:26
Просмотров 69
AXC chat with Rajen Nair
32:55
Просмотров 29