llश्रीराम जयराम जय जय राम ll श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन | #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
बाबा ,( पूज्य बेलसरे काका) आजही आपण हवे होतात ,आपली प्रवचने प्रेमळ व अखंड अनुसंधाधातील आहेत .एक खुप छान सांगितले की नाम कंटाळा आला तर करु नये ,स्व इच्छेने मनापासून करावे ,मोठा संदेश क्रमाक्रमाने वाढवावे किमान घेतलेले मनापासून घ्यावे. ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
श्री राम. सत्पुरूषाचे सहजपणे वागणे हे सर्व भक्तमंडळीना उद्बोधक व कल्याणकारी असते हे तत्व प प बेलसरेंनी आपल्या साध्या भाषेत सर्वांना समजाविले आहे. त्यांची भक्तीरसाने ऒथंबलेली वाणी ऐकून मन त्रुप्त झाले. जय श्री राम.
अखंड नाम हे ध्येय माझे मती, नाम साधनेत होत नाही प्रगती, आता ये ओ नामाची प्रचिती, करितो विनंती रखुमाईच्या पती ! Association of like-minded people helps a lot. Thanks for uploading. Jai Shri Ram.
तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मणी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तू ब्रह्यांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावं कसं जपाच्या माळेत मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचं साधन या बंधनापलिकडे यायचंय अखंड नामात रंगून जायचंय नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम यावं फुलाबरोबर जसा सुवास हे आयुष्यच एक जपमाळ रोजचा दिवस या माळेतील मणी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोच तर खरा समाधानी तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजचा दिवसरूपी मणी तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं हरघडी अन् हरक्षणी जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ। 🌹🌹🌹🌹🙏 ।।श्रीराम जय राम जय जय राम।।