श्री.प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह.
पद नृसिंहाचें (चाल - कसा करिल भवपार )
कष्ट सर्वारी वारी। नरहरी।।ध्रु ०।।
प्रल्हादास्तव स्तंभीं श्रीहरी । नरहरिरूप धरी।।नर०।।१।।
घुरु घुरु घुरु घुरु जो शब्द करी । दैत्या फाडि करीं ।।२ ।।
जो हा केसरी अवतार धरी । तो लक्ष्मीश हरी।।३ ।।
तूं मायबाप तूं गुरु तारी । मम शिरीं हस्त धरीं।।४ ।।
वासुदेवानंदसरस्वती । चित्तीं वास करीं ।।५।।
15 окт 2024