🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌹🌹// अवधूत चिंतन श्री गु|| गुरुस्तुति || ****श्री वासुदेवानंद सरस्वती रचित गुरुस्तुति**** जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा l जो नित्य राहे उदित प्रभात्मा l ज्ञाने जयाच्या नर हो कृतार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll १ ll अखंड आत्मा अविनाशी दत्त l तया पदी लाविती जे स्वचित्त l वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ l l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll २ ll जो जागृतीस्वप्नसुषुप्तिसाक्षी l जो निर्विकारे सकलां निराक्षी l विक्षी परी ज्यासी नसे निजार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ३ ll जळीं स्थळी सर्वही वस्तुमाजी l व्यापुनी राहेची तयासी राजी l जो ठेवि भावें नर हो कृतार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ४ ll जें दृश्य ते रूप नसे जयाचे l दृश्यांत राहे अविकारी ज्याचे l स्वरूप तोची अविनाशी अर्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ५ ll दृष्यासी घेतां नच घेववे जें l स्वरूप तथ्य प्रभुचें स्वतेजें l स्वयेंप्रकाशे जगी जो परार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ६ ll असोनी सर्वत्र गुरुप्रसादा l विना न लाभें करताही खेदा l भेदाची वार्ता करी जो अपार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ७ ll अनन्यभावें भजतां अनन्य l लभ्य प्रभू जो नच होयि अन्य l सन्यस्त सर्वेषण तारणार्थ l तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ll ८ ll मागे तुकाराम तयासि दत्त l दे वासुदेवा करुनी निमित्त l हें स्तोत्र चिन्मात्र पदासमर्थ l द्याया हराया सकलध्यनर्थ ll ९ ll गाणगापुरी अठराशे सत्तावीस शकमधी l उदेले स्तोत्र हे अधिव्याधि हारी हरी कुधी ll १० ll 🚩🌻ll श्रीमतपरमहंस परीव्राजकाचार्य श्री वासुदेवानन्दसरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय ll 🌻🚩
मला प.पू.टेंबे स्वामी यांची तपस्या स्थाने आहेत त्यातील काही स्थानांना भेट देण्याचा योग आला.त्यांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही.माझ्याकडून त्यांच्या नामस्मरणात जावो एवढीच इच्छा आहे.त्यांच्या कृपेने मी बर्याच संकटातून वाचलो.कुटुंब सर्व चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत.त्यांची सेवा करण्याची सद्बुद्धी सर्वांच्या मनात सतत असावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! धन्यवाद. Video च्या शेवटी जी छोटी रचना आहे ती स्वतः श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी केलेली आहे का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
🙏🏻🙏🏻🙏🏻mala maf kar mazya mulabalana patnila vastula gharala maf kar amchya sagĺyankadoon tumchi seva karoon ghya hich prathna amhala arthik sankatatoon karjatoon mukt kar samast Vishwala karonamukt kar hich prathna Jay Vishnu dev jay vasudev sarsvti tembheswami maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻