भारतातीलच नव्हे तर जगातील कुठल्याही सरकारच्या किंवा इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेच्या डोक्याच्या पलीकडचे व्यवस्थापन इथे पाहायला मिळते. पाहून थक्क व्हायला होते.... हौसे, गौसे, नवसे सगळेच कसे खूष, आणि मस्त मस्त...... धन्य तो जगत पिता अन् धन्य ती जगत माता.... माझी विठू - माऊली, विठ्ठल - रखुमाई....पांडुरंग हरी....हरी....
माऊली, पाठीमागून येणाऱ्या वारकऱ्यांना आपली दिंडी / आपली राहुटी, कुठं आहे ते कसं काय सापडतं? कारण असंख्य दिंडीतल्या लोकांचा राहुट्या आणि स्वयंपाकची जागा जिथं मिळालं तिथं करतात.