खोपडे सरांनी खूप स्पष्ट आणि परखड मत मांडले आहे. अशा अधिका-यांची पोलीस दलास खूप आवश्यकता आहे. महत्वपूर्ण विषय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पोखरकर सरांचे खूप आभार 🙏
सर तुमच्यासारखे सत्यघटनेवर प्रखरपणे आपलं मत जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न सतत.आपण करीत आहेत यासाठी कितीही श्रम पडले तरीही आपण माघार घेत नाही व सत्य परिस्थिती समजावून जनतेसमोर सांगता याबद्दल आम्ही तुमचे मनःपुर्वक आभार मानतो
पोखरकर सर,जे काय बिघडले आहे त्याचे कर्तेकरविते कोण आहेत हे आदरणीय खोपडे साहैबांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.राखीबहिणभावाचा हा अमानवी प्रताप..! आपले दोघांचेही अभिनंदन आणि आभार.
मुजोर राज्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी यांचेमध्ये प्रामाणिक पणा आणि कर्तव्य निष्ठतेचा अभाव असणे ही अतिशय चिंताजनक आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार आहे आणि याला जाती,धर्माला प्रोत्साहन देणारे राजकारणी जबाबदार आहेत. बदलापूर प्रकरण,कोल्हापूर प्रकरण यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.आपल्या देशात जर राज्यकर्तेच सर्व महत्वाच्या पदांवर आरएसएस संबंधित वरिष्ठ अधिकारी राज्य आणि केंद्र सरकारने बसविले आणि त्यांचेकडुन आरोपींना पाठीशी घालुन चुकीचे आणि नियमबाह्य कम करत असतील तर आपल्या देशात बांगला देश किंवा श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदरणीय खोपडे सर आपण सद्य राजकिय परिस्थितीवर अतिशय चांगलं विश्लेषण केलं आहे त्याप्रमाणे श्री.पोखरकर सर यांचेही अतिशय परखड रोखठोक राजकीय विश्लेषण असतं.आपणां दोघांचेही मनापासून आभार🙏 जय भीम 🙏जय संविधान 🇧🇴
आजचा अभिव्यक्ती चा इपिसोड बघून अभिव्यक्ती बद्दल मनात असणारा आदर द्विगुणीत झाला. आपलं मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. त्याप्रमाणे श्री. सुरेश खोपडे सरान्चे सडेतोड,प्रामाणिक विवेचन खूपच आवडलं. असे वरीष्ठ अधिकारी दलातील हिरे असतात. ज्यामुले आर्थिक, सामाजिक मागास वर्गाला न्याय मिळतो. आपणा दोघांनाही सविनय प्रणाम जय हिंद. जय भीम.
पोखरकर सर व श्री खोपडे सर आपणा दोघांच्या चर्चेतून सुंदर विश्लेषण राज्याच्या वर्तमान समस्यांवर मत स्पष्ट मांडले त्यातून सरकार काही धडा शिकेल विशेषतः गृह मंत्री मनाला विचार करतील अशी अपेक्षा आहे सर सुंदर मत मांडले. धन्यवाद आपले दोघांचे.🎉🎉🎉
सर अतिशय वास्तववादी विश्लेषण केलेलं आहे या पोलिसांच्या मुलीवरती असा अत्याचार झाला पाहिजे मग यांच्या लक्षात येईल आपण सेवेसाठी आहोत आता कोणाची हुजरेगिरी करण्यासाठी आहोत
मा. सुरेश खोपडे हे पोलीस खात्यामधील एक आगळं, वेगळं व्यक्तिमत्व! पोलिस दलात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य लोकांना कायदयाच्या परिगात राहून मदत करणारे माजी पोलीस अधिकारी!
सर खरतर पोलिस शाळा प्रशासन मुख्यधाप शिक्षक यांच्यावर आरोपीला वाचवणे पुरावे नष्ट करणे कर्तव्यात कसूर केली म्हणून गुन्हा नोंद करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे
खोपडे सर आणि अभिव्यक्ती सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आपण असंच मार्गदर्शन करत राहावे महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या कार्याला यश लाभो एवढीच विनंती महाराष्ट्रातली जनता खोपडे सरांचे मार्गदर्शन का महत्व देऊन ऐकावे
या गोष्टीला नुसते हे अधिकारी शाळेचे प्रशासन राजकीय नेते जबाबदार आहेत तितकेच समाज आणि इथली शिस्टम सुद्धा जबाबदार आहे.मी जनतेला का जबाबदार म्हणतो आहे तर या सर्व भ्रष्ट्र नेत्यांनी निवडणुकी आधी जर काय आमिष दाखवले तर आगोदरचे सर्व विसरून ही जनता पुन्हा अशा नेत्यांना निवडून देते.
याला म्हणतात सडेतोड मुलाखत आपली परखड मतं मांडल्या बद्दल आदरणीय खोपडे सरांचं मनःपुर्वक अभिनंदन,आता जनता सुजाण आणि सजग होणं अत्यंत आवश्यक आहे,रविंद्रजी आपणास देखील खूप खूप धन्यवाद 🙏
खरंच सर....अशा स्तुत्य विचारांचे , कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यावेळी, आपल्या पोलिस दलात तयार होतील,तेव्हाच कुठेतरी हे सगळं नीट मार्गी लागू शकतं !! खोपडे सरांना एक मानाचा मुजरा 🙏
आत्ताच जे राजकारण चालू आहे ते जनतेच्या हिताच बिलकुलच नाही ह्यांचा सगळ्यांचाच हात एका साखळदंडा प्रमाणे एकात एक असा गुंतलेला आहे तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल ??
पोखरकर साहेब, अतिशय महत्वपूर्ण, ज्वलंत, लोकांच्या जिव्हाळ्याचा, लेकीबाळी वर व सामान्य जनतेवर राजकीय दबावामुळे होणाऱ्या अन्नायाच्या विषयाला निर्भीडपणे वाचा फोडून तॊ पूर्णपणे उलगडून सांगण्याच्या तुमच्या प्रयत्नाला व कौशल्याला मानाचा मुजरा 🙋♂️ गॉड ब्लेस यु 🙋♂️
फारच छान.श्री सुरेश खोपडे सरांचं लिखाण नेहमी समाज हिताचे आणि परखड असते.त्यांचे कार्य रचनात्मक आहे.आणि पोखरकर सरांनी त्यांची मुलाखत घेऊन सत्य स्थिती जनतेसमोर मांडल्याबद्दल त्यांचे आभार ,अभिनंदन आणि त्यांना शुभेछया!
एकदम बरोबर आहे सर. खरोखर मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस विभागात अपल्या मर्जीतले वरिष्ठ अधिकारी बसऊन नियम, कायदा ,राज्यघटना सर्व गुंडाळून ठेवून काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांचा मर्जीप्रमाणे कारभार चालू आहे .