Тёмный

ब्राझील मध्ये प्रसिद्ध झालेली कोकणातील "कावी चित्रशैली"|Sawani Shetye Explaining Kavi Art 

Konkani Ranmanus
Подписаться 475 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

पुरातत्त्व शास्त्रज्ञ (archeologist) सौ. सावनी शेटये-मळीक यांनी कोकणातील, कर्नाटकातील कावी कलेचा विशेष अभ्यास केला आहे. जुनी मंदिरे, मूर्त्या यांचीही माहिती सांगायला त्या तत्पर असतात. नुकतीच त्यांनी झोळंबे येथील श्री देवी माउली मंदिराला भेट दिली, त्यावेळी कावी कलेचा इतिहास, काव म्हणजेच लाल मातीचा- गेरूचा रंग कसा तयार करतात? तो वर्षानुवर्षे टिकतो कसा? याबद्दल सखोल माहिती दिली. कावी कलेतील भौमितिक आकार, पारंपरिक रामायण महाभारतातील कथांची चित्रे व ते रेखाटण्यासाठी वापरलेले निकृंत अभिकल्प अर्थात स्टेन्सिल्स चामड्यापासून तयार करण्याची पद्धत ह्यांचे वर्णन केले.
मंदिराच्या आवारात अनेक मुर्त्या आहेत त्यांतील क्षेत्रपाल, वेताळ, गजलक्ष्मी इत्यादींबाबत त्यांनी विशद केले.
क्षेत्रपाल म्हणजे गावाचे रक्षक. घोड्यावर स्वार, हातात भाले तलवार आदी शस्त्र धारण करणाऱ्या वीरांच्या ह्या मूर्ती आहेत.
वेताळ, म्हणजे शंकराचा एक गण. ह्याच्या हाता पायात नाग आहे. गळ्यात रुंडमाळ साखळीत अडकवलेली आहे. एका हातात शस्त्र आणि दूसऱ्या हातात कवटी धारण करणारा हा अघोरी आहे. वाईट शक्ती, मृतदेह अस्थीपंजर, नाग साप, हिंस्त्र प्राणी यांच्या बद्दल माणसाला नेहमीच भिती वाटत असते. म्हणून ह्या गोष्टी धारण करणारा व त्यांच्या पेक्षा प्रबळ असा हा वेताळ कल्पुन,आपले रक्षणासाठी त्याची स्थापना करण्यात आली.
तसे आपल्या संस्कृतीत प्रत्येक मंदिर, मुर्ती ही विचार पूर्वक काही दृष्टीकोन, संकल्पना देणारी आहे.
#kavi #art #ranmanus
महिषासुरमर्दिनी ही राक्षसांचे निर्दालन करणारी स्त्री शक्ती,दूर्गा आहे.
कोकणातील सातेरी माउली ही भूमीमातेचे रूप आहे. सातेरी म्हणजे वारूळ. वारूळ जिथे असते तिथे माती उपजाऊ सुपिक असते. तिथे वस्ती करून, उत्तम शेती करता येते. अशा ठिकाणी आधी जमिनीची प्रत दाखवणाऱ्या त्या वारूळाला देवी, माता स्वरूपात पुजतात. वारूळाला बांगड्या, तोडे पैंजण,असे अलंकार घालतात,साडी चोळी नेसवतात, मुखवटा बसवतात. वारूळ जमीनीतून उगवते, म्हणून ते गर्भस्वरूप, नवनिर्मिती चे ही प्रतिक आहे.
गजलक्ष्मी ही लक्ष्मी स्वरूप, भरभराट, समृद्धीची देवता आहे. तीच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती आहेत. हत्तींच्या सोंडेने एक घागर धरली आहे. ह्या घागरीत, ते थेट आभाळातून पाणी घेऊन लक्ष्मी मातेला भूमातेला अभिषेक करतायंत.
सृष्टीतील जीवन चक्र दर्शवणारी,भरण पोषण करणारी ही देवता, आणि कृतज्ञतेने तीला पुजणारे आपले पुर्वज, हा आपला वारसा आहे आणि प्रयत्नपूर्वक आपण तो जपला पाहिजे.
_श्री विनायक पटवर्धन.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 112   
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 года назад
सावनी मॅडमने अप्रतिम माहिती दिली कावी चित्रशैलीची 👌असे प्राचीन मंदिर, वास्तू पाहिले कि खूप प्रश्न पडतात कसे निर्माण झाले असेल, काय असेल या मागचा इतिहास पण क्वचितच शंकाचे निरसन होते. आपल्या जानकरांनी या सर्व गोष्टी जगापुढे आणायला हव्या जेणेकरून तेथील महत्व कळून सांस्कृतिक वारसा जपला जाईल. प्रसाद तुझ्या vlog मधून लोकांपर्यंत खूप छान माहिती पोहचत आहे आणि ज्ञानातही भर पडत आहे.🤗😊 त्यावेळेच्या लोकांना मानलं रंग, कलाकुसर, बांधकाम टिकून ठेवण्याची शैली त्यांच्यात होती ती आता दिसेनाशी झाली आहे. सातारा देवीच्या मंदिरात वारूळ का आहे या प्रश्नाचे उत्तर डिस्क्रिपशन बॉक्समध्ये दिलेल्या पटवर्धन सरांच्या माहिती मुळे समजले 🤗 काही जुन्या वडीलधाऱ्या माणसांना माहित असेल झाडांचे इथल्या वास्तूचे महत्व पण ते सांगायला पुढे येताना दिसत नाही कदाचित कोणी याचा दुरुपयोग करु नये असेही असेल पण काहीही म्हणा भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना पूर्ण आयुष्य निघून जाईल. 🤗👍🙏
@vksomji
@vksomji 3 года назад
Yes I agree with you. The Explaination provided in the Discription Box is good and detailed one.
@shubhrasworld1397
@shubhrasworld1397 3 года назад
अगदी बरोबर 😊
@sawanishetye
@sawanishetye Год назад
अगदी बरोबर! भारताचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक ठेवा अमूल्य आहे
@sameerrambade2990
@sameerrambade2990 9 месяцев назад
खूप छान विडिओ
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 3 года назад
👌👌👌
@pramodghadigaonkar4626
@pramodghadigaonkar4626 Год назад
सुंदर
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 3 года назад
अप्रतिम माहिती 👌👌👌
@kp3121
@kp3121 8 месяцев назад
Prasad khup chan topic.👍
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 года назад
सुंदर 🙏 सुंदर सावनी ताई 🙏
@bhimrajjadhavnews6843
@bhimrajjadhavnews6843 3 года назад
ग्रेट ji
@ajitkanshidebharatiya5083
@ajitkanshidebharatiya5083 3 года назад
Great
@vikaspawar3658
@vikaspawar3658 3 года назад
Nice
@swatiparekhji
@swatiparekhji 3 года назад
Kharech Konkan sanskruti japnya saathi tumhi khoop prayatna kartay. Good luck and all the best.
@anilkavankar5223
@anilkavankar5223 3 года назад
मस्त
@diptinaik6493
@diptinaik6493 2 года назад
छान माहिती
@jeevanshinde8490
@jeevanshinde8490 Год назад
काय व्हिडिओ बनवतो भाई तू खूप काही शिकायला मिळालं थँक्यू🙏
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती दिली आणि मित्रा अशा ऐतिहासिक कला वास्तूंचे नक्कीच जतन झाले पाहिजे आणि ह्या बद्दल दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि नक्कीच ह्या ऐतिहासिक कला वास्तू बघायला देशातून , परदेशातून खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील पण हे कोकणातल्या लोकांला आणि प्रशासनाला का कळत नाही आणि ह्या पर्यटनातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊशकते आणि ह्या कोकण देव भूमीच रक्षण होईल मित्रा तू एक नंबर काम करतो आहेस
@kavishekhar1
@kavishekhar1 3 года назад
मानले प्रसाद तुझ्या व्हिडिओमधून माझी साठी उलटल्यानंतर कोकणाची नव्याने ओळख होते आहे चांगला संदेश
@ashishpawar5611
@ashishpawar5611 3 года назад
खूप छान माहिती. विजयदुर्ग गावाजवळील रामेश्वर मंदिरात बाहेरच्या भिंती वर अशीच चित्रे आहेत. रामायण , महाभारतातील काही प्रसंग रेखाटले आहेत. तिथे देखील याच चित्रशैलीचा वापर केला असेल.
@sheetalrane3459
@sheetalrane3459 3 года назад
खूपच सुंदर माहिती.खरंच सध्या कोकणच संवर्धन, संरक्षण करण्याची गरज आहे.पर्यटन आणि विकास सोबत तुम्ही जे त्याचं मूळ जपण्याचा प्रयत्न करत आहात खरच खूप चांगलं कार्य आहे.
@deepakshinde4137
@deepakshinde4137 3 года назад
Thanks Prasad आम्हाला सावनी ताईंनी खूप छान माहिती दिली
@maheshpm6500
@maheshpm6500 3 года назад
सुंदर व्हिडिओ, आभारी आहे फार छान माहिती आहे
@amitmalkar9484
@amitmalkar9484 3 года назад
prasad....apratim....chhan....
@paragchawathe8934
@paragchawathe8934 3 года назад
खूपच सुंदर मंदिर चित्र शैली दाखवल्याबद्दल धन्यवाद
@ratnamalarane9751
@ratnamalarane9751 3 года назад
Very informative vedio👍
@sameerrambade2990
@sameerrambade2990 9 месяцев назад
धन्यवाद मॅम.... कावी भित्तीचित्र कलेबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर कुठून मिळेल...
@ashutoshramdas2348
@ashutoshramdas2348 3 года назад
झकास... सावनी, खुप छान...प्रसाद सुंदर वाटचाल चालु आहे... Buck up... Keep it up...
@sujatawadekar4643
@sujatawadekar4643 3 года назад
प्रसाद खूप छान माहिती. तुझ्या कार्याला सलाम
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
फार छान माहिती दिली. मी पण पहिल्या प्रथम पाहिली. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@yaaminiM0801
@yaaminiM0801 3 года назад
Very rare and new information 👍
@user-cw5ss6qe3o
@user-cw5ss6qe3o 3 года назад
खूप सुंदर अभिमान👌👌👌🚩🚩🚩🚩🚩कौतुक
@im.rakeshgaykar
@im.rakeshgaykar 3 года назад
khup chan information. keep it up Prasad
@arvindparab1173
@arvindparab1173 3 года назад
प्रसाद! खुप चांगलं काम करतो आहेस तू बाळा!! तुझ्यातला 'रानमाणूस' मला भावला. Keep it up. आता थोडं ह्या episode बद्दल. तुझ्या आणि सावनीच्या बोलण्यातून उल्लेख आला की ब्राझील मधे सुद्धा ह्या 'कावीकलेचा' प्रसार झालेला आढळतो. ह्यावरुन असं जाणवतं की पाच-सहाशे वर्षांपूर्वी पासून ही कला आपल्या कडे अस्तित्वात होती आणि पोर्तुगीजांनी ती ब्राझील मधे नेली असणार. ब्राझील देशावर पोर्तुगीजांचा बरींच वर्षे अंमल होता. जसा ब्रिटिशांचा भारतावर होता तसा. इथल्या बऱ्याच गोष्टी, कला, वनस्पती पोर्तुगीजांनी ब्राझील मधे नेल्या. त्याचप्रमाणे ब्राझील हून सुद्धा अनेक गोष्टी आपल्या देशात खासकरून आपल्या पश्र्चिम किनारपट्टीवर आणल्या आणि वसवल्या. ब्राझील मधील वातावरण आणि आपल्या कोकण किनारपट्टीचं वातावरण बरचसं सारखं असल्याचा त्यांनी फायदा करून घेतला. आंब्याच्या आपल्या कडे नसणाऱ्या जातीची कलमे आपल्या देशी जातींशी बांधली. हापूस (alphanso), पायरी, मानकूर, करेल, बिशप(यांची नांवे पोर्तुगीज टाईपची आहेत) वगैरे. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आम्रफलाचा उल्लेख आढळतो. पण ह्या कलमी आंब्याचा प्रकार पोर्तुगीजांनी आणला. काजू, चिकू ही फळे आपल्या कडे तर नव्हतीच. पोर्तुगीजांनी ती ब्राझील मधून आणली. तर आपली ही 'कावी' पेंटिंगची कला ब्राझील पर्यंत पोहोचली आहे ही गोष्ट महत्त्वाची. आता तू आणि सावनी सारखी तरूण मंडळी ह्यांत लक्ष घालत आहात ही मोठी कौतुकाची बाब नक्कीच आहे. अजूनही तरुण मुलं तुमच्या बरोबर येतील बघा! आपल्या तळकोकणातल्या मंदिराचा ढाचा एक विशिष्ट प्रकारचा असतो. आजकाल बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार केला जातोय. पण तो जीर्णोद्धार होताना बहुतांशी RCC आणि संगमरवराचा वापर होतोय. चीऱ्याचे दगड आणि घाण्याच्या चून्याचा विसरच पडलाय लोकांना. शास्त्रशुद्धपणे घाण्याच्या चून्याचा वापर करून बांधकाम केले तरी शेकडो वर्षे ते टिकू शकते. असो! हा वेगळा विषय झाला. तर प्रसाद तू सावनी आणि तुमच्या सारख्या तरुण मंडळी कडून आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. Best of luck. God bless you.
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 года назад
खूप छान व्हिडिओ प्रसाद भावा! ❤️❤️❤️ तुझ्या व्हिडिओज ची वाट पाहत असतो आम्ही. बाकी कोकणातील सर्वच Vlogger फक्त आणि फक्त आपल्या गोष्टी,घरातल्या गोष्टी दाखवन्यात व्यस्त असताना,तू मात्र निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग च दाखवतोस. आई भवानी च्या कृपेने तुझी अशीच प्रगती होत राहो!
@siddharthshetye6591
@siddharthshetye6591 3 года назад
Great job....
@ameyjoshi903
@ameyjoshi903 3 года назад
खूप छान माहिती मिळत जात आहे तुमच्या विडिओच्या माध्यमातून 👍
@deepakkamath7513
@deepakkamath7513 2 года назад
Wow, that was a detailed and very competent explanation of Kavi art. Thanks Ms Sawani and Prasad for a fantastic video. Hope to see this in Konkan next time.
@sawanishetye
@sawanishetye 9 месяцев назад
Thank you so much ☺️
@yogeshgawas4582
@yogeshgawas4582 3 года назад
Superb work by Prasad !!! & Excellent information given by madam.....
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar 3 года назад
अप्रतिम आणि खूप चांगली माहिती भेटली मंदिरांच कोंक्रिटीकरन कर्न्या पेक्षा ती आहेत तशी टिकवुन ठेवन खूप गरजेच आहे.
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
Khup Sundar👌 👍Dhanyavaad🙏
@ganeshgawas9344
@ganeshgawas9344 3 года назад
Thanks u Aaj tumchya najaretun mazya gavch mandir mala vyavastit paht aal... Aaj paryan fakt mandirat gelo evdya barik najrene kadhich pahil nahi...
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 года назад
खूप सुंदर.
@VirShri
@VirShri 3 года назад
धन्यवाद दादा
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 года назад
कावी कला दाखवल्या बद्दल धन्यवाद.
@shirishkambli242
@shirishkambli242 3 года назад
सावनी यांनी कावी आर्ट बद्दल छान माहिती दिली. ही कला खरच फारच अप्रतिम आहे. लोकांपर्यंत पोहोचने आवश्यक आहे. कोकणात आणखी काय काय आहे ते बघण्यासाठी पर्यटक येतील व यातूनच कोकणातील लोकांना त्याचा फायदा होईल
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 года назад
Khup Chan mahiti 🙏
@sharadtawade8156
@sharadtawade8156 3 года назад
खूप छान व आभार
@archii4455
@archii4455 3 года назад
हे चॅनेल अतिशय प्रशंसनीय काम करत आहे. आपल्याच कोकणाबद्दल आपल्यालाच माहित नसलेल्या कित्येक उल्लेखनिय गोष्टी जगासमोर उत्तमरीत्या प्रदर्शित करत आहे. कोकणी रानमाणूस चे खूप खूप आभार... धन्यवाद आणि असेच वृद्धिंगत व्हा हिच सदिच्छा. 🙏😊 👍
@sumitpatil6770
@sumitpatil6770 3 года назад
खूप छान दादा 👍👍👍
@madhuradesai3707
@madhuradesai3707 3 года назад
थँक्स प्रसाद! मी पण कोकणातीलच आहे, कोकण लव्हर पण तरीही तुझ्या नजरेतून आणि तुझ्या वाणीतून कोकण नव्याने उमगते आणि भावतो.. थँक्स या साठी की , जेव्हढा सूंदर आपला कोकण आहे तेव्हढाच सूंदर तुझा आवाज आणि तू ज्ञान आहे
@manishramdas
@manishramdas 3 года назад
सावनी चा कावी चित्रशैली वरचा अभ्यास आणि तुम्ही हे सगळं आमच्या पर्यंत पोचवलं ह्या सर्व गोष्टींसाठी अपले खुप खुप धन्यवाद 🙏 आता ह्या ठिकाणी कधी पोचतो आणि हि चित्रशैली कधी प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार ह्याची ईच्छा आहे. 👍
@virajnarvekar
@virajnarvekar 3 года назад
प्रसाद तू खूप छान कोंकण मधील पर्यटन आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतो आहेस..तुझे खूप आभार.. काही लोक कोंकण विकता आहेत त्यांचे यूट्यूब वरती चॅनल्स सुधा आहे.. आपली माती आपल्या कडेच राहिली तर ती शाबूत राहील..एक ब्लॉक त्या साठी बनवता आला तर नक्की कर.. आपला कोंकण सोन आहे ते आपल्या लोकांकडे राहूदे..तरच आपण त्याला भविष्यात पाहू शकू..
@shravanichawathe1358
@shravanichawathe1358 3 года назад
कावी चित्रशैलीं च्या माध्यमातून गतकाळातील अत्यन्त सुंदर ठेवा सावनी ताईंनी आज उलगडून दाखवला या बद्दल खूप खूप आभार या चित्रशैलीची जोपासना केली गेली पाहिजे सलाम तुमच्या कामाला दादा
@xtreemblink
@xtreemblink 3 года назад
"माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ❤️ माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. "......आज पर्यंत कळत नव्हतं. कोणत्या परंपरांचे पाईक व्हावे. पण तुम्ही ते जीवापाड करताय ......👍💕
@sawanishetye
@sawanishetye Год назад
such a beautiful this comment is :)
@leenadalvi597
@leenadalvi597 3 года назад
Thanks to Sawani Madam....सावनी मैडमनी कावी चित्र शैली खूप सुंदररित्या समजावून सांगितली. खूप उपयुक्त नवीन अशी माहिती मिळाली. अशा जुन्या कला जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचणे खूप गरजेचे आहे, त्या बद्दलची माहिती समजणे गरजेचे आहे. कोकणातील जुनी मंदिरे, त्यांची रचना, त्यांचे बांधकाम वैशिष्यपूर्ण असते, बघण्यासारखे असते ते आहे तसेच ठेवणे खूप महत्वाचे आहे.
@tasmairevandikar3294
@tasmairevandikar3294 3 года назад
सावनी मॅडम नी जि माहिती आम्हाला दिली त्यांनी आमच्या ज्ञानात पण भर पडली आणि एक चित्रकार आणि सुलेखनकार म्हणून मी हे सांगू इच्छीतो की ह्या व्हिडियो मध्ये दाखवलेल्या कलाकृत्या खरेच खूप खूप कौतुकास्पद आणि प्रेरणादायक होते. ह्या व्हिडियो साठी धन्यवाद ! आणि कोंकणी रानमाणूस टीमचं पण धन्यवाद !
@milindrane4995
@milindrane4995 3 года назад
Thanks..both of you.. Nice vdo
@prasaddeshmukh2577
@prasaddeshmukh2577 3 года назад
Very nice and beautiful 👍
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 года назад
कावी चित्रशैलीची उत्तम रितीने सावनीताईने माहीती दिली.कोकणचा ठेवा आपण जपला पाहिजे.👍प्रसाद तुझे सावनीताईचे आणि कोकणी रानमाणूसच्या पुर्ण टिमला धन्यवाद. 🙏
@perthplanespotting5206
@perthplanespotting5206 3 года назад
Great job
@ganeshmarathe6346
@ganeshmarathe6346 3 года назад
नमस्कार मित्रा कावी विषय माहिती दिलीस मी आभारी आहे, पण आता परत एकदा कावी कशी बनवून शकेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही कला घराघरात पोचवण्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करून ही आपली कला, संस्कृति जिवंत ठेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आणि तू हे करत आहेस ही ईश्वरसेवा आहे. खूप शुभेच्छा
@gauravsarafdar9954
@gauravsarafdar9954 3 года назад
Tu kay hya kartas ta jabardast ha
@vksomji
@vksomji 3 года назад
Thankyou Sawani Ma'am and Konkani Ranmanus for sharing the Research Work through this VLOG. You have explained very nicely. Makes one connected to the Roots. Happy Womens Day to Sawani Ma'am 💐 . Stay safe and Take care. Keep sharing such Research Work.
@sawanishetye
@sawanishetye 9 месяцев назад
Thank you 🙏
@ujjwalaware7169
@ujjwalaware7169 3 года назад
Extraordinary!
@praveengaonkar2585
@praveengaonkar2585 3 года назад
Thank you so much buddy for covering such an important topic 🙏🙏🙏🙏🙏
@Thesaten12
@Thesaten12 Год назад
it is a misconception in Maharashtra that Konkan ends in Sindhudurg but actually Konkan is the western coast area starting from Vasai till Mangalore
@indianindian4617
@indianindian4617 Год назад
स्वतंत्र कोंकण राज्य आता खूप गरजेचे आहे त्याची राजधानी असेल मुंबई आपल्या हक्काचं राज्य
@shubhrasworld1397
@shubhrasworld1397 3 года назад
या मंदिरामध्ये मी लहानपणी गेले होते . त्यावेळी मला येवढच समजल होत की चित्रकाराने काढलेली सुंदर चित्रे आहेत .पण आज प्रसाद तुझ्या व्हिडिओ मुळे सावनी मॅडम कडून खूप छान माहिती भेटली साहजिकच ज्ञानात भर च पडली 😊 लहानपनापासुन डोक्यात प्रश्न होते त्याच समाधानकारक उत्तर सापडलं 🙏धन्यवाद ....वर्षा 😊✨
@shrikantagawane2128
@shrikantagawane2128 3 года назад
WoW! thanks a ton. Fantastic video. Perfect information, best cinematography and sound too good. :-)
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 3 года назад
Very nice
@meghanaghanekar8112
@meghanaghanekar8112 3 года назад
खूप छान माहिती
@narendravichare
@narendravichare 3 года назад
मित्रा, तुला आणि तुझ्या कार्याला सलाम
@sudarshanbagul
@sudarshanbagul 3 года назад
Great Kaam Bhava
@swapnildeshmukh7980
@swapnildeshmukh7980 3 года назад
नक्की भेट देऊ या तळ कोकणातल्या गावाला....आणि खूप खूप Thank you तुला....तुझा मुळे आमच्या ही ज्ञानात आज थोडी भर नक्कीच पडली...
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 года назад
छान
@tanujaphatak3335
@tanujaphatak3335 3 года назад
खूप छान माहीती. 👌👌
@amitdixit4468
@amitdixit4468 3 года назад
jabrdast mitra
@SayliGugale2100
@SayliGugale2100 4 месяца назад
Juni mandir japaylach havit
@jyotipawar9143
@jyotipawar9143 3 года назад
Hiii daa kaso asaaa gm..👌 khup great mahiti👌👌
@tukaramgundusharondekar6729
@tukaramgundusharondekar6729 3 года назад
खूप छान 👌 खूप वेळा पाहिलं होत पण या बद्दल कधी विचारच केला न्हवता.. सावनी मॅडम thank you for explaining such a beautiful and easy way ... And thank you कोंकणी रानमाणूस ❤️नवीन विषय घेवून आल्या बद्दल...
@sachinteli618
@sachinteli618 3 года назад
Ek no Bhava Maka tuza mule kokan navyan kallo
@omkarnaik2805
@omkarnaik2805 3 года назад
Do check her work on exclamations
@ullhassawant3302
@ullhassawant3302 3 года назад
khup chan dada
@Dipakvalvi1197
@Dipakvalvi1197 3 года назад
मला पण कोकणात शिफ्ट व्हावं सारखं वाटतयं
@baajirav
@baajirav 3 года назад
Plz show live examples of making this painting. Also show how to repaint & renovate the walls.
@fooddishvideo1122
@fooddishvideo1122 3 года назад
Khup chan dada tuza mule kalale kokan
@amodpataskar5673
@amodpataskar5673 11 месяцев назад
अंधारातील दृश्यावयर लाईट लावून शुटिंग कराव, तसेच काही बॅकग्राऊंड म्युझिक असेल तर बरं
@deepalijoshi2264
@deepalijoshi2264 3 года назад
देवगड मधे रामेश्वर मंदिराच्या मूळ गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला देखील काहीशी अशा प्रकारची चित्रं आहेत. नीट पाहिलं तरंच कळतं की ‌यात विष्णू दशावतार, रामायण आणि महाभारतातील प्रसंग रेखाटलेले आहेत. त्याबद्दल जास्त माहिती मिळाली नाही पण यात नैसर्गिक रंगांचा वापर केला असावा
@yogeshgawas4582
@yogeshgawas4582 3 года назад
Pls let me know, in which book.....zolambe village mentioned in Brazil?
@realgigantic9737
@realgigantic9737 3 года назад
भावा, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या कोकणचा ठेवा, कोकणी संस्कृती तू जगासमोर आणतो आहेस आणि तेही आपल्या भाषेत! फारच छान.
@RajaramSethuraman
@RajaramSethuraman 3 года назад
WHat is the name of the village? If we go there, will we be able to see this art?
@engicofarmer4713
@engicofarmer4713 3 года назад
Zolambe. Yes the temple is open for all
@akshaygade4007
@akshaygade4007 3 года назад
Nice 🙏
@vinaykhare2537
@vinaykhare2537 3 года назад
या मॅडम कडून सगळं ऐकताना मला कुमुद कानिटकर मॅडमची आठवण झाली. अंबरनाथ शिवमंदिरावर आणि इतर अनेक संशोधनपर असं जे काम त्यांनी केलय ते बघून थक्क व्हायला होतं. या मॅडम ना आणि तुला धन्यवाद आणि शुभेच्छा.
@vksomji
@vksomji 3 года назад
👍
@pAraagthaakur
@pAraagthaakur 3 года назад
अगदी बरोबर! मंदिरांची शैली टिकणे महत्वाचे आहे. नुकताच सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो होतो. महाराजांच्या मंदिराचे जिर्णोद्धाराच्या नावाखाली जे काँक्रीटकरण चालले आहे आणि जांभ्या दगडावर प्लास्टर चढवले जात आहे ते पाहून खूप दुःख झाले. आपल्याकडे वारसा या गोष्टीला फार महत्व दिले जात नाही, त्याचे जतन केले जात नाही.
@minalsalohke8308
@minalsalohke8308 3 года назад
खूप छान, प्रसाद तुम्ही नेचरकेअर करत आहात, एक नवा विचार नेहमीच तुम्ही मांडता,तुमचा नंबर व आॅफिस चा पत्ता देऊ शकता का
@sameerss19
@sameerss19 3 года назад
Hey nakki location kuthe ahe??
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 года назад
Zolambe village... Dodamarg
@hrishikeshrawool177
@hrishikeshrawool177 3 года назад
Bhavashi girobacho utsav pan ya varshi dakhaych
@eknathparxemcar8706
@eknathparxemcar8706 3 года назад
Is there any practising artist in India?
@uttamrathye8169
@uttamrathye8169 3 года назад
आमच्या कडे होती पं मंदिर नविन केले तर ते सगळं गेल...पैसा अभावी माणसाला काही दिसत नाही..
@vikasraut6050
@vikasraut6050 3 года назад
Frist view
@vishdgr8
@vishdgr8 3 года назад
बकवास .. फेकू चॅनल
@pandurangkhot526
@pandurangkhot526 3 года назад
चांगले आहे पण मराठीत बोला फोटो बरोबर स्पष्ट दीसत नाही सावी बेटा.
Далее