भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग
आम्ही आम्ही आम्ही आम्ही गाऊ पांडुरंग || धृ ||
जित्याची ती खोड न जाये मेल्यावीण
विंचू कधी न सोडी आपुला स्वभाव गुण || १||
स्वबळे करावे तांडन दुष्टाशी
सज्जनांचा संग धरावा मानसी || २||
व्यक्ती तितक्या प्रकृती ऐसी असे गती
महादेव तुझं सांगी ओळखावी निती ||३||
16 мар 2024