खूपच सुंदर...तुम्ही कालच्याच विडिओत सांगितले होते की सोयरीक होवो किंवा ना होवो जास्त काळजीत पडु नका...फक्त मनोरंजन म्हणून घ्या...पण तुमचे विडिओच एवढे उत्सुकता वर्धक असतात की आपोआप टेंशन येत प्रत्येक गोष्टीच...कधी कधी तर आम्ही राऊत सरांनाही विसरून जातो एवढे हे सगळे पात्र जवळचे वाटतात...त्यातील घटनाक्रम एवढे मुद्देसूद असतात ज्यांना तोड नाही...आजच्या विडिओतील ट्विस्ट एवढा अनपेक्षित होता की धक्काच बसला...पण त्यामागचा विचार मात्र खरंच खूप मोलाचा आहे...एखाद्या मुलीचे भविष्या असे स्वतच्या स्वार्थासाठी पणाला लावणे हे किती वाईट आहे हे प्रेक्षकांना कळले...तसे सगळ्यांनाच माहीत असलेली ही गोष्ट...पण समाजात हे घडते...शेवटी काय निष्पन्न होते...?तर कलह घटस्फोट मनमुटाव आणी जीवनात क्लेश...देविदास भाऊच्या पात्राने ज्या पद्धतीने हे समजावून सांगितले तेही आमच्या ध्यानीमनी नव्हते...एक उपहासात्मक पात्रही तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने सकारात्मक केले...ही किमया तुम्हीच साधु शकता सर...खरंच ग्रेट आहात तुम्ही...👌👍🙏🙏🙏
वा तुमच्या कमेंटमधून तुम्ही अगदी योग्य विश्लेषण केले आणि राऊत सर तर ग्रेट आहेतच . खरचं अनपेक्षित शेवट होता आजच्या व्हिडीओचा , तरुण पिढीसमोर छान आदर्श मांडला , सुंदर संदेश 👍👍
अप्रतिम विचारशक्ती आहे तुमची अगदी योग्य वेळेवर योग्य नियोजन योग्य निर्णय खूपच महत्त्वाचा आजचा एपिसोड होता असं जीवनातलं महत्त्व खरं तत्वावर जगणारे आपल्या देविदास भाऊ त्यांनी सर्व समाजाला व सर्व एक मौल्यवान संदेश दिलेला आहे अशा खऱ्या बोलून जर सोयरीक होत असेल तर पुढचं जीवन सुखी होईल हा खूप महत्त्वाचा संदेश दिलेला आहे
आजचा भागातील सगळ्यात सुंदर आणि त्रिकाल वादी सत्य असलेले वाक्य म्हणजे 21:10 उंची वैगरे सगळे ढोंग आहे, कर्तृत्वाने जग ही जिंकता येते.Best Dialogue we Heard in this Episode...👌👌
Great great decision by maruti bhau... Reality ke sath jindagi jina bahut hi shandar hai.. Shantaram jaise kuch log apni naak lambi karne ke chakkar me lambi lambi fekte hai..👍🏻😊🙏🏻
सर तुम्ही आडनाव पण असे शोधून काढले की नुसते हसू येते कसं काय सुचते तुमचं तुम्हाला माहित. मारोती भाऊ ची सोयरीक पाहून आम्हाला आमच्या दिवसाची आठवण झाली देविदास भाऊ ने योग्य निर्णय घेऊन सर्वांचे मन जिंकले खरंच देविदास भाऊ मानले तुम्हाला 🙏 🙏 🙏
साडेदहावी 🤣🤣🤣🤣🤣.....व्वा देविदास भाऊ.... 👌🏻 सत्या ची पाठराखण केली तुम्ही राव... मारोतराव काळजी नका करू राऊत गुरुजी तुमच्या साठी एक नमुना तयार करते चॅनेल मध्ये 🤣🤣🤣 थो जो वरचा वाला आहे न बसून थो व्यक्ती श्रीमान सुरेश राऊत सर होय आपले यवतमाळ वाले 😜😜
देविदास काका तुमचे विचार मला नेहमी आवडले आणि मारूती दा नी सत्य accept केल मला खुप छान वाटल Raut sir तुमचे उद्देश खुप छान असतात पण मुलीचा घरच्याना पण माहीती व्हायला होत की रामपुर चे माणसाचे विचार कसे आहे.....💕🙏🤗🌹
अप्रतिम व्हिडिओ बनवला सर आपण खूप चांगल्या प्रकारे सामाजिक संदेश देऊन लोकांचे मनोरंजन करता यापेक्षा सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रकारे वापर केला जात आहे आपल्या चैनल कडून आपल्या चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझ्याशी कोणी क्लासमध्ये सुद्धा आपल्या चॅनलचा खूप वेळेस उदाहरणासाठी उपयोग होतो आपला आकाश सर अकोलेकर
देविदास भाऊ सारखे लोक पाहिजेत,देविदास भाऊ आहेत खरट तुरट पण त्यांचे विचार एकदम भारी आहेत,असे विचार जर प्रत्येकांचे असतील तर खरंच कोणाची चं फसवणूक होणार चं नाही,,,, खरंच सर जी तुमच्या कल्पना शक्तीला प्रणाम,,,
गुरुजी व्हिडिओ फारच चांगला झाला देविदास चे डायलॉग फारच छान होते त्या डायलॉग मधून बरच काही शिकण्यासारखं होतं असा समाज प्रबोधन व्हिडिओ चांगला झाला धन्यवाद
अरे वा जबरदस्त कलाटणी दिली सर , देविदासभाऊ नं मस्त काम केलं . मला काळजीच वाटत होती , एवढे धोरणी माणसं सोबत होते , मार खाणं - भांडण -तंटा बरं नसतं दिसलं . मारतीन एकदम बढीया काम केलं . प्रत्येकाला त्याच्या अनुरूप जोडीदार मिळावा ........ सर्व शांततेनं निपटलं हे जास्त महत्वाचं . जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍🙏
फुल टू धमाल विनोदी.सत्यवान व्यक्ती चांगल्या कामात सुद्धा आपल्या तत्वाशी समजोता करत नाही वा देविदास भाऊ आखिर प्रभाव पाडला.सत्यान वागले म्हणून मार नाही पडला.मारुती न अगदी बरोबर केलं .अप्रतिम बोधात्मक एपिसोड झाला सर
कमालच आहे सर तुमची, आम्ही काही तरी वेगळा च विचार केला होता पण तुम्ही अगदी अनपेक्षित आणि खूप छान ट्विस्ट दिला म्हणजे बहुतेक जणांचे अंदाज नक्कीच चुकले असतील,,,एकदम मस्त 👌👌👌👍 आणि देविदास मात्र एक नंबर रीतीने आणि नावाप्रमाणेच सणसण आणि खणखण बोलणारा माणूस पटलं आपल्याला 👌👌👌👍👍