कालच्या व्हिडिओ मध्ये वर्षाच्या वटभरणीच्यावेळी पुष्पाताईला नाचतांना पाहिललं खूप सुंदर नाचत होती पण एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की, बाबल्याच्या लग्नात दार धरणीच्या वेळेला पुष्पाताईने वर्षाकडे चेडू मागितला होता त्याप्रमाणे वर्षाने चेडू दिलेले आहे, पण पुष्पाताईचे काय, पुष्पाताई गुड न्यूज केव्हा देनार, बाबल्याचा चेडू पुष्पाताईच्या घरात आलं पाहिजे.
किती वेळा हेच विचारणार तुम्ही त्यांना..खुप चुकीचं आहे हे, एका स्त्रीला तिच्या मातृत्वा वरून सारखं वीचारन, त्यांचं काही प्लॅनिंग असेल किंवा काही प्रोब्लेम असेल. अस नाही विचारायचं एका स्त्रीला 10 वेळा तेच तेच.
विनय,बाबू ,पूनम,पुष्पा तुमचे व्हिडिओज मी रोज परत परत बघते. खुप छान आणि शांत वाटतं मनाला. गाव तर फारच सुंदर आहे तुमचं. पाऊस कमी झाला की पुनमच्या अंगणात पार्टीचा व्हिडिओ करा. पूनम,आताच तुझा वांग्यांच्या कापांचा अंगणातला, व्हिडिओ बघितला. पाणी सुटलं तोंडाला......अंस अंगण आणि तिथे बसून जेवण,हे आईकडे ,नागपूरला आम्ही ऊन्हाळ्यात ,रात्री करत होतो. पण इथे मुंबईत शक्य नाही ते. त्यामुळेच तुमचे व्हिडिओज बघून जुने दिवस आठवते.😅