इतक्या छान मोकळ्या निसर्ग रम्य वातावरणात इतकी ताजी ताजी खुडून आणलेली भाजी आणि गरमागरम भाकरी खाण्याचे सुख तुम्हाला लाभले आहे दादा, नशीबवान आहात तुम्ही आणि पालकाची भाजी तर एक नंबर👍👌👌
गाईच्या माथ्यावर सुर्य चे दर्शन झेंडूची फुले दगडी फुलं वर खूप छान सुंदर फुलपाखरू नक्षी दार बघून मन प्रसन्न झाले रेसिपी ही छान खूप छान निसर्ग सौंदर्य दाखवल्या धन्यवाद
खूप छान बनवली लसूणी पालक. ताजी पालकाची जुडी मिरची कोथिंबीर सगळी ताजी भाजी. खायला नाही मिळालं तरी चालेल पण बघून समाधान होतं. आम्ही बाजारातून पालक घरी आणे पर्यंत तो कोमजले ला असतो. दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏.
भाऊ आपल्याच शेतावरचि भाजी कशी वहिनी बनवताना आमच्या तोंडाला पाणी सुटते आणि शेतावर येऊन खायला बसावे अशी इच्छा होते. वहिनींना म्हणाव जेवण जरा जास्तच बनवा अकस्मात आम्ही तुमच्या कडे येऊ जेवायला. 🤩😍
दादा खुप मस्त सीनने सुरुवात केली आहे तुमच्या या सीनमुळे मनाला प्रसन्नता वाटली सकाळच्या वातावरणाचे शूटिंग खुप मस्त सीन, दादा वहीनी खुप कष्टाळू आहेत भाजी शेतातून आणण्यापासून त्या सगळी तयारी करून अाम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवत असतात ते ही चूलीवर या रेसीपी साठी वहीनींना माझा नमस्कार 🙏🙏 अाणि आजची पालकाची रेसिपी खरोखर लाजवाब, मस्त, नादखुळा मी आज ही रेसीपी करणारच दादा खूप मस्त या रेसीपी साठी 👏👏🌹🌹💐💐🙏 🙏
तुमचा video पाहून भाजी केली, छान चव आली. आम्हाला जास्त झणझणीत वाटली, कदाचित मिरची तिखटवाली वापरली असे वाटते. आता अशीच बनवेन नेहमी. खर तर फोटो पाढवायला हवा होता, विसरले.🌷