Тёмный

वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट | A documentary on Betel leaves of Vasai 

Sunil D'Mello
Подписаться 132 тыс.
Просмотров 183 тыс.
50% 1

वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट
एकेकाळी वसईतील केळी व सुकेळींसोबतच वसईची विड्याची पानं सुप्रसिद्ध होती व ही पानं लाहोर आणि पेशावरला निर्यात केली जायची ह्यावर कदाचित आज कुणाचा विश्वास बसणार नाही. पानवेल हा वसईचा मुख्य व्यवसाय होता व हिंदू व ख्रिश्चन वाडवळ समाज ह्यात अग्रेसर होता. आता हे वैभव लयास जात आहे व केवळ एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पानवेल शेतकरी वसईत उरले आहेत.
आज वसईतील देवाळे ह्या गावातील श्री. नरेंद्र पाटील ह्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत व जाणून घेणार आहोत,
१. पानवेलींची लागवड
२. ह्या व्यवसायाचा इतिहास
३. सद्यपरिस्थिती
४. ह्या व्यवसायासमोरील आव्हाने
५. ह्या व्यवसायाचे भवितव्य
आपल्याला हा व्हिडीओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
श्री. नरेंद्र पाटील, देवाळे ९७३००७३१०७
श्री. हरिष पाटील, मांडलय
श्री. मनीष म्हात्रे, नाळे
डॉ. नॅन्सी डि'मेलो, गास
छायाचित्रण व संकलन
अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
सफर वसई किल्ल्याची
• सफर वसई किल्ल्याची | व...
प्राचीन वसईचा इतिहास
• प्राचीन वसईचा इतिहास |...
वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
#vasaiculture #betelleaf #vasaifarming #vasaidocumentary #sunildmello

Опубликовано:

 

16 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 838   
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 года назад
सुनिलजी नमस्कार. श्री. नरेन्द्र पाटील काकांच्या पानांच्या माळ्याचा एपिसोड मी आणि माझ्या बायकोने आज पाहिला.योगायोग म्हणजे, माझे आजेसासरे देखील पानवेलीची शेती मौजे काळसे, तालुका मालवण जिल्ला सिंधुदुर्ग येथे करत होते. श्री. पाटील काकांच्या कष्टाला आणि जिद्दीला लाख लाख सलाम. शेतमालाला मागणी नसताना देखील प्रामाणिकपणे आपल्या पानांच्या माळ्याची मशागत श्री. पाटील काका करतात हे पाहून त्यांचा अभिमान वाटतो. काहीसे दुःखं ही होते कारण आज पारंपरिक शेती आणि शेतकरी लुप्त होणाच्या मार्गावर आहे. खरं तर आज काळाची गरज शेती आणि शेतकरी ह्यांना वाचविणे होय.पुन्हा एकदा पाटील काकांचे व तुमचं खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा. शक्य झाले तर तुमच्या सारख्या स्थानिक जिद्दी तरूण मंडळींनी ह्या कामी पुढाकार घेतला पाहिजे तरंच ही पारंपरिक शेती आपण वाचवू शकू. ह्या कामी माझ्या कडून काही मदत होऊ शकल्यास कृपाकरून मला सांगा . मला शेतीची खूप आवड आहे पूण माझे गाव फारच दूर सावंतवाडीला आहे त्यामुळे माझें शेती करण्याचे चे स्वप्न केव्हा साकार होईल ते माहित नाही. पण श्री. पाटील काका सारख्या लोकांनी पारंपरिक शेती चालू ठेवावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. परमेश्वराकडे प्रार्थना की ह्या देशातील शेती आणि शेतकरी हयांना चांगले दिवस येवोत.
@joyfargose9416
@joyfargose9416 3 года назад
सुनील डिमेलो जी आपण वसईतील शेतीच्या माहितीचे संकलन करता ते अत्यंत स्तुत्य आहे, या वसईतील शेतीच्या माहितीच्या संकलनाबरोबरच वसईतील शेतीच्या संवर्धनासाठी वसईतील स्थानिकांना प्रयत्न करण्याचे आवाहन देखील करावे हि विनंती विनंती.👍👍 कारण आजकाल शेतजमीन विका आणि पैसे कमवा अशी स्थिती निर्माण झालेली आहे..स्थानिकांनो शेती करा ,शेती टिकवा व शेत जमिनी विकू नका 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
ह्या माध्यमातून हेच सर्व दाखवायचा प्रयत्न असतो. आम्ही अजून प्रभावीपणे हा मुद्दा मांडायचा प्रयत्न करू. शेती टिकायलाच हवी. धन्यवाद.
@suryakantbhoir9133
@suryakantbhoir9133 2 года назад
sir ha video uplode करून नगवेल ची माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. Sir मला हा गाव नकाशा मध्ये मिळत नाही काही मदत करू शकता का जेणे करून ह्या वेळी बदल माहिती घेऊन तिथून रोपे विकत घेऊन लागवड करावी असा विचार चाललय
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 Год назад
एका वसईत किती विविधता आहे कितीतरी व्हिडिओ एका वसई वर बनू शकतात , खूप सुंदर मन जिंकलंस भावा
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@kishorvartak3819
@kishorvartak3819 3 года назад
सुनीलजी आपण फारच चांगली माहिती जतन करत आहात त्याबध्दल आपले खास अभिनंदन. आमच्या देवाळे गावातील पानवेल ही एकेकाळी फारच प्रसिध्द होती.त्यावेळी बिबला म्हणजे बदामाच्या आकाराचे मोठे पान,त्यानंतर आडक् म्हणजे मिडीयम आकाराचे पान आणि छोट्या पानाला मोडवण असे संबोधले जात असे.आमचे आजोबा कै.पदमणशेठ वर्तक हे त्याकाळी पानवेली ,केळी व सर्व प्रकारच्या भाजीपाला ह्या मध्ये बागायती शेती करण्यात प्रसिध्द होते.त्यावेळी पाने पाकिस्तानला पाठविली जात असत त्यामुळे चांगला भाव मिळत असे.पुढे पुढे भारत सरकारने पाकिस्तान बरोबरचे संबंध बिघडल्याने हा व्यापार बंद केला.त्यामुळे देशा अंतर्गतच सिमीत राहिला.पुढे पुढे होळीच्या बाजारामध्ये माल जास्त व व्यापारी कमी झाले.काही सदन शेतकरी एकत्र येऊन सोसायटी स्थापन केली परंतु फार काळ टिकली नाही.त्यावेळी देवाळे गावात घरोघरी पानवेल लावली जात असे.लिहीण्या सारखे पुष्कळ आहे 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
किशोर जी, आपण आपल्या प्रतिक्रियेतून पूर्ण इतिहास उभा केलात. खूप खूप धन्यवाद.
@SaratGodbole
@SaratGodbole 3 года назад
देवाळे गावाकडे वसई स्टेशनवरून कोणती बस जाते? देवाळे गाव कुठून जवळ पडेल? नालासोपारा/ नायगाव/वसई स्टेशन?
@sunitapatil7860
@sunitapatil7860 3 года назад
@@SaratGodbole वसई
@sachinlimaye6006
@sachinlimaye6006 2 года назад
सुनील जी नमस्कार आपण माहिती दिल्यामुळे खूप सार ज्ञान झालं धन्यवाद ईश्वर तुम्हाला तुमच्या कार्यात यश देवो
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@lavetdabre9116
@lavetdabre9116 3 года назад
उत्तम माहितीपट... वसईत राहूनही वसई बद्दलची अज्ञात बाजू तुमच्यामुळे नेहमी पुढे येते. 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूब खूब आबारी, लवेट
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 года назад
सुनील,खरंच बाबा कमाल तुमची किती अस्खलित मराठी बोलता. ऐकत राहावंसं वाटतं आणि हे नरेंद्र काका पण खूप छान माहिती सांगतात.पानवेलीची लागवड आणि मळे मी पहिल्यांदाच पाहिले.धन्यवाद..पण एक मनोमन इच्छा आहे जमल्यास एकदा तुमच्या वसई गावाला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायची.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वसईला आपलं स्वागत आहे, संदीप जी. नक्की या, धन्यवाद
@nandkumarnalawade5439
@nandkumarnalawade5439 3 года назад
त्रयोदशी - गुणी आरोग्यवर्धक पानविडा ! घालवी मुखदुर्गंधी व कफाची पीडा !! सुरेख व ज्ञानवर्धक माहिती !!! कोणे एके काळी एखादे कठीण काम करण्यासाठी ' पैजेचा विडा ' उचलत असत !!!! त्याकाळी ह्या विड्याला असणारं महत्त्व ही बाब अधोरेखित करते . सुरेख माहिती , धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह! आपल्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, नंदकुमार जी
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 года назад
सोमवंशी क्षत्रिय पाठारे हया समाजातील ‌लोक......पण वाडीत जे काम करत त्यांना वाडवळ म्हटले जाते आणि जे पानांची लागवड करत ... त्यांना पानमाळी असे संबोधले जाते...बिंबराजाचे वंशज आम्ही...!! छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपण पुरवलेल्या ह्या महत्वपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
@cynthiafernandes8477
@cynthiafernandes8477 3 года назад
@@sunildmello ~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@cynthiafernandes8477
@cynthiafernandes8477 3 года назад
@@sunildmello ~~~
@cynthiafernandes8477
@cynthiafernandes8477 3 года назад
@@sunildmello🇦🇮
@cynthiafernandes8477
@cynthiafernandes8477 3 года назад
0 .
@mohanchipte4612
@mohanchipte4612 3 года назад
सूनिलजी अभिनंदन .खूपच छान माहिती दिली आपन खेळीमेळीने घेतलीली मुलाखत मनाला भावली.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@digamberthorve106
@digamberthorve106 6 месяцев назад
नागवेळी पानाबाबत चांगली माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 6 месяцев назад
धन्यवाद, दिगंबर जी
@ashwinipokle8089
@ashwinipokle8089 3 года назад
सुनील जी तुम्ही जो हा उपक्रम चालवला आहे तो फारच स्तुत्य आहे , आता आयुर्वेदिक उपचारासाठी विड्याची पाने वापरण्यावर भर दिला आहे। त्यामुळे व चुना ह्यामुळे आपले शरीर स्वास्थ्य वाढते। तेव्हा हा उद्योग दिवसेंदिवस वाढो हीच प्रभू चरणी प्रार्थना।
@sunildmello
@sunildmello 3 года назад
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@pratiksalvi2217
@pratiksalvi2217 3 года назад
प्रेसेंटेशन स्किल अप्रतिम.... भाषा शुद्ध.. आणि त्यावरील प्रभुत्व एकदम झक्कास....
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, प्रतीक जी
@ashieshsarpotdar2270
@ashieshsarpotdar2270 3 года назад
नरेंद्रकाका खरंच ग्रेट आहेत किती प्रसन्न आणि उत्साही आहे त्यांचं व्यक्तिमत्त्व! ..खूप आवडला व्हिडीओ👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, काका खूपच उत्साही आहेत. धन्यवाद, आशिष जी
@ashokjadhav2394
@ashokjadhav2394 3 года назад
👌मातीचा सुगंध जपनारे आपल्या निरमळ कोकंणी माणसांची परीसरतील पध्दती व भाबडेपणा पाहून मन हेलावले.😢💐 👋आमचा आशीर्वादच सर्वाना.🌷🌿🌷🇮🇳
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@durgakulkarni4802
@durgakulkarni4802 12 дней назад
खुपचं छान माहिती दिलीत आपण नरेंद्र काकांनी आणि दादांनी आमच्या पर्यंत पोहचवलीत खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@sunildmello
@sunildmello 8 дней назад
खूप खूप धन्यवाद, दुर्गा जी
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 3 года назад
Sunil Dimelo Thanks Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan Sunil bhau pudil karyas hardik shubhecha 👍💐🌹⚘🚩🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, दीप जी. जय हिंद! जय महाराष्ट्र!! जय कोकण!!! वंदे मातरम्!!!!
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
🙏👍सुनील सर आणि अनिषा ताई यांस अभिवादन....!!!! सदर वसई गावातील देवाले गाव आणि त्यातील नरेंद्र पाटील यांची विड्याची पाने, पानवेल, नागवेलीची पाने याची शेती म्हणजे पारंगत बागायतदार यांच्या शेती विषयक अहर्निश मेहनतीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल.👍अप्रतिम, छान, सुंदर अशीच चित्रफीत. काकांनी सुंदर असे वर्णनात्मक माहिती सुनील सराना दिली आणि सरांनी अतिशय धूर्तपणे, चतुराईने, जिज्ञासू वृत्तीने काकांकडून माहिती मिळवली आणि अविस्मरणीय असा माहितीपट प्रदर्शित केला.🙏❤️👍👍👍 सदर चित्रफीत याचा स्तर म्हणजे जादुई म्हणजेच ऑस्ट्रेलिया चे नामवंत , सुप्रसिद्ध गोलंदाज ग्लेन McGrath यांची तुफानी भेदक ,स्विंग, जादुई गोलंदाजी.भले भले त्यांच्या गोलंदाजी समोर नांगी टाकत असे, अक्षरशः ढेपाळायचे👍❤️🙏 सुनील सर या यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर असे दुर्मिळ चित्रफिती कार आहेत की त्यांची एक चित्रफीत, माहितीपट, लघुपट म्हणजे १०० चित्रफीत एवढी बरोबरीची आहे असे माझे मत आहे.🙏अनिशा ताई यांचे चित्रीकरण आणि सुनील सरांची, सौहार्द पूर्ण, जिव्हाळा युक्त, प्रेमळ, ह्रदयस्पर्शी,👍👍❤️👍🙏👌💯✌️❤️✌️ मंत्रमुग्ध अशी संवाद शैली यांचा समन्वय म्हणजे यश चोप्रा यांच्या चित्रपटातील आरस्पानी सौदर्य सारखे असते.👍❤️ 👍मांडव तील उतरण, हरल, धाड हे शब्द अनोखे , विस्मयचकित करणारे असेच.👍 म्हणूनच ज्यावेळी सर्व शांत असते त्यावेळी सुनील सरांसारखे दुर्मिळ चित्रफीत कार रुपी वादळ अश्या आशय, विषयाचे रोचक, रंजक माहितीपट, लघुपट, वैविध्यपूर्ण चित्रफिती अश्या स्वरूपात घेऊन येते. या यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर हे वादळ घोंघावत असते त्यावेळी भले भले आश्चर्यचकित होऊन पाहत बसतात..👍❤️👍🙏.असो..👍 देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏 चूक भूल असेल तर क्षमस्व 👍🙏 Free Lancer Conference Stenographer 🖲️💻⌨️🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
गिरीश जी, आपल्या प्रतिक्रियेची मी नेहमी वाट पाहत असतो कारण आपण पूर्ण व्हिडीओ पाहून विस्तृत आणि मार्गदर्शनपर प्रतिक्रिया देता. खूप खूप धन्यवाद.
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 3 года назад
नेहमीप्रमाणेच अतिशय सुन्दर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ! सुनीलजी तुम्ही ज्याप्रकारे मुलाखती घेता तशा सुन्दर, ओघवत्या आणि शुद्ध मराठीतील मुलाखती मोठमोठ्या टीव्ही चॅनेल्सच्या अँकर्सनाही जमत नाहीत. आणि वर त्यांची मराठी भाषाही तुमच्या इतकी शुद्ध नसते. तुमचे उच्चार म्हणजे घासून लखलखीत केलेल्या शुद्ध स्फटीकासारखे नितळ आणि सुंदर असतात. 👌 आणि आपल्या प्रत्येक मुलाखतीत तुम्ही प्रत्येक बारीक सारीक मुद्दा टिपता हेही खूप कौतुकास्पद आहे. उत्तम निरीक्षणशक्ती असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि प्रत्येक मुलाखतीअगोदर तुमचं त्या मुलाखतीबाबतचं Home Work ही नक्कीच असणार. ते तुमचं Home Work ही नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. Keep it up! 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
जयदीप जी आपण नेहमीच खूप छान प्रतिक्रिया देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 3 года назад
@@sunildmello धन्यवाद.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 года назад
शेतकरयांचया समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही.त्यांना हमी भाव मिळायलाच हवा.तरच शेतकरी तग धरुन राहील,नाहीतर पुढचा काळ आणखी कठीण असेल त्यांच्यासाठी असच वाटत राहत. सुनिल तु काकांना चांगल बोलत केल,योग्य प्रश्न विचारले त्यामुळे सविस्तर माहीती पानवेलीच्या शेतीबाबत मिळाली.काकांनाही धन्यवाद. वसईच्या लौकिकात भर टाकणारा हा शेतकरी आणी बागायतदार टिकला पाहीजे त्यासाठीच्या तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाव.येणारया पिढीने हा निसर्ग आणी परंपरा जपायला हव्यात हीच आशा बाळगुन आहोत आम्हीही. नेहमीप्रमाणेच हाही विडिओ छान होता. खुप खुप..... धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺 khup khup... DHANYWAD
@sunildmello
@sunildmello 2 года назад
हो, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळायला हवा. धन्यवाद, मंगेश जी
@anantparayane927
@anantparayane927 3 года назад
नष्ट होत चाललेल्या वसईतील शेती वाडीची तुझी आस्था खरोखरच प्रशंसनीय आहे...धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अनंत जी
@manohargarmale4054
@manohargarmale4054 3 года назад
खुप छान वाटलं. आवडीने पाहीले व ऐकले, नरेंद्र साहेबांनी खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, मनोहर जी
@NehaThakur-wj8us
@NehaThakur-wj8us 3 года назад
खूप छान माहितीपट...प्रथमच एवढी नागवेलीची पान पहिली..… आपुलकीने माहिती सांगण्याचा काकांचा उत्साह आवडला.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
@ashokdawande9542
@ashokdawande9542 3 года назад
भाऊ तोरसेकर, आपण आजारी असल्याचे स्वतः सांगीतले.आपण या आजारातुन लवकर बरे व्हावे हिच परमेश्वर चरनी प्रार्थना. अशोक दवंडे, वर्धा.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अशोक जी, बहुतेक आपल्याला ही प्रतिक्रिया भाऊंच्या चॅनलवर टाकायची होती ती चुकीने येथे टाकली गेली आहे. धन्यवाद
@Nishan29nandaimata
@Nishan29nandaimata 3 года назад
सुनिल दादूस तुमच्या चॅनेल मुळे वसई वरील प्रेम द्विगुणित झालं👌👌 काकांचे सुद्धा विशेष आभार. ज्यांनी सविस्तरपणे अप्रतिम माहिती दिली.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, निशांत जी
@kolisandesh260
@kolisandesh260 3 года назад
पनवेल ला सुद्धा पूर्वीच्या काळी पानवेलांची प्रचंड लागवड व्हायची....त्यावरूनच पनवेल हे नाव पडले
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 года назад
Good information
@sunildmello
@sunildmello 3 года назад
ह्या महत्वपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@gayatripatil3165Ji, thank you.
@nutanmhaske84
@nutanmhaske84 5 месяцев назад
मी तुमचे video नेहमी बघते वसई तील शेती चे video दाखवता मस्त आहे माहिती मिळते असेच नविन व्हिडिओ दाखवा
@sunildmello
@sunildmello 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, नूतन जी
@aparnajadhav530
@aparnajadhav530 Год назад
वसई माझ आवडते ठिकाण आहे कारण मी वज्रेश्वरी ला वसतिगृहात शिकायला होते.एके दिवशी आई म्हणाली आपण वसई वरून ट्रेन ने जाऊ आणि आम्ही दोघी निघालो ट्रेन हळू हळू निघाली आणि पाहते तर काय ते वसई च रूप हिरवा शालू च जणू पांघरूण नटली आहे खूपच सुंदर तो देखावा होता मी दोन मुलांची आई झाले .पण ते वसई च सौंदर्य अजून ही माझ्या डोळ्यात साठवून ठेवले आहे. Thank you, and God 🙌bless You my small brother. Love you
@sunildmello
@sunildmello Год назад
वाह, आपल्या आठवणी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
@nixonrod
@nixonrod 3 года назад
छान माहिती दिलीत, आभारी आहोत 🙏🙏👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूब खूब आबारी, निक्सन
@prashantbarde2189
@prashantbarde2189 3 года назад
सुनील बाबा किती रे छान मुलाखत घेतो किती रे डिटेल माहिती खूप छान , पार वंशज पासून ची माहिती शेती ची ही खूप सारी माहिती
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी
@manojpatil2024
@manojpatil2024 3 года назад
सुनील,अप्रतिम आपल्या शेतकरी मित्राचे वास्तव जगासमोर आणले,अभिमान वाटला .👍👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मनोज जी
@tejaswidharnaik7839
@tejaswidharnaik7839 3 года назад
खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकर्‍यांची इतके वाईट वाटते पण तुमचा विडिओ खुपच आवडला छान वाटले हिरवी हिरवी पाने पाहून 🙏🙏👏👏👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, तेजस्वी जी
@francisdsouza7556
@francisdsouza7556 3 года назад
Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Francis Ji
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 3 года назад
हो आम्ही नेहमीच तांदुळ,केळी आणि आमच्या आत्या काकी आणायला स्पेशल वसईला यायचो.एकोणीसे पच्याहत्तर पर्यंत येत होतो.नंतर आई पण वारली. आईला खूप वेड होत वसईच.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हा व्हिडीओ पाहून आपल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या...धन्यवाद, ऊन्नी जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 года назад
अशी चांगली शेती व चांगल्या गोष्टींची लागवड..आता नामशेष होताना पाहून खूप वाईट वाटते...मागच्या पिढीकडून शिकून जरा नव्या पिढीने पुढे नेले नाहीतर हे त्यांचे अनुभव व कला फुकट जाणार...वसईत तरी हे टिकून राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना...छान video
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर बोललात, रश्मी जी. धन्यवाद
@bandya1000
@bandya1000 3 года назад
सुनील, उत्तम माहिती आणी मेहनत घेत आहेस त्याबद्दल तुझे आभार
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@dhirajvartak9827
@dhirajvartak9827 3 года назад
खूप छान माहिती आपली वसई सुंदर हिरवीगार वसई
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपली वसई, सुंदर वसई धन्यवाद, धीरज जी
@shundi5
@shundi5 3 года назад
अप्रतिम माहिती. किती सुपीक आहे वसईची जमीन. काकांना मनापासून सलाम. आम्ही जेवल्यावर रोज पान खातो क्लोरोक्विल मिळत त्याने. हळहळ वाटली या धंद्याचं गणित आता बिघडत चाललंय हे ऐकून.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@vmcontent
@vmcontent 3 года назад
मला वाडवळ शब्दाचा अर्थ आता कळला. हा खरोखर खूप माहितीपूर्ण विडिओ आहे. धन्यवाद दादा.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, विकी जी
@hedvijusrumao7899
@hedvijusrumao7899 3 года назад
खूप छान माहिती दिलीत . बर्याच प्रकारची शेती कमी होत चालली आहे. त्यात पानवेलची सुध्हा. ती टिकायला पाहिजे.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
एकदम बरबर...आबारी हेडविजस जी
@shailapereira2276
@shailapereira2276 3 года назад
तुमचा व्हिडीओ पाहून लहानपणची आठवण झाली. आम्ही लहान पणी पनवेलीत लुपाछुपी खेळायचे. खरोखरचं तो सोनेरी काळ होता. Thank you very much.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, शैला जी. गेले ते सोनेरी दिवस व राहिल्या त्या आठवणी. धन्यवाद.
@sanketchaudhari7539
@sanketchaudhari7539 3 года назад
सुनील व नरेंद्र , सुंदर माहिती विशेषतः नव्या पिढीला या विडीओतून दिल्याबद्दल खूप खूप आभार .सध्याच्या तरुणावर वाडीत जाऊन काम करण्याचे संस्कार झाले नाहीत अर्थात त्याला आमची पिढीदेखील जबाबदार आहे . आमचे गाव किरवली.एकेकाळी फुलांचे गाव म्हणून सुप्रसिद्ध होते.पण आज जास्वंदी शिवाय दुसरी फुले दिसत नाही . केळी, नारळ सुपारी सर्वत्र दिसते . फुलांची शेती परवडत नाही . एक हौस म्हणून वाडी करतोय फुलांच्या वाडीची गत पानवेलीसारखी होईल अशी भिती वाटते .मी दिलीप चौधरी. (संकेत चे बाबा )नरेंद्र माझे मित्र आहेत .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
दिलीप जी, आपण जी व्यथा व्यक्त केली आहे ती थोड्याफार प्रमाणात सर्वच वसईकर शेतकऱ्यांची व्यथा आहे. आपण वेळीच जर योग्य पावलं उचलली नाहीत तर हळूहळू वसईतील शेतीव्यवसाय नामशेष होण्याची भीती आहे. धन्यवाद.
@ketanpawar1335
@ketanpawar1335 3 года назад
Kaka, kharokhar Vasaikarnchi vyatha Sunil aani Tumhi mandli aahe. Pan aatta baryach lokana hya naisargik gostinche aani sendriya shetiche mahatva patale aahe. Far lavkar hi paristhiti badlel. Thode netane chalu theva. Swatah aamchya sarkhe barech lok aasha vyavsayat utartil aani hya sendriya shetiche samvardhan pan hoil aani Vasaikar shetkari pan sukhi hoil. We have positive hope. Thanks.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@ketanpawar1335 Ji, wow! what a positive attitude you have got. Such approach will definitely boost the moral of the farmers. Thanks a lot.
@jyotipatil4257
@jyotipatil4257 3 года назад
आमच्या विदर्भात सुध्दा पानमळे आहेत त्या शेतीला पानाचे शेती ऐवजी तांडेे म्हणतात आणि शेती करणार्या जातीला बारी समाज म्हणतात . बाकी विडीयो 👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह, ह्या नाविन्यपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@prabhavativartak5369
@prabhavativartak5369 3 года назад
वसई बागायती चा हा अनमोल ठेवा जपायला हवा .शासनाने दखल घेऊन हमी भाव द्यावा. शेतकरी हा सगळ्यांचा पोशिंदा आहे. तोच असा दुर्लक्षित राहिला तर....... खूप छान माहिती दिलीत काका तुम्ही. त्याबद्दल धन्यवाद.
@oslerpereira1262
@oslerpereira1262 3 года назад
V true
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर बोललात तुम्ही, प्रभावती जी व ऑस्लर जी. धन्यवाद
@sonalsawant3729
@sonalsawant3729 3 года назад
सुनिलजी तुमची बोलण्याची पद्धत . भाषा उत्तम
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सोनल जी
@florydais9955
@florydais9955 3 года назад
I am glad to tell i have got this plant in my garden. Garden is my passion.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Yes, this is a very useful plant and one should have it in the garden. Thank you, Flory Ji.
@ankitamanjrekar3730
@ankitamanjrekar3730 3 года назад
Mazi sasaruwadi mulchi naigaon koliwadyachi ahe. Mumbaicha wadhtya Seema ani wadhatya shaharikaranamule lupt hot chalalelya sthanik goshti, parampara, nisarga pahun faar wait watate. Tumhi tumcha video madhun he mahiti pudhachya pidhisathi sathi jatan karun thevtay tyabaddal Khup khup abhar ani shubbheccha tumchya pudhchya watchalisathi.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अंकिता जी
@arundeshmukh4382
@arundeshmukh4382 3 года назад
Too good. We must preserve our culture. And mr. Sunil is doing a great job in doing so.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Arun Ji
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 года назад
विड्याची पान बद्दल खूप छान माहिती दिली आपण, विड्याची पाने फक्त दुकानात पहिली पण त्याची शेती कधीच पहिली न्हवती किंवा त्याची लागवड कशी करतात माहीत न्हवते, आपण ती माहिती दिली व शेतकरी काका यांची व्यता मांडली त्या बद्दल धन्यवाद. छान वाटले हिरवीगार शेती पाहून😊👍👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@SuhasMali
@SuhasMali 3 года назад
सुनील भाऊ मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात तुमच्या सगळ्या व्हिडिओ मुळे मी वसईच्या प्रेमात पडलो आहे वसई पालघर जिल्हा मला फार आवडले
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@cinderellamiranda9864
@cinderellamiranda9864 3 года назад
I hv seen this Panvali when I used to go for Holiday in Giriz. Ladies in lugra used to sit on the big verandah and stack the beetle leaves. Brought back my memories. Thks Sunil
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Yes, good old days and memories. Thank you, Cinderella Ji.
@jyotikishorrewatkar2262
@jyotikishorrewatkar2262 3 года назад
Khupch chhan mahiti.aawadali.kakacha anubhav,mehanat prachand aahe.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी खरं, धन्यवाद, ज्योती जी
@pralhadbhople4564
@pralhadbhople4564 3 года назад
Khup Chhan Mahiti dili Panvelichi,Sunil bro Thanks!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, प्रल्हाद जी
@tejasghag9465
@tejasghag9465 3 года назад
Sunil khup chan mahiti Dil Badaltujhe aabhar🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, तेजस जी
@sniperking4901
@sniperking4901 3 года назад
Sunil sir..U shoukd Start Some initiative to Help These Farmers reach good and Effective markets
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Yes, there are certain bodies who are already working on this. Thank you for your suggestion.
@royalart3002
@royalart3002 3 года назад
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूब खूब आबारी, रॉयल
@shekharshinde7196
@shekharshinde7196 3 года назад
खूप छान माहिती. त्यासाठी धन्यवाद, तुम्हाला आणि नरेंद्र काकांनाही. 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, शेखर जी
@madhumativarma232
@madhumativarma232 3 года назад
Sunil thank you so much for this wonderful video, I enjoy the history of plantation and the know how of it. Thanks. God bless.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Madhumati Ji
@maryfalcao8822
@maryfalcao8822 3 года назад
Wah, sunil u r doing very nice work,I appreciated u, great, keep it up
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for the kind words, Mary Ji
@preetijs9629
@preetijs9629 3 года назад
वाह... खूप सुंदर माहिती दिली काकांनी! व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमचे आभार 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, प्रीती जी
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
अरेरे दादा पानवेली / नागवेली / विड्यांची पाने / खाण्यांची पाने वेलींचा हा अमुल्य ठेवा कोणत्याही परिस्थीतीत नामशेष होता कामा नये . किती सुंदर हिरवीगार वेली आहेत ह्या . आणि आपण जी माहीती सुंदररित्या सादर केली . त्या बद्दल धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, विलास जी हा ठेवा कायम राहावा हीच मनोकामना. धन्यवाद
@charukulkarni4758
@charukulkarni4758 3 года назад
Khupacha sunder niga rakhaliy.🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, खूळ काळजी घेतात काका. धन्यवाद, चारु जी
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 3 года назад
Thank you for this informative video. It does resound with the early days of Vasai.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Nisha Ji
@joedmello8406
@joedmello8406 3 года назад
Excellent video Lovely place full of greenery Thanks
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Joe Ji
@sameerraut9754
@sameerraut9754 3 года назад
Khupch Sundar mahiti dilit tumhi ani kakani pan changla explain kela about wadval ani panvelichya vyavsayabaddal.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, समीर जी
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 3 года назад
Khup Chan ani Vegla ahey Video, khup avadla hi, Tujhya Navin Video chi Vatt baghat hotech Thanks Sunil
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, माया जी
@jayantnaik9338
@jayantnaik9338 3 года назад
खूप छान माहिती धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, जयंत जी
@gurunathkale8895
@gurunathkale8895 3 года назад
फारच छान छान माहिती मिळाली मागे तुमचा वसईचा केलेवाला हा पण व्हिडीओ छान होता सविस्तर माहिती मिळते शेतकऱ्याचे दुःख पण समजले काळाचा महिमा दुसरे काय तरुण पिढीला यातुन बरेच शिकण्यासारखे आहे
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी खरं बोललात गुरुनाथ जी. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.
@Gamerzone-fg3qu
@Gamerzone-fg3qu 3 года назад
Khup chaan mahiti panveli chi. Paane dry karun Kahi via product kele tar Khup change ahe. Fakt dry karun Sugandhi pan supari banavili jate.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, पाने सुकवून त्यापासून काही पदार्थ करता येईल का ही कल्पना खूप छान आहे. धन्यवाद
@neenasalvi2090
@neenasalvi2090 3 года назад
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, नीना जी
@radhikadiksha1507
@radhikadiksha1507 3 года назад
खुप सुंदर माहीती👌🙏 सुनील
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, राधिका जी
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 3 года назад
फारच छान सुंदर माहिती
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, आनंद जी
@smitam6856
@smitam6856 3 года назад
सुंदर video.छान माहिती .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, स्मिता जी
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 3 года назад
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद !!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, सोजा जी
@Vijaykadam11
@Vijaykadam11 3 года назад
खुप चांगली माहिती, छान
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, वैष्णवी जी
@sangramkachare5586
@sangramkachare5586 3 года назад
खूप सुंदर माहिती दिली आहे.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, संग्राम जी
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 3 года назад
छान माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, राजेश जी
@-lj2nl7in8j
@-lj2nl7in8j 3 года назад
खूप छान व्हिडिओ बनवला आहे . बावीस दिवसात परत पाने येतात .....असे काका म्हणत आहे आमचा तर कुंडीत लावलेला वाढतच नाही .....😀 काकांनी एवढी मोठी वेलं तोडून आणली जीव जडून गेला ते बघून....😀 ...
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, ह्या वेली व त्यांचा रंग खरोखर मनमोहक आहेत. धन्यवाद, चारुलता जी
@jyotipatil6202
@jyotipatil6202 3 года назад
Khupch chan mahiti purn video.asach prakarchi panvelichi lagvad amachya kelva mahim district palghar yethe suddha keli jate. Ani vishesh mhanje amachya kade ajunahi pan velichi lagvad keli jate.amhi tar laxmich manto.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
बरोबर ज्योती जी केळवे-माहीम परिसरात अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर पानवेलिची शेती केली जाते. धन्यवाद
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 3 года назад
धन्यवाद सुनिल सर आपण छान माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, शशिकांत जी
@akash338
@akash338 3 года назад
Thank you for this video.... This leaf is one-off the best antioxidant for human body
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you for the valuable information, Akash Ji
@sweendias8908
@sweendias8908 3 года назад
It is very healthy, one must plant in backyard !
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Absolutely, thank you, Sween Ji
@nayannarvekar7198
@nayannarvekar7198 3 года назад
उत्तम माहिती, छान व्हिडिओ, चित्रीकरणही उत्तम.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, नयन जी
@tinasoureen2595
@tinasoureen2595 3 года назад
Beautiful video and pretty detailed information never knew about this🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Tina Ji
@g.rupesh5043
@g.rupesh5043 3 года назад
Vasai khupch bhari aahe.... Kaay mast gaon aahe...
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, रुपेश जी
@vijayshenoy3636
@vijayshenoy3636 3 года назад
Khoop sundar mahiti Diljit tumi dhanyavad ...
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, विजय जी
@chandrashekharjakhalekar1746
@chandrashekharjakhalekar1746 3 года назад
उत्तम माहिती मिळाली. आभारी आहे.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, चंद्रशेखर जी
@Jaybajrangbali1253
@Jaybajrangbali1253 3 года назад
Very nice and informative video, thank you sunil.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Shridhar Ji
@subhashkesarkar5291
@subhashkesarkar5291 3 года назад
खूप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, सुभाष जी
@sureshhulawale9483
@sureshhulawale9483 3 года назад
खुप छान माहिती दिली आहे ✌️✌️✌️✌️✌️🆗
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, सुरेश जी
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 года назад
सुनील जी आम्ही वाडवळ.पानवेली ची वाडी बघुन जुन्या आठवणी जागृत झाल्या...पानवेलीची माहीती वैशिष्ट्य पूर्ण 👍 धन्यवाद सुनील जी.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@a007rp
@a007rp 3 года назад
Thanks for nice descriptive video.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Amit Ji
@tukarampatil8579
@tukarampatil8579 3 года назад
सुनील मित्रा तू दिलेल्या माहिती खुप व नरेंद्र पाटील यांनी पानवेल हे पान गांव माहीत पडलं खुप सुंदर नसेच गांवठी शब्द कारवी मांडव ऊतरणी डेवरणी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
@SanjayJD-pu1hz
@SanjayJD-pu1hz 3 года назад
खुप सुंदर माहिती...
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आबारी संजय सायेब
@kaminihule1336
@kaminihule1336 2 года назад
Khup vait vatle Sunil tumche logs mala Khup Khup avadtat 🙏❤️
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, कामिनी जी
@mumbaikarfolksbymohitramle
@mumbaikarfolksbymohitramle 3 года назад
Superb info
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot
@umeshsalunke35
@umeshsalunke35 3 года назад
Khup Chan mahiti saheb
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, उमेश जी
@PrathameshKarjavkar
@PrathameshKarjavkar 3 года назад
खूप छान..👌🏼👍🏼
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, प्रथमेश जी
@harshdesai6854
@harshdesai6854 3 года назад
Wah mast khup chan mahiti👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, हर्ष
@kadambarm9723
@kadambarm9723 3 года назад
Very good info thanks for sharing ❤️
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Kadamba Ji
Далее
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
00:19