श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ १९४७ मध्ये बांधला गेला. हा मठ नाथ संप्रदायातील संत सद्गुरु शंकर महाराजांचे समाधीस्थान आहे.
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ बापूराव रुद्र यांनी १९४७ मध्ये बांधले. सातारा रस्त्यावर असलेला हा मठ नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. २४ एप्रिल १९४७ रोजी नाथ संप्रदायातील संत सद्गुरु शंकर महाराज यांनी येथे समाधी घेतली. तिथेच त्यांचे समाधीस्थान म्हणून हा मठ बांधण्यात आला.
दक्षिण-उत्तर बांधण्यात आलेल्या या मठाच्या प्रवेशद्वाराजवळ एक प्रशस्त सभामंडप आहे. भाविकांना प्रार्थना, ध्यान करण्यासाठी तो उपयोगी पडतो. त्याच्या मध्यभागी यज्ञकुंड आहे. हा मठ पुण्यात खूप लोकप्रिय आहे. इथे संपूर्ण शहरातून मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.
मंदिराच्या आवारात औदुंबर, वड, पिंपळ, बेल आणि चंदन अशी धार्मिक श्रद्धेशी निगडीत झाडे आहेत. इथे एक प्राचीन विहीर आहे. ती महाराजांच्या कृपेने नेहमीच पाण्याने भरलेली असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मठासमोरच भगवान हनुमानाचे दक्षिणमुखी मंदिर आहे. त्या मागे भगवान दत्तात्रेयांचे मंदिर आहे.
#shankar_maharaj_math_pune
#shri_swami_samarth
#shankarmaharajmathpune
#shankarmaharajsamadhimathpune
#shriswamisamarth
#jaishivshankar
#shankarbaba
#gurudevdatta
#Maikailashkarahanewala
#meramaanhaishankar
#shrishankarmaharaj
#shankarmaharaj
#malak
#akkalkotswamisamarth
15 окт 2024