संपदाचे गाणे यापूर्वी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात ऐकले आहे, पण ओंकारचे गाणे प्रथमच ऐकले. दोघांचेही आवाज खूप छान आहेत. तरुण पिढीच्या गायकांना इतके भक्तिपूर्ण, सुरेल गायन सादर करताना पाहून खूप छान वाटलं. या पिढीच्या हातात भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीताचं भवितव्य सुरक्षित आहे, याची खात्री पटली. दोघानाही खूप खूप शुभेच्छा!
तुमचे विडीओ मला आता दिसले, अधाशीपणे सर्व ऐकले, खूप छान गायन, गाण्यांची निवड हाय क्लास, गातांनाची एकाग्रता वाखाणण्याजोगी, गातांना दिसता ही सुंदर , तुम्ही गायलेले मी पुन्हा वनांतरी हे गाणे आवडते खूप
गवळण लय म्हणजे लय म्हणजे एकदम भारी झाली. तुमचा खणखणीत ,सुरेल आवाज , कानात भरुन ठेवावासा वाटणारा वरचा षड्ज आणि आवाजाची फिरत... साथीदार पण लय भारी. सर्वांना खूप शुभेच्छा ! गाण्याचे शब्द मिळतील का ?
Singing very well,but proportionate melody is missing from tabla accompanyment,as speedy rytham is overtaking the melody.Let there be full weight in rytham