Тёмный
No video :(

Buy agricultural land now when you are not a farmer I शेतकरी नसताना आता बिंधास्त खरेदी करा शेतजमीन 

Valuable Education
Подписаться 53 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

Buy agricultural land now when you are not a farmer
शेतकरी नसताना आता बिंधास्त खरेदी करा शेतजमीन
Mission for Law Education.
१. महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम कलम-६३ अन्वये कोणतीही बिगर शेतकरी व्यक्ती महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करु शकत नाही. असं हस्तांतरण झाल्यास किंवा बिगर शेतकरी व्यक्तीनं महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी केल्यास ही शेतजमीन सरकार जमा होते. अनेक व्यक्तींनी मला वैयक्तीक फोन करुन याबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.
२. शेतकरी नसलेल्याला शेतजमीन खरेदी करता येईल का?
परराज्यातील शेतकरी महाराष्ट्रात शेतजमीन घेवू शकतात का?
शेतकरी महिलेने शेतकरी नसलेल्या पुरुषाशी लग्न केल्यास तिचा पती शेतकरी होईल का?
३. शेतकरी नसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रात शेत जमीन खरेदी करता येते का?
सहकारी संस्थेला शेतजमीन खरेदी करता येते का?
प्रायव्हेट लिमीटेड कंपनीला शेतीजमीन खरेदी करता येते का?
शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेतकरी होता येते का?
या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत.
आपण शेतकरी नसताना शेती खरेदी केली तर काय होईल याची उदाहरणे पाहूया....
४. पुण्यातल्या एका अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या एका गरिब व्यक्तीनं त्याच्या स्वतःच्या नावे पडिक शेत जमीन खरेदी केली. खरे तर या व्यक्तीच्या नावे महाराष्ट्रात कोठेही शेतजमीन नसतानाही त्याच्या नावाची सातबारावर नोंद करण्यात आली. हे झालं पहिलं उदाहरण. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. हे उदाहरण आहे संपुर्ण जगाला माहित असलेल्या ‘बीग-बी’ च अर्थातच अमिताभ बच्चन यांच. अमिताभ बच्चन यांनी पुण्यामध्ये शेतजमीन खरेदी केल्याचं सा-यांनाच ठाऊक आहे. अमिताभ बच्चनच्या या शेतजमीनीवरुन मध्यंतरी खुप मोठा वाद निर्माण झाला होता. त्याबद्दलचा मुख्य आक्षेप हा होता की अमिताभ बच्चन हे शेतकरी नाहीत. त्यामुळं त्यांना महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करता येत नाही. या वरुन बराच गदारोळ निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नावावरच्या सातबा-यावरची नोंदही कमी करण्यात आलेली होती.
५. तर मित्रांनो वरील उदाहरणापैकी एका उदाहरणात गरिब व्यक्ती आहे. तर दुस-या उदाहरणात एक वलयांकित व्यक्ती आहे. दोघेही शेतकरी नाहीत. पण गरिब व्यक्तीनं अतिदुर्गम भागात शेती खरेदी केल्याची नोंद सातबारावर करण्यात आली तर अमिताभ बच्चन वलयांकित असताना त्यांच्या नावाची नोंद सातबा-याला करण्यात आली नाही. तर मित्रांनो याबद्दल कायद्यात काय तरतुदी आहेत ते आता आपण पाहूया. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३ अन्वये, शेतकरी नसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करता येत नाही. असा व्यवहार बेकायदेशीर ठरुन कलम ८४ क अन्वये कारवाईसाठी पात्र ठरेल. तथापि, ज्या व्यक्तीची शेतजमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली आहे, त्यानं त्याबाबत पुरावा सादर केल्यास, त्याला शेतकरी मानण्यात येईल अशी तरतुद कायद्यात आहे.
६. यासाठी कुळकायदा अप्पर जिल्हाधिकारी यांचे शाखेकडे अर्ज करावा लागतो. सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर तुम्ही पात्र ठरलात तर, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३ (१) नुसार शेतकरी नसलेल्या व्यक्तीस शेतजमीन खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात येते. परराज्यातील शेतकरी असलेल्या एखाद्या व्यक्तीनं महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी केल्यास ती व्यक्ती ज्या राज्यातील असेल त्या राज्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन त्यानं सादर केलेल्या इतर राज्यातील सातबाराच्या खरेपणाबद्दल खात्री करुनच नोंद करण्यात येते.
७. समजा एखाद्या शेतकरी महिलेने शेतकरी नसलेल्या पुरुषाशी लग्न केल्यास त्या महिलेचा पती शेतकरी होत नाही. परंतु त्यांना झालेली मुले शेतकरी म्हणून गृहित धरली जातात. शेतकरी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला सक्षम अधिका-याच्या परवानगीनं महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करता येते. तथापि, ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्त्पन्न रुपये बारा हजारापेक्षा जास्त नसेल अशा बिगर शेतकरी व्यक्तीला महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम, कलम ६३(१) अन्वये शेतजमीन विकत घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी देवू शकतात. याचाच फायदा वरील उदाहरणातील गरिब व्यक्तीला झाला आणि शेतकरी नसताना त्याला शेतजमीन खरेदी करता आली.
८. कुळवहिवाट व शेतजमीन कायद्यानुसार कोणतीही कंपनी ही व्यक्ती नसल्यानं शेतकरी ठरणार नाही. त्यामुळं कंपनीच्या नावानं शेतजमीन खरेदी करता येत नाही. परंतु एखाद्या सहकारी संस्थेमार्फत शेतजमीनीची खरेदी विधिग्राह्य असते. अशा व्यवहाराला कलम-६३ व ६४ लागू होत नाहीत. पण अशा सहकारी संस्थेची नोंदणी, खरेदी दिनांकाच्या आधी मुंबई सहकारी यसंस्था अधिनियम, १९२५ अन्वये झाली असणं बंधनकारक आहे. एखाद्या खाजगी मर्यादित कंपनीला, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनं शेतजमीन खरेदी करता येवू शकते.
९. मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रात शेतकरी होता येत नसेल तर राजस्थानमध्ये तुम्ही तुमच्या नावे दहा गुंठे क्षेत्र विकत घेवून त्याबाबतचे खरेदीखत नोंदवून घेवून तुम्ही कायदेशिर शेतकरी होवू शकता. कारण भारतातील राजस्थान हे असं एकमेव राज्य आहे की जेथे कोणालाही अगदी शेतकरी नसलेल्या व्यक्तीलाही शेतजमीन विकत घेता येवू शकते. त्याद्वारे तुम्ही शेतकरी असल्याच प्रमाणपत्र मिळवू शकता.
१०. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरु नका. धन्यवाद. जयहिंद. जय महाराष्ट्र.
Dhanraj Kharatmal.,B.Com.,LLB
V Education
#FarmLand#Farmer#RevenueDepartment#RegistrationDepartment

Опубликовано:

 

8 дек 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 102   
@sakharammohite4886
@sakharammohite4886 2 года назад
वार्षिक 12 हजार चे आत उत्पन्न असणारी व्यक्ती ला पोटभर खायला मिळणे कठिण असते, ती व्यक्ती शेत जमीन खरेदी कशी करू शकेल,
@rgpatil5986
@rgpatil5986 3 месяца назад
अतिशय महत्त्वाचा माहिती आहे
@vivekvlogs1157
@vivekvlogs1157 3 года назад
Government servant asel tar shetkari dakhla kadhta yeto ka. Vadilanchi jamin aahe swatachi ani samuhik
@mayapednekar1923
@mayapednekar1923 Год назад
Thank you sir! U are just god for me! Your video really helped me a lot,
@prakashshinde5838
@prakashshinde5838 3 года назад
Very valuable information. Thanks.
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
You are welcome! ru-vid.com/show-UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@pradeepkulkarni1952
@pradeepkulkarni1952 3 года назад
खुपच छान माहिती सर आपला contact no send kara
@realestatealibag
@realestatealibag Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-04EM2D8bLA8.html
@realestatealibag
@realestatealibag Год назад
@@pradeepkulkarni1952 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-04EM2D8bLA8.html
@GaneshKoli-bb1no
@GaneshKoli-bb1no 2 месяца назад
Maze Aajoba che nave shet jamin hoti tyani ti vikali. aata mala shetkari dakhla kasa milel ?
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 Год назад
छान माहिती
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 2 года назад
सर माझ्या वडलांनी वडलोपर्जीत शेत जमीन २० वर्षां पूर्वी विकली आणि आम्ही आता महाराष्ट्रात रहात नाही,वडील सध्या हयातीत आहेत,मला त्यांच्या जुन्या ७/१२ दाखवून महाराष्ट्रात शेती विकत घेता येते का?🙏
@mohitpatil5386
@mohitpatil5386 Год назад
नाही..पण शेती घ्यायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता
@abhijeetmore583
@abhijeetmore583 9 месяцев назад
सर नमस्कार बाहेर फार्मर सर्टिफिकेट च्या नावाने खूप मोठी लुटमार होते त्यापेक्षा कमीत कमी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तरी हा नियम नको असे या गोष्टी तुमच्या तर्फे सरकारच्या लक्षात आणण्याचा प्रयत्न करा सर्व आपल्या मराठी बंधूंना फायदा होईल जय शिवराय !
@prakashshinde5838
@prakashshinde5838 4 месяца назад
Sur.varshik 12000/- mhanaje darmaha1000/- madhye sadhya jagata yeil ka? Asi kagad patre sadar karun kharedi karane he kiti vishwassrya asel. Kharyache divas nahit hech khare.any how information is very useful for all.thanks. sir rajsthan cha shetari dakhalyasathi kiti kharch yeto ani ti Jamin apalya nawawar zalyane apan ti Jamin lagaesdikhali anu shakato ka.certicatechi yekun fee kiti.msrgdsrshan karave mhanaje avashyak documents sadar karato.
@prakash62786
@prakash62786 Год назад
सर माझ्या काका च्या नावाने शेती होती ती त्यांनी 6 वर्षीपूर्वी विकली तर मला आज त्यांच्या 7/12 वर शेती घेता येते काय.. कृपया उत्तर दयावे धन्यवाद
@mohitpatil5386
@mohitpatil5386 Год назад
नाही..पण तुम्हाला 7/12 शिवाय शेती खरेदी करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता
@akshaygandhi3847
@akshaygandhi3847 Год назад
शेतजमीन विकल्यावर किती दिवसाने शेतजमीन घेणे बंधन कारक असते..कारण मला शेतकरी रहायचं. पण सध्याची जमीन विकायचे आहे
@suniljadhav4486
@suniljadhav4486 Год назад
Avghad ahe. 7/12 var nav pahijech
@mayapednekar1923
@mayapednekar1923 Год назад
शेतीतील अग्रहक्कासाठी कोर्ट केस केली तर कोर्ट व्यवहाराला कूठली किम्मत सुनावेल शासकीय पोर्टलवरील की ओपन मार्केट ची महागडी रेट?
@_.piegamer._
@_.piegamer._ 11 месяцев назад
सर शेत जमी होती पण ती तहसीलदार यांचे कडे अर्ज देऊन ती बिन शेती करून घेतली आहे व तेची नोंद सात बारा वर इतर हक्कात झाली आहे 4 महिन्या पूर्वी आता ती वेक्ती शेत जमीन घेऊ शकते का??
@PalwankarRavi
@PalwankarRavi 2 года назад
Excellent. Thx a lot.
@RCflier76
@RCflier76 3 года назад
Thanks sir . Very informative video
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
Most welcome ru-vid.com/show-UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@pandurangkamble5132
@pandurangkamble5132 8 месяцев назад
मी माझ्या आईचा शेतकरी दाखल काढला त्यानंतर आईचे ॲपेडुएट करून घेतले की माझा मुलगा माझ्या सोबत शेती करतो तो शेतकरी आहे तरी त्याला शेती खरेदी कामी प्रतिज्ञापत्र यावर रितसर शेतजमीन खरेदी करून दस्त नोंदणीसाठी तलाठी कार्यालयात दिले असता तलाठी साहेबांनी माझा शेतकरी दाखल सादर करा असे दस्त नोंद पोहोचवर लिहून दिले आहे. सातबारा वर माझ्या आईचे नाव फक्त आहे,आमची भावंडांची कोणाचीही नावे सातबारावर नाही आहेत.आता दस्त नोंदणी होणार का?
@mohanmungase6574
@mohanmungase6574 3 года назад
Very helpful
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
धन्यवाद.
@amolnavale6993
@amolnavale6993 11 месяцев назад
माझ्या आजोबांची जमीन काकांकडे गेलीय, त्यामुळे त्याजमिनीला वडिलांचे नाव लागले नाहीये, माझ्या वडिलांच्या किंवा माझ्या नावाने जमीन नाहीये, माझ्या आईच्या कुळात पण कोणाची शेतजमीन नाहीये, माझे वडील हयात नाहीये या case madhe माझ्या आजोबांचा शेतकरी असल्याचा दाखला दाखऊन मी शेतजमीन खरेदी करू शकतो का, कृपया मार्गदर्शन करावे.
@RCflier76
@RCflier76 3 года назад
Sir, do you provide guidance while purchasing an agricultural land, if land is dispute free, title clear etc.?
@alexfernandes7167
@alexfernandes7167 7 месяцев назад
Hello sir. Very nice video and information, my dad already has a 7/12 for a "Korad land" in his name , hence by default can i alsl get farmer certificate ?
@achyutjoshi7840
@achyutjoshi7840 Год назад
भोगवतदार मदे दुसऱ्याच व्यक्तींची नावे आहेत .आमची जमीन कुळकायद्यात गेली असावी पण अजूनही ७/१२ वर आजोबांचे नाव इतर अधिकार मध्ये आहे तर मला शेती घेण्यासाठी शेतकरी दाखला मिळू शकेल काय?
@deepakdharurkar3100
@deepakdharurkar3100 2 года назад
आम्ही सात जणात देवरूख येथे एक एकर जमीन खरेदी केली आहे. ही जमीन घेताना निवासी करण्याकरिता affidevit दिले आहे. आमचे एकाच 7/12 वर सर्व नावे आहेत. अजून जमीन ,N.A. झालेली नाही. हा 7/12 दाखवून छोटी वाडी (११ गुंठे) शेतीची घेता येईल का. कृपया कळविणे.
@suniljadhav4486
@suniljadhav4486 3 года назад
सर आईच्या नावावर तीच्या वडिलोपार्जित शेती होती, ती दोन वर्षांपूर्वी विकली त्यामुळे आता आईच्या नावावर शेती नाहीये... मग आता मला मुलगा या नात्याने शेती विकत घेता येईल का?
@gopalmahajan6464
@gopalmahajan6464 2 года назад
दहा वर्षे तुम्ही शेतकरी म्हणून संबोधले जातात.
@suniljadhav4486
@suniljadhav4486 Год назад
@@gopalmahajan6464 यासंबंधीचे काही कायदेशीर माहितीचे संकलन आहे काय?
@mohitpatil5386
@mohitpatil5386 Год назад
7/12 शिवाय..शेती घ्यायची असेल तर मला संपर्क करा
@user-tw2uo2bf7p
@user-tw2uo2bf7p 4 месяца назад
जर माझ्या वडिलांची शेतजमीन असेल आणि त्यांच्याकडे 7/12 असेल तर मी महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करू शकतो का?
@ravindrapatil1058
@ravindrapatil1058 2 года назад
सर आमच्या कळे 30 गुंठे शेती होती.आई च्या आजापणामुळे मुळे 13वर्ष पूर्वी विकली आता मला घेता येईल का.
@valuableeducation
@valuableeducation 2 года назад
नाही.
@satishjangale7318
@satishjangale7318 2 года назад
माझ्या आई चा नावावर शेती आहे मात्र ७/१२ उतारावर माझे नाव नाही, मला शेती विकत घेता येईल का?
@patilprakash8338
@patilprakash8338 Год назад
मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ६३ अन्वये शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेती खरेदी करण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना मिळेल का सर
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 2 года назад
राजस्थान किंवा मध्यप्रदेश येथे १० गुंठे शेत जमीन घेऊन महाराष्ट्रातील नागरीकास शेतकरी होता येते. या बाबतीत महाराष्ट्र शासन शेतजमीन नियम / अधिनियम किंवा शासन परि पत्रक जी आर याचा आपल्या वहिडीओ मध्ये उल्लेख नाही. कृपया तो कळवावा.
@valuableeducation
@valuableeducation 2 года назад
परिपत्रकाची गरज नाही. तुमची भारतात कोठेही जमीन असेल तर तुम्ही शेतकरी म्हणून समजले जाता.
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 2 года назад
शेतकरी नसलेल्या नातेवाईक व्यकतीस शेतकरी महिला ( निपुत्रीक ) भरणपोषण व काळाजी घेण्या साठी स्वतःची स्व अर्जित शेती बक्षिस पत्राने देउ (व्हस्तांतर ) शकते काय?
@valuableeducation
@valuableeducation 2 года назад
या विषयावरचा माझा व्हिडिओ कृपया पहावा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ggstOSg8d-A.html
@govindamaundekar2755
@govindamaundekar2755 2 года назад
I am not farmer. I have purchased agri. Land. Talathi Babu and Revenues Inspector required permission from SDO. Help me in this regard. Thanks
@kamleshchavan7451
@kamleshchavan7451 8 месяцев назад
Sir mazhe purvaz shetakari nhawate , amachi sheti wagere nahi Pan mala sheti gheyachi aahe , please guide kara , please prathana aahe
@lalitagrawal2840
@lalitagrawal2840 Месяц назад
Same here also sir please
@Reliance1531
@Reliance1531 2 года назад
सर कु. का. ६३ (१) चा शेरा काढण्यासाठी आपल्याकडून मार्गदर्शन मिळेल का..?
@chetakbhandge3651
@chetakbhandge3651 3 года назад
Very nice video sir. How much land need to purchase in Rajasthan to get the farmer certificate? 2000 sq ft is sufficient? Plz guide me.
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
१० गुंठे.
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 2 года назад
10 gunta is 10000 sft but it should be agriculture land
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 2 года назад
कृपया पर राज्यातील शेनकरी शेती घेऊ शकतो याचा नियम व पोटनियम सांगा
@valuableeducation
@valuableeducation 2 года назад
ज्याच्या नावावर भारतात कोठेही शेती आहे तो शेतकरी शेती घेवू शकतो.
@dattachaudhari4324
@dattachaudhari4324 3 года назад
mala shetjamin vikat ghyavyachi aahe pan 7/12 var stamp marlela aahe not for purchase aani vikanara aadivasi mi pan aadivasi aahe mi sheti ghevu shakato ka aani mi shetkari nahi mazhya mises cha chulat bhau shetkari aahe krupaya utter dyave.
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
आदिवासींची जमीन विकत घेता येत नाही. शासन मंजूरी घेणे आवश्यक आहे.
@nitinwagh7602
@nitinwagh7602 3 года назад
कुळ कायदा 84 क बद्द्ल माहिती द्यावी
@ashwinikapte5983
@ashwinikapte5983 3 года назад
Sir, Mazya nawawar already sheti ahe.. pan ya purvi aamchya family madey konakade sheti navti.. Maza que ha ahe.ki maza bhai sheti gheu shakto ka? Jar mi already sheti dhark asel tar.. Ani Kaka kadhun putnyala gift deed ne sheti bhetli asel tar trachea mawar nond hou shakte ka 7/12 madhy.... Please.suggest...
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
तुमच्या भावाच्या नावावर सातबारा उतारा असेल तर त्यांना शेती घेता येईल. तुम्ही शेतकरी असल्याचा फायदा तुमच्या मुलांना होईल. तुमची मुले शेती घेवू शकतात. ru-vid.com/show-UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@amirshaikh3975
@amirshaikh3975 3 года назад
सर वडीलांनी २०-२५ वर्षां पूर्वी शेती विकली होती, आता नावावर कुठेच शेती नाही, तरी मला किंवा वडिलांना दुसरी शेत जमीन विकत घेता येईल का?
@vrushabhgaurkar4793
@vrushabhgaurkar4793 2 года назад
सर, मी माझी पूर्ण शेती विकून भूमि हीन झाल्यावर दूसरी शेती विकत घेऊ शकतो काय? यात काय अडचणी येतील?
@valuableeducation
@valuableeducation 2 года назад
भूमीहीन झाल्यावर शेती विकत घेता येत नाही.
@deepakpatil4199
@deepakpatil4199 2 года назад
माझ्या आईचे नाव माहेरच्या शेतीत आहे तसेच माझ्या वडिलांची शेती त्यांनी 43 वर्षांपूर्वी विकली तर आता मी माझ्या नावावर शेती विकत घेऊ शकतो काय तसेच मला माझ्या नावाचा शेतकरि दाखला मिळू शकतो का कळवा प्लीज तुमचा मो no द्या thank you
@vijayrokde2790
@vijayrokde2790 2 года назад
मी एका शेतकरी नसलेल्या व्येक्तीस शेती विकली.ती त्याने दुसऱ्या शेतकऱ्यास विकून टाकली ती खरेदी कायदेशीर होईल का?
@valuableeducation
@valuableeducation Год назад
नाही.
@dattachaudhari4324
@dattachaudhari4324 3 года назад
sir mala sheti vikat ghyavyachi aahe pan mi shetkari nahi pan mala shetkari aaslyacha dakhla kadhavayacha aahe rajasthan madhun kasa milel krupaya guide karave aani kharch sandaje,sangave aapan milvun det aslyas tasech phone no sangave.
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
तुम्हाला जर माझा Paid सल्ला हवा असेल तर या 9167794777 व्हाटसप क्रमांकावर तुमचे संपुर्ण नाव, तुमचा व्यवसाय, तुमचे राहण्याचे शहर, व्हाटसप करुन तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेवू शकता.
@mohitpatil5386
@mohitpatil5386 Год назад
महाराष्ट्र मधे तुम्ही खरेदी करू शकटा..माझ्याशी संपर्क करा
@Jardani_Law_Official
@Jardani_Law_Official 2 года назад
sir rajsthan la10 gunthe ka ghayachi. 1 guntha ka nahi
@dharmendradixit5422
@dharmendradixit5422 Год назад
Agriculture land 11 guntha peksha kami registration hot nahi
@kaustubhkolte9396
@kaustubhkolte9396 3 года назад
कोणी जर राजस्थान मध्ये शेतजमीन खरेदी करुन शेतकरी झाला तर तो महाराष्ट्रात शेत जमीन विकत घेऊ शकतो का?
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
होय. काहीही अडचण येत नाही. ru-vid.com/show-UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@gabbarisback9055
@gabbarisback9055 Год назад
आजोबांच्या नावे 7/12 असल्यास नातू शेतकरी होतो का
@akshaygandhi3847
@akshaygandhi3847 Год назад
महत्त्वाचं प्रश्ण आहे..कृपया उत्तर द्यावे
@mydreamchoice2295
@mydreamchoice2295 3 года назад
Sir if a person have NA plot will he or she is eligible to purchase agriculture land?
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
No. ru-vid.com/show-UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@dharmendradixit5422
@dharmendradixit5422 Год назад
No
@rajendrabhagwat1053
@rajendrabhagwat1053 3 года назад
सर मला शेतजमीन खरेदी करायची आहे.. पण मी शेतकरी नाही..
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
राजस्थानातून शेतकरी होता येते.
@ravindrapatil1058
@ravindrapatil1058 2 года назад
किती खर्च येतो.राजस्थान शेतकरी दाखला साठी.
@satishjangale7318
@satishjangale7318 2 года назад
सर,माझ्या वडिलांच्या मृत्यू नंतर शेती ७/१२ उताऱ्यावर आई चे नाव आहे आम्हा भावांचे नाही, तर मला शेती खरेदी करता येईल का?
@valuableeducation
@valuableeducation 2 года назад
Hoy
@amitpatil8283
@amitpatil8283 3 года назад
सर आम्ही कोळी सामाज्याचे आहोत तर आम्हाला घर बांधायला शेतजमिन् 7/१२ वर करता येईल का?
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
होय. ru-vid.com/show-UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@sushilahirgal6603
@sushilahirgal6603 2 года назад
बिगर शेतकरी कोणाला म्हणावे
@valuableeducation
@valuableeducation 2 года назад
शेतजमीन नसलेल्यांना.
@timelapse7454
@timelapse7454 3 года назад
नवरा शेतकरी असेल तर बायको ला शेतकरी समजलं जातं का ?
@ROMANPROPERTYBUYSALE
@ROMANPROPERTYBUYSALE 8 месяцев назад
Sir tumcha no bhetten ka
@sunilsonawane1194
@sunilsonawane1194 3 года назад
सर तुमचा नंबर देणे
@amolbhalekar2103
@amolbhalekar2103 3 года назад
संपूर्ण शेत विकल्यास मला पुन्हा शेती घेता येते का फोन नंबर पाठवा
@valuableeducation
@valuableeducation 3 года назад
तुमच्या नावावर सातबारा असणं आवश्यक आहे. ru-vid.com/show-UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg
@vikassawale8245
@vikassawale8245 2 года назад
@@valuableeducation शोत मजुर आहे तरी माला शोत विकात घेताईका
@amolgholap3695
@amolgholap3695 2 года назад
सर तुमचा नंबर द्या
@valuableeducation
@valuableeducation 2 года назад
9653383359
@ashokkamble25
@ashokkamble25 3 года назад
सर माझ्या नावे २० गुंठे जमीन आहे तर आम्हाला शेतजमिन खरेदी करता येते का ? ९४२१०३८८१५
@_.piegamer._
@_.piegamer._ 11 месяцев назад
सर शेत जमी होती पण ती तहसीलदार यांचे कडे अर्ज देऊन ती बिन शेती करून घेतली आहे व तेची नोंद सात बारा वर इतर हक्कात झाली आहे 4 महिन्या पूर्वी आता ती वेक्ती शेत जमीन घेऊ शकते का??
Далее
नीतिपरक वचन
0:05
Просмотров 3
❌Разве такое возможно? #story
01:00
would you eat this? #shorts
00:39
Просмотров 1,8 млн
Big Baby Tape - Turbo (Majestic)
03:03
Просмотров 248 тыс.
Gelik yoki Velik?
00:20
Просмотров 897 тыс.
❌Разве такое возможно? #story
01:00