गंगा लहरी तिन्ही भाग सुन्दर विश्लेषण केले आहे भाषा , शब्द अतिशय सुन्दर .आणि हे सर्व ऐकताना प्रत्यक्ष गंगा किनारी असल्याचा भास होतो गंगेचे महत्व खूप मोठे आहे आणि त्याचा कितीही सखोल अभ्यास केला तरी ते अपूर्णच असेल तरीही सर्व बारकावे स्पस्ट करत हे आम्हाला ज्ञान दिलेत त्याबद्दल धन्यवाद ,
अतिशय सुंदर विवेचन.अवघड असणारे सोपे करून सांगितले.तुमची मधाळ वाणी अशीच गंगामातेसारखी सदैव वाहती राहो.गंगा दशहराचे दिवस संस्मरणीय राहतील.तुम्हाला खूप शुभेच्छा.
खूप सुंदर विवेचन...कीर्तनाचे निरुपण केल्यासारखे वाटले..जगन्नाथ पंडितांच्या प्रतिभेला नमन. किती नी कशा कशा कल्पना..बापरे..कुठून कुठे संबंध जोडलाय पण धागा तुटला नाही..हे सारे आपल्या लाघवी वाणीने उलगडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच अजून निरुपणांची आतुरतेने वाट पाहात आहोत..
धनश्रीताई नमस्कार , आपण खूपच छान विश्लेषण केलेले आहे. आम्हाला प्रत्यक्ष जगन्नाथ गंगेच्या काठावर दिसत आहेत आणि त्यांचा गंगे सोबत चा संवाद ऐकायला येत आहे. खरोखर खूपच छान विश्लेषण.
वाह वाह अप्रतिम रसग्रहण गंगा लहरिंच्या सगळ्याच श्लोकांचा....धनश्री ताई तुमच्या वाणी नी अजूनच शब्दांचा साक्षात्कार झालंय..पुन्हा पुन्हा ऐकून त्याचा आस्वाद घ्यावा वाटतो. धन्य आहे श्री जगन्नाथ पंडित ज्यांनी हे रचीले, धन्यवाद तुम्ही हे आमच्यापर्यंत सहज सोपे करून पोचवले..
अतिशय सुरेख विवेचन.तुमचं कौतुक करायला शब्द नाहीत.प्रसंग ,श्लोक अतिशय सोप्या ,गोड भाषेत समजावून ,हसून सांगता.माझ्यासारख्या समजून कमी असणाऱ्या व्यक्ती ला ही समजायला सोपं झालं ! हे फक्त तुमच्या अभ्यास पूर्ण,शांत निरुपणामुळे शक्य झालं आहे. शतशः नमन!
किती सुंदर बोलता आणि समजावून सांगितलं आहे. श्र्लोक वाचायला खूप अवघड होते. रसग्रहण इतके सुंदर सर्व फोड करून सांगितले 🙏 खरंच आपण गंगाकिनारी आहोत असे वाटले. सर्व डोळ्यासमोर उभे राहिले
धनश्री ताई नमस्कार.तुम्ही गंगा लहरीवर जे सुंदर श्लोक कवी जगन्नाथ यांनी केले आहेत ते तुम्ही अतिशय सोप्या आणि सुंदर प्रकारे सांगितले आहे ते ऐकून मन खूप तृप्त झाले आहे.मी हे दोन वेळा ऐकले आहे.परत परत ऐकावे असे वाटते.अगदी गंगामाता डोळ्यासमोर आहे असे वाटते.🙏🙏
खूप सुंदर !!!! सांगण्याची पध्दत विलोभनीय, शब्दांच्या लहरींवर ,अर्थाचे भावार्थ, साहित्य सौंदर्याचे शीतल तुषार अंगावर झेलत जणू गंगेच्या काठावर , जगन्नाथ पंडितताबरोबर मीही बसलेली आहे व संवाद ऐकत आहे. धनश्री ताई ! मनापासून धन्यवाद !
धन्य धन्य धनश्री ताई मॅडम मी आता संसारातून मुक्त झाले मी आता समाधानी आहे बाकी सगळीकडे फक्त मी देवाचं काही ऐकलं नाही काही करू शकले नाही त्यामुळे मी इथून पुढचा सगळा वेळ तुमच्या सानिध्यात घालून श्रवण करण्याचं हे माझं ध्येय ठेवला आहे तर माझी आणि तुमची कशी भेट होईल हे भगवंतालाच मिळेल तरीपण मी सारखं पत्ता वगैरे शोधायला बघते मी मुलाला सांगितले मला त्यांना भेटू म्हणून नमस्ते धन्य धन्य धन्य खूप खूप तुमचं आभारी आहे तुमच्या वाणीने सगळं शरीर शांत होते आणि तुम्ही तुमचा आरोग्य चांगले राहिले पाहिजे आमच्यासाठी तुम्ही खूप चांगलं राहा
नमस्कार धनश्री ताई गंगा लहरी तीन भागांमधील विवेचन मी ऐकत आहे त्याचा खूप उपयोग मला होत आहे मी पौरोहित्याचे परीक्षा देत आहे यावर्षी आम्हाला गंगा लहरी अभ्यासाला आहे त्यामुळे मला याचा खूप उपयोग झाला धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धनश्री ताई आपण केलेल्या निरूपणाचे सौंदर्य सांगण्यासाठी शब्द सापडत नाही, खिळवून ठेवणारे, आपला अभ्यास व पाठांतर, स्मरणशक्ती जबरदस्त, आद्य गुरू शंकराचार्य यांच्या स्तोत्रांचेही निरूपण करावे, ही विनंती
सुंदर ! "गंगालहरींं" चा आस्वाद आमच्या पर्यंत आपल्या ओघवत्या वाणीने पोहोचवला. प्रत्यक्ष जाऊन गंगेच्या त्या निर्मळ जळापाशी ही सर्वस्तुती ऐकवावी व पवित्र व्हावे असे वाटते. अापल्या अभ्यासाला शतशः नमन🙏
भवत्याः भाषा या सहजप्रवही गमयति | सुरम्या सा वाणी सुलभमतितार्थाय वहति | रसास्वादः किं वा परिमलसुखं तन्निरुपणम् | नमामः नैपुण्यं सरलवचनं वा कुशलताम् ||😊🙏 - शिखरिणी Your languages which is free flowing makes us to know the depth of subject. Very pleasant vocal flow fluently runs for the understanding. This Nirupana is the taste of various Rasa and Fragrances. We bow to your simplifying skills and art of narration.😊🙏
ताई तुम्ही करत असलेले विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण व मनाला अत्यंत आनंद देणारे आहे. आपण काही श्लोकच येथे घेतले आहे. आपल्याकडून गंगा लहरीतील प्रत्येक श्लोकाचे विवेचन ऐकणे आणखीनच आनंददायी ठरेल .🙏🙏🙏
धनश्री ताई तुमच्या वाणीला शत शत नमन आमचे कान खरच तृप्त होतात येवडा तुमचा अभ्यास आणि तर ऐकतच रहातो ताई खूप खूप कौतुक आहे तुमचे माझा पूर्ण स्वयंपाक तुमच्या श्रवण भक्तीने होतो ताई खूप छान वाटत तुम्हाला खूप शुभेच्छा असेच तुमचे श्रवण आम्हाला घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या वाणीला पुन्हा पुन्हा वंदन ताई
खुप सुंदर ताई, आपली सुवाच्य वाणी, सखोल अभ्यास आणि सदैव हसमुख चेहरा🙏🙏🙏🙏... विषय कितीही गहन, कठीण असला तरी अतिशय सोपा आणि सुमधुर करून सांगण्यात आपला हातखंडा आहे....