Тёмный

Prasad Gawde | ‘कोकणी रानमाणूस’ | interviewed by DR. ANAND NADKARNI, IPH | Alibag VEDH 

AVAHAN IPH
Подписаться 299 тыс.
Просмотров 179 тыс.
50% 1

प्रसाद गावडे हा कोकणच्या निसर्गात वाढलेला तरुण. निसर्ग आणि माणूस यांचा Co-Existence आणि निसर्गाशी एकरूप होत, सहा ऋतूंचे सहा सोहळे साजरे करणारा कोकण अनुभवत प्रसाद लहानाचा मोठा झाला. पुढे engineering चे शिक्षण घेण्यासाठी काही काळापुरता तो मराठवाड्यात राहिला. एकीकडे निसर्गाने भरभरून दिलेला कोकण आणि दुसरीकडे मानवनिर्मित दुष्काळ त्याने तिथे अनुभवला. शिक्षणानंतर काही काळ त्याने नोकरी देखील केली. परंतु प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडताना पाहून तो अस्वस्थ झाला. आणि मग कोकणात परत जाऊन तिथल्या माणसांचं जगणं जगासमोर आणत ‘रानमाणूस’ होण्याचा त्याचा प्रवास सुरु झाला. या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊ प्रसाद गावडे आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
.....................................................................................................
00:00 - Why I went back to Konkan.
01:10 - Why did I choose to study Engineering?
04:07 - Why I Left my Engineering Job?
05:55 - Choosing the Title - ‘Ranmanus’
06:58 - The story of Ranmanus?
09:01 - How should tourism in Konkan be?
09:58 - The Reality of Konkan?
11:12 - The Concept of a Mudhouse.
13:58 - How I Use Social Media for a Social Cause.
16:01 - Concept of Being Settle in Life.
17:33 - Parent’s Reaction after I chose to become ‘Ranmanus’
18:52 - Why is Diversity necessary?
19:46 - The people of Konkan Preserved the Indigenous species.
22:07 - Speciality of Konkan Rituals.
25:09 - The Vibes of Devrai aka The Sacred Flora (Conserved Forest)
26:45 - How should we Preserve the Environment?
28:23 - Ecological Conservation is Necessary.
30:19 - Favourite traditional flower.
31:01 - Favourite tree.
31:21 - Favourite Bird.
32:28 - Favourite Fish.
33:03 - The Concept of Success.
33:55 - Summing up by Dr. Anand Nadkarni
......................................................................................................
Our Recent Uploads:
• Sonam Wangchuk - The R... - Sonam Wangchuk - The Real Rancho
• Atul Deulgaonkar | Env... - Atul Deulgaonkar | Environmental journalist
• RAHI SHRUTI GANESH | स... - संविधानाची ताकद | Rahi Shruti Ganesh
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - RU-vid - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #kokaniranmanus #iph #prasadgawde #kokan #mangarfarmstay #ecotourism #nature #activist #culture #alibag #vedh

Опубликовано:

 

5 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 625   
@gurunathchoughule5828
@gurunathchoughule5828 4 месяца назад
कोकण रत्न हा पुरस्कार दिला पाहिजे .जय कोकण जय महाराष्ट्र..
@rekhadesai1417
@rekhadesai1417 4 месяца назад
प्रसाद गावडेचा आम्हा कोकणवासीयांना अभिमान वाटतो…रानमाणूस राहण्यातच फायदा आहे…🙏🙏
@MH06216
@MH06216 3 месяца назад
मग तुम्ही कुठे राहता ? कोकणात की मुंबई ला😂😂😂😂😂
@must604
@must604 3 месяца назад
सगळ्यांना आपली मुले मोठ्या शहरात मोठी नोकरी करत असावीत असे वाटते।रांनमाणुस​ दुसऱ्या घरात होऊ दे.@@MH06216
@captainamerica614
@captainamerica614 3 месяца назад
​@@MH06216 मुंबई कोकणातच येते.
@dilipdesai4097
@dilipdesai4097 3 месяца назад
​@@MH06216ते फक्त गणपतीला आणि जत्रेला येतात. जमलच तर फणस, आंबे खायला मे महिन्यात येतात.
@JayantjJoshi
@JayantjJoshi 2 месяца назад
अभिमान बाळगायचा कोकणाचा आणि राहायला जायचे मुंबईत हा दुतोंडीपणा झाला
@opener5614
@opener5614 4 месяца назад
कोकणाला प्रसाद सारख्या नेतृत्वाची गरज आहे. हा असा आवाज देशाच्या संसदेत पोहचला पाहिजे तरच ह्या देशाचं भवितव्य उज्वल आहे
@ganeshmohite6210
@ganeshmohite6210 3 месяца назад
राणे घराण्याला निवडून आणण्या पेक्षा ह्या भावाला निवडून आणावेत
@rohitnaik5463
@rohitnaik5463 3 месяца назад
Prasad sarkhe anek netrutva apan kashi ubhi karu shakto he pahuya. Jenekarun bakal karnarya so called development pasun apan apla kokan vachvuya, kokani jivanshaili vachvuya.
@sumitgpatil
@sumitgpatil 2 месяца назад
पण लोक तुमच्यासारखं बोलून सुद्धा राणे घराण्यालाच निवडून देतील, त्याचं काय करायचं??
@gurunathchoughule5828
@gurunathchoughule5828 4 месяца назад
आमच्या प्रसाद गावडे हा माणूस कोकण वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे .समस्त कोकणवासी यांनी कोकण वाचवण्यासाठी प्रसादला हातभार लावा .जगाच्यापाठी कोकणी माणूस जर असेल तर , यू ट्यूब, इंस्टा ग्राम, एक्स, असतील तर त्यांनी हातभार लावा.जय कोकण जय महाराष्ट्र...
@raghunathpalav4041
@raghunathpalav4041 4 месяца назад
प्रसाद मित्रा, खुप छान तू बोललास.. मानलं मित्रा 🙏🙏
@ajaypatil9177
@ajaypatil9177 4 месяца назад
प्रसाद हा मला एक You Tuber आहे असच वाटत होता, पण त्याचा कडे असलेल ध्येय, विचारांची clarity आणि कोकणाचा असलेला अभिमान बघून एक वेगळाच अनुभव आला !
@amreshagarwadekar362
@amreshagarwadekar362 4 месяца назад
Age 30 years, knowledge of 80 years 🙌🙌🙌 Prasad is a gem of Kokan 💎
@jyotsnapuri5925
@jyotsnapuri5925 4 месяца назад
प्रचंड अभ्यासपूर्ण व्यक्तव... एवढ्या लहान वयात आपल्या कोकणाबद्दल भरभरून मांडले....कोकणाबद्दल असणारी आस्था प्रेम आणि तळमळ तुमच्या बोलण्यातून दिसून आली खूप खूप धन्यवाद सर सॅल्यूट 🙏🏻🙏🏻💐💐🫡🫡🫡🫡
@priyankssawant9576
@priyankssawant9576 4 месяца назад
प्रसाद ...निसर्गाची खूप खोलवर जाणीव असणारा ,निसर्गाचा भाग असणारा आमचा प्रसाद ..दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,तेथे कर माझे जुळती ! मनस्वी मुलगा !! धन्यवाद प्रसाद आणि धन्यवाद डॉ. नाडकर्णी ..सगळ्याच मुलाखती छान असतात ...पण ही एक आगळी वेगळी पण खास मुलाखत ! उस्फुर्त ..आनंददायी ...प्रेरणादायी !!❤❤
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 месяца назад
Ha kokan chya development virodhi aahe
@umeshsable7864
@umeshsable7864 4 месяца назад
खरच प्रसाद च कार्य खूप महान आहे
@KedarShetye-hr2xb
@KedarShetye-hr2xb 3 месяца назад
Exactly
@ganeshpalav8343
@ganeshpalav8343 3 месяца назад
​@@siddhantsawant5717😂😂😂
@rohitnaik5463
@rohitnaik5463 3 месяца назад
Dada yat kay virodh re? Aaj jar tumhi shahrat rahat asal ani titlya development ne influence zala asal tar nakki ekda vichar kara ki GDP vadhla manje development zali ka? Ya development madhe quality life ahe ka? Paishe mhanjech development aste ka? Kontya prakarchi life shahrat miltey? Mental peace, stability, nisarg, paryavaran asa kahi urlay ka shahrat? Ani ashya goshti jar amchya koknala vyapun taknar astil tar kokan bakal vhayla pan vel lagnar nahi. Nakki vichar kara.​@@siddhantsawant5717
@sunitdesai9293
@sunitdesai9293 4 месяца назад
देवाने हा प्रसाद म्हणून पाठवलेला रानमाणूस आहे. मानलं पाहिजे त्याला कारण आजच्या युगात ही विचारसरणी !!!!👌🏻
@sonalkadam9308
@sonalkadam9308 4 месяца назад
एका व्हिडिओ ला शंभरदा लाईक करता येत असते..तर ते पण केले असते ..दादा.. इतकं तुमचं बोलणं..वागणं.. खरं आहे 🙏🙏🌹
@suniltakalkar9623
@suniltakalkar9623 2 месяца назад
Ruko jara sabar Karo 😂
@manishasurve652
@manishasurve652 4 месяца назад
अजिबात संपूच नये अशी ही मुलाखत. प्रसाद, तू इतका पोटतिडकीने बोलतोस कोकणाबद्दल, कारण तुझे व्यक्तिमत्त्व अभ्यासपूर्ण आहे. तू ते जीवन जगलास जन्मापासून. हा अनुभव त्याचबरोबर चांगले शिक्षण तुम्हाला खूप चांगली दृष्टी देखील देते. म्हणून कोकण अनुभवा, जगा त्याचबरोबर चांगले शिक्षणही घ्या हेच सार आहे. तुझ्या या चळवळीला अभूतपूर्व यश मिळो, हीच सदिच्छा 🙏🙏🙏
@vilasparab5914
@vilasparab5914 4 месяца назад
@KedarShetye-hr2xb
@KedarShetye-hr2xb 3 месяца назад
Hhmmmm true
@bssurve63
@bssurve63 3 месяца назад
Great प्रसाद अभियंता. व पारंपारिक राहण्याची पद्धत खानपान वगैरे इतर माहिती छान माहिती देत आहेत
@bangarsaurabh8407
@bangarsaurabh8407 2 месяца назад
@hkamble123
@hkamble123 15 дней назад
❤​@@KedarShetye-hr2xb
@vitthalnarvekar6907
@vitthalnarvekar6907 4 месяца назад
प्रसाद ची मुलाखत ऐकताना त्याची निसर्गा विषयी ची तळमळ ही तीव्रतेने जाणवते. त्यासाठी त्याने केलेला अभ्यास हाही सखोल आहे. ऐन तारुण्यात त्याने स्वीकारलेलं हे ध्येय पाहून आम्हाला त्याचा खूप अभिमान आणि कौतुक वाटते.
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 4 месяца назад
प्रसाद तुला जे कळते ते आपल्या कडील राजकारण्यांना कधी कळणार. ईश्वर ह्या राजकारण्यांना चांगली बुध्दी दे. पर्यावरनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कोकणातील मुलांना शाळे पासुन शिकवला पाहिजे.
@pradipshinde9557
@pradipshinde9557 4 месяца назад
शेवटी राणमाणूसच तू आम्हाला तुझा अभिमानच वाटतो .❤
@mityesh.m
@mityesh.m 4 месяца назад
प्रसाद दादा पृथ्वीवरील सर्वात सुखी आणि आनंदी माणूस तूच आहेस.❤️
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 4 месяца назад
प्रसाद तुझे विचार खर तर कृतीत आणण्याची गरज आहे.जे नैसर्गिक जगणं सगळ्यांचे होते ते आता कठीण झाले आहे ग्रामीण जीवन संपत चालले आहे.निसर्गाशी सुसंगत जीवन हेच खरे सुशेगाद आहे.लडाख मध्ये सोनचुक वांगडू यांचा संघर्ष अशाच प्रकारचा आहे.
@pradipkumarsarang4725
@pradipkumarsarang4725 4 месяца назад
प्रसाद कोकणचा आयकॉन आहे ,ग्रेट मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा ...प्रदीपकुमार सारंग..देवगड.
@yogeshtemkar2528
@yogeshtemkar2528 4 месяца назад
गावाकडचा गोडवा ओळखून त्याची गोडी चाखून तो *"प्रसाद"* इतरांना मिळवा त्याची ओळख ,त्याची व्याप्ती इतरांपर्यंत सोशल मीडिया च्या माध्यमातून पोहोचणारा प्रसाद ग्रेट रानमाणूस ❤
@naik66444
@naik66444 4 месяца назад
प्रसाद...तू आमचे बालपण आणि कोकण दोन्ही जागे केलेस आणि पुन्हा कोकणाकडे लोक येवून कोकण चे वैभव जपतील...
@arunanaik6471
@arunanaik6471 4 месяца назад
अफलातून ❤सुसंगत सुसंवाद. मनका मनका ओढ रे साधो😊
@VishalVNavekar
@VishalVNavekar 4 месяца назад
मणका मणका काय?
@dr.sanjaykumarpatil3122
@dr.sanjaykumarpatil3122 4 месяца назад
प्रसाद तु फार ग्रेट आहेस, तु तुझ्या छंदात जगतोस आणि आपण कसं निसर्गासि सुसंगत जगांव हे सांगतोस .खरंच तुला भेटावस वाटत.
@jagannathgawas4978
@jagannathgawas4978 4 месяца назад
कोकणचा वनमाणूस आहात तुमी देवराईचे महत्व पटवून देणारे सह्याद्रीच भूषण आहात तुमी जय माऊली 🙏
@samindarpatil7616
@samindarpatil7616 4 месяца назад
प्रसाद तुझा कोंकण आणि कोंकानविषयचा अभ्यास पाहून परत तुझ्या प्रेमात पडलो .....असाच तुझ काम चालतं राहो हीच शुभेच्या ❤❤❤❤
@shaileshjore8880
@shaileshjore8880 3 месяца назад
प्रचंड बुद्धिवान. अत्यंत दुरदृष्टी असलेले
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 4 месяца назад
कोकणातील निसर्ग वाचविण्यासाठी पोटतिडकीने बोलणारा व सतत प्रयत्न करणारा. तुझ्या कामाला सलाम.
@vijaymasurkar5359
@vijaymasurkar5359 3 месяца назад
प्रसाद तुझे विचार खूपच प्रगल्भ आहेत. निसर्गाशी समरस होऊन जगणं म्हणजे काय हे तू किती सोप्या शब्दात सांगितलस . तु कोकणाला समृध्द म्हटलस .उरभरुन आला. आजपर्यन्त राजकारण्यानी मनिअॉर्डरवर जगणारे म्हणून हिनवले . तू तुझ्या विचारांनी खूप चांगली चपराक दिलीस. हा निसर्ग जपायला हवा . हे जीवन आम्ही लहानपनी जगलो. आताच्या पिढीला हे समजतच नाही . मित्रा तुझो विचार पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही सक्रीय सहभाग घेत आहोत. फक्त तुझे अभिनंदन करुन न थांबता तुझे विचार पुढे घेवून गेलो तरच ते खरे तूझे अभिनंदन असेल. मित्रा तूझ्या कार्याला सलाम .🎉
@Naad_Bailgadyacha
@Naad_Bailgadyacha 4 месяца назад
मी मुळचा पुण्याचा आहे. पण मला कोकण🌴 खुप आवडते , आणि मी दादांचे videos रोज बघतो ते बघताना मला कोकणात असण्याचा भास होतो. प्रत्येक लहानात लहान गोष्ट मी नीट समजून घेतो . असेच कोकणचे वैभव , सौंदर्य, इतिहास, संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजे.❤🌴🌍
@RukminiYewale-cg6cl
@RukminiYewale-cg6cl 4 месяца назад
हॉर्नबिल ची गोष्ट खूप आवडली......🥰
@pradeepkadam1396
@pradeepkadam1396 4 месяца назад
कोकण रत्न श्री. प्रसाद गावडे 🎉🎉🎉🎉
@ashutosh2812
@ashutosh2812 4 месяца назад
BE होऊनही आधुनिक समजल्या जाणाऱ्या जीवनाकडे पाठ फिरवन स्वतःला आवडणाऱ्या गोष्टीत रमला या बद्धल प्रसादाचे कौतुक आहे. हेच खरे आयुष्य आहे जे आनंदाने जगता येईल.
@bipinshinde7213
@bipinshinde7213 4 месяца назад
गावी राहून तेथील जीवनशैली जगणारा माणूस खरा कोकणी माणूस आहे.मुंबईला राहणारा हा माणूस कोकणी नाही तो शहरी माणूस आहे.
@yashavantijoglekar7203
@yashavantijoglekar7203 4 месяца назад
गावाकडंचं आयुष्य हे खरोखरच सहज,साधं थोडं कष्टाचं पण खूप खूप आनंदाचं आहे नक्की. प्रसादच्या कामाला चांगली साथ मिळो, गति मिळो आणि भरपूर यश मिळो.
@saritapatil8318
@saritapatil8318 4 месяца назад
🙏🥰प्रसाद दादा तुला मनापासून नमस्कार व धन्यवाद निर्सगाच्या जीवनाची जाणीव आणि उणीव भरूभरुन तुझ्या मनाच्या कणाकणात बसलेली आहे. अशीच निसर्गाची काळजी घेणारे विचार आमच्या सर्वांच्या मनात रूजली जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏दादा तुला परमेश्वर व निसर्ग तुझ्या कामात संपूर्ण सहकार्य, सहयोग, सेवा,स्नेह, सहानुभूती व कृपा बरसत राहील.🙏
@rajeshwarang
@rajeshwarang 4 месяца назад
मला आवडलेला.. one of the best podcast.. कधी ३५ मिनट संपले कळलंच नाही.. काश प्रत्येकजण जर प्रसाद सारखा atleast 10% jari विचार करायला लागला तर जग अजून सुंदर होईल.
@ramsawant7652
@ramsawant7652 4 месяца назад
वेधने हा चालु केलेला स्तुत्य उपक्रम 👍👆👌 कोकण नी पर्यावरण वाचवण्यासाठीची कोकणीरानमाणूस प्रसाद गावडे ह्या भावी पर्यावरण मंत्री म्हणुन विचार व्हायला हरकत नाही 👍पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏🚩येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯 % वाचवचो आसा. 🌳🌴🥭💯🌺🏡
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 4 месяца назад
बेटा, गोड दिसतोयस,...गोड बोलतोयस...खूप मस्त मुलाखत दिलीस....!!!...दिर्घायू हो....ही निसर्गाकडे प्रार्थना....!!!..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mangalapethe1815
@mangalapethe1815 3 месяца назад
ही मुलाखत नाही तर जीवनदर्षन आहे.मी कोंकण थोडं अनुभवलं आहे.त्या स्मृती जागृत झाल्या व नव्वदीकडे जाताना खूप आनंद मिळालाय.धन्यवाद
@mangeshshirke
@mangeshshirke 4 месяца назад
हो दादा रlणमाणूस परlगंदा होताना मी ३५ वर्षापूर्वी पाहिला! काळाने घातलेला तो घाला होता काळ नक्कीच सोकावला परंतु काळाच्या डोक्यावर उभं राहून तू जे करतो आहेस ते दादा अतुलणीय आहे तुला त्रिवार दंडवत 🙏
@surekhadesai6449
@surekhadesai6449 4 месяца назад
प्रसाद,कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य व देवराई जपण्यासाठी किती व कशी धडपड करतो ते त्याच्या व्हिडिओ तून पाहत आले आहे. तो पोट तिडकीने बोलतो त्या बोलण्यातून व वागण्यातून निसर्ग प्रेम व ते टिकवण्यासाठीची धडपड दिसते . अतिशय माहितीपूर्ण मुलाखत जी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटेल.. धन्यवाद.
@SP-ip1ed
@SP-ip1ed Месяц назад
प्रसाद मी वेंगुर्ले तूळशीची आहे (माहेर) ,माझे वडील तुझ्या सारखे रानमाणुस होते, मीही माझ्या वडिलांन सोबत जंगलातु गावोगाव फिरायची , वडील जगात नाही. गावची खूपशी आठवण येता , गावच्या ईस्टसाठी राजकारणी काकेभावानी नात्यातुन बाहेर काढले ,आई असुन अनाथ ,देव जैतिर प्रसन्न. वडीलांनी समाधानी रहा असे म्हणत, पण गावची खूपशी आठवण येते 😢
@sumitapendse2307
@sumitapendse2307 4 месяца назад
प्रसाद, तुझ्यासारखे हजारभर प्रसाद गावोगावी निर्माण झाले तर आपल्या कोकण चा _भू लोकीचा स्वर्ग नुसता टिकून राहील नव्हे तो शतपटीने बहरेल! तुझ्या उदात्त कार्यात तुला भरभरुन यश लाभो! देव बरे करो ❤
@madhavimulay4022
@madhavimulay4022 4 месяца назад
कोकणाची जीवन शैली वाचवण्यासाठी ची तुमची धडपड सराहनिय आहे.
@VishalVNavekar
@VishalVNavekar 4 месяца назад
सरहनिया म्हणजे?
@rajendragawde3612
@rajendragawde3612 4 месяца назад
शब्दातील अक्षर जरा इकडे तिकडे झाली तरीही त्याचा अर्थ "कौस्तुकास्पद" असा घ्यावा.❤
@revatijoshi1568
@revatijoshi1568 4 месяца назад
कोकणातील जीवन हे निसर्गाशी जुळवून घेणार आहे. आणि ते जगताना आपण कसे परमात्म्याचे सानिध्यात च जगत असतो याचा शोध च या प्रसाद गावडे ने लावलाय. सलाम दादा..
@nileshsarphale3785
@nileshsarphale3785 3 месяца назад
या मुलाखतीतून रानमाणुस आणखी खोल वर्ती समजला youth icon❤
@yashavantijoglekar7203
@yashavantijoglekar7203 4 месяца назад
प्रसादचा ध्यास, अभ्यास, भान, जाण यांचं खूप खूप कौतुक.या साऱ्याची कदर आम्ही शहरी माणसांनी केली तर त्यचं समाधान वाढेल, आपण आपल्या परीने प्रयत्न करायला हवा.
@laxmanwayachal6558
@laxmanwayachal6558 4 месяца назад
कोकण जीवन शैली बद्दल एवढा कळकळीने बोलणारा मी तरी पहिला नाही.विशेष म्हणजे तू इंजिनियर असून कोकणात रमतोस,कोकणची संस्कृती पोटतिडकीने मांडतोस ,ते ही तुझ बोलण्याचा बाज ऐकल की समुद्राची गाजच वाटते. Hats of for your knowledge of Botany,zoology , Chemistry and Ecology of life. You are real Ranmanus.हॉर्नबिलची माहिती खूप छान, खूप छान! मला तुला भेटायला फार आवडेल.
@tushargore5260
@tushargore5260 3 месяца назад
रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभेला चांगला उमेदवार आहे. अशा नवीन विचार मांडणाऱ्या तरुणाला उमेदवारी मिळायला हवी. हाच माणूस कोकणचा शाश्वत विकास करू शकतो कारण तो तिथल्या मातीशी आणि निसर्गाशी प्रामाणिक आहे.
@dilipdesai4097
@dilipdesai4097 3 месяца назад
का? हा कोकणचा विकास होऊ देणार नाही. सर्व मुले झगं मारत 15000 रुपयांसाठी गोव्यात कंपन्यांमध्ये काम करत आहेत. मुलींना नोकरी असलेला मुलगा पाहिजे. मुलांची लग्न होत नाहीत. काही मुले नोकरीसाठी मुंबई गाठतात. याची मुलाखत बघा, पण ह्याच ऐकल तर इंदिरा गांधीने 70 च्या दशकात जे मीलो म्हणून धान्य अमेरिकेत डुकरं खायची आणि आम्ही राशन दुकानामध्ये विकत घ्यायचो, ते कोंकणात परत सुरू करावा लागेल.
@creatorsarjunprisha27
@creatorsarjunprisha27 3 месяца назад
नको रे बाबा अश्या कोकणी देवमाणसाला राजकारनाच वेड नको लाऊ...तो आहे त्याच जागेवर ठीक आहे ....राजकारण ऐक बैताड जीवन आहे....
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Месяц назад
हा प्रसाद गावडे खरोखरच उत्तम कोकणी माणुस आहे.पण हे राजकारणी त्याला जर राजकारणात आला तर जगु देणार नाहीत एवढे राजकारणी नीच आहेत.तेव्हा तो आपले वेगळेपण टिकवु शकणार नाही.तो आहे तसाच आम्हाला हवा आहे.
@poojakargutkar3042
@poojakargutkar3042 4 месяца назад
गावच गावपण जाणारा खरा कोकणवासी ,आम्हाला तुझा अभिमान आहे,
@rajendraborkar1689
@rajendraborkar1689 3 месяца назад
अप्रतिम, प्रसाद, तुला तुझ्या कार्यात खूप खूप खूप यश प्राप्त होवो. आज ,रान मानुस म्हटंल कि कोकण समोर दिसतो, हेच तूझ यश आहे ..
@sureshgawade9129
@sureshgawade9129 4 месяца назад
❤रानमानसाची आपण दाखवलेली मुलाखत🙏त्या बद्दल धन्यवाद ❤
@MsK0101
@MsK0101 4 месяца назад
प्रसाद.. IPH ne दिलेल्या संधीचा पुरेपुर फायदा केलास... उत्तम मुलाखत🎉
@dhavaljadhav8431
@dhavaljadhav8431 4 месяца назад
विचार ऐकताना मी तर चार वेळा हात जोडले असतील.. काळजाचा ठाव घेतला अक्षरशः म्हणतातना.. तसं झालं माझं.. कारण ज्या दिशेला मी चाचपडतोय (अर्थात 😊माझ्या करिअर व्यतिरिक्त) त्या विचारांची जणू पंढरीच सापडली!! त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने हा इकॉलॉजिकल इंटेलिजन्सचे आपल्यामध्ये रोपण केले पाहिजे.. त्याच्याभोवती जीSSव ओवाळून टाकला पाहिजे मग त्या तेजोवलया भोवती निसर्ग आपोआप टवटवेल, दरवळू लागेल.. खूप छान वाटलं संस्मरणीय व्हिडिओ एखाद्या सुज्ञाच्या आयुष्याला वळण देईल असा व्हिडिओ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि सीओइपी पुणे येथील PSF.24. IIPR विजेता 🙏🙏👏👏🙌🙌💫✨✨
@swatisawant2827
@swatisawant2827 4 месяца назад
कोकणात ची संस्कृती जपणूक करण्यास धडपड करणार्या प्रसाद दादाच मनापासून कौतुक आणि अभिनंदन. त्याचा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@yogeshkadam9306
@yogeshkadam9306 3 месяца назад
प्रसाद जसा कोकणी जीवनशैली जपण्याच काम करतोय तसंच प्रत्येकाने आप आपल्या स्थानिक जीवनाचे सुध्दा जपवणूक केली पाहिजे प्रतेक ठिकाणाची जीवनशैली ही अशीच नष्ट होत चालली आहे त्यामुळे आज काल खूप सारखे प्रॉब्लेम उभे राहताहेत .. त्यामुळे पारंपरिक काही गोष्टी जपायलाच पाहीजे
@user-lx2on1go8j
@user-lx2on1go8j 3 месяца назад
🙏 प्रसाद मी नेहमीच तुझ्याशी निघडीत सगळ्याच चित्रफीत आवर्जून बघत असतो. त्याला कारण पण तसच आहे. ते हे की तुझ्या नजरेतून मला आपल्या कोकणाचे आणि कोकणी माणसाचे भविष्य मनापासून सोन्यापेक्षा उत्तम होईल, याची खात्री आहे.
@shwetasawant4612
@shwetasawant4612 4 месяца назад
खूपच सुंदर अप्रतिम आहे तुझे व्यक्त होणे. खूप खूप अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹
@madhusmitaabhyankar2196
@madhusmitaabhyankar2196 4 месяца назад
खूपच सुंदर मुलाखत.आमच्या कोकणातला हा प्रसाद म्हणून खूप अभिमान वाटला.
@shubhamkshirsagar6429
@shubhamkshirsagar6429 4 месяца назад
प्रत्येक जण अंबानी होऊ शकत नाही आणि प्रत्येक जण हा रानमाणूस होऊ शकत नाही परंतु.... प्रत्येक जण हा अंबानी व्हायचंय, ह्या आशयाने आपले मार्गक्रमण करत असतो आयुष्यभर हा मूळ प्रश्न आहे. अंबानी होणे ह्यात आयुष्याच्या आनंद, समाधान आहे हे खोटं खरं मानून बसलाय प्रत्येक जण.....
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 3 месяца назад
Ambu? Addu,moddu,faddu hou ichchhinare mhanaje deshala lagat asaleli valvi ahe. Ugapali jivha batavun ghyayachi?
@aniketkhedekar1710
@aniketkhedekar1710 4 месяца назад
खूप कमाल❤ आम्हाला जे वाटतंय ते तू जगतोय. कोकण सोडून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला असं आजही वाटते की जगावं पण सत्यात तसं जगणं प्रत्येकालाच नाही जमत आहे. ही सगळ्यात मोठी खंत आहे. मनातल्या सगळ्या गोष्टी आज तुझ्या रूपाने बाहेर दिसल्या, आम्ही मात्र आजही मुके झालोय. तुझ्या निमित्ताने कदाचित स्वतःचा शोध कोकणी माणूस घेईल.
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 4 месяца назад
माझ्या मनातील बोललात.
@BhaktiAgroFarm
@BhaktiAgroFarm 3 месяца назад
Lifestyle कडे बघण्याचा perspective खूप छान आहे. खरच महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी "रान माणूस" तयार झालाच पाहिजे.❤❤❤
@Sudhirphadke26
@Sudhirphadke26 4 месяца назад
वेध चा बेस्ट एपिसोड 👌👌👌 जो निसर्गाच्या सानिध्यात जगतो तोच खरा मानव!
@yashavantijoglekar7203
@yashavantijoglekar7203 4 месяца назад
प्रसाद निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहतोय. असं राहणं मोठं सुखाचं आहे हे शहरी माणसांना लौकरात लौकर पटत जावं हीच सदिच्छा.
@shrikantparab
@shrikantparab 3 месяца назад
प्रसाद, तुझा आम्हाला अभिमान वाटतो , अतिशय तळमळ आहे कोकणाविषयी.....
@maheshyeram1584
@maheshyeram1584 4 месяца назад
सध्याची कोकणची परिस्थितीचे वास्तव मांडणारा अभ्यासु माणुस मला तुझा सार्थ अभिमान आहे
@balkrushnamirajkar5725
@balkrushnamirajkar5725 4 месяца назад
प्रेरणादायी व्यक्तीमत्व . अभ्यासू व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व . सलाम गावडे सर . नाडकर्डी सर नेहमी तुम्ही चांगले व्यक्तीमत्व आमच्या पुढे आणता . मनापासून धन्यवाद सर !
@deepakneman3041
@deepakneman3041 4 месяца назад
प्रसाद 🙏🏻 मातीच्या भिंतीतला जन्मआणी रानमाणूस थोर विचार 🙏🏻धन्यवाद
@swaminarkar3244
@swaminarkar3244 4 месяца назад
प्रसाद गावडे आपण आमच्या कोकणातले असास त्याचो लय मोठं अभिमान आमका आसा
@vivekdesai6133
@vivekdesai6133 4 месяца назад
प्रसाद गावडेंची अतिशय उत्तम, दिलखुलास आणि तितकीच अभ्यासपूर्ण मुलाखत डॉ.आनंद नाडकर्णी यांनी घेतली.
@kalpanasawant3143
@kalpanasawant3143 4 месяца назад
प्रसाद दादा इंजिनिअर होऊन तू एका वेगळ्या ध्येयाने वाटचाल करतो आहेस या कामात तुका भरभरून यश मिळांदेत हिच रामेश्वर चरणी प्रार्थना.
@pragikeskar6140
@pragikeskar6140 3 месяца назад
प्रसादची कोकण विषयीची तळमळ मनाला स्पर्श करते तुझ्या कार्याला भरभरून शुभेच्छा
@santoshvishwasrao4967
@santoshvishwasrao4967 3 месяца назад
प्रसाद कोकणासाठी काम करतो बाकीचे युट्युब वर पैशासाठी काम करतात
@chaitanyakarale2316
@chaitanyakarale2316 4 месяца назад
खरच याच्याकडे बघितल की बाकीच्या कोकणातल्या youtuber लोकांची लाज वाटते
@tanujanaik4410
@tanujanaik4410 4 месяца назад
प्रसाद सारखाच मुलगा प्रतेक आईच्याच पोटी जन्माला येऊ देत रे देवा.
@Lalbaug1973
@Lalbaug1973 3 месяца назад
एवढ्या कमी वयात किती अगाध अभ्यास आणि ज्ञान मिळवले आहे मित्रा. यासाठी खरच मनापासून तळमळ आणि तगमग असायला हवी.
@user-wh4hv8gk2c
@user-wh4hv8gk2c 4 месяца назад
अतिशय सुरेख मुलाखत झाली..प्रसाद तु खुप मनापासून बोलतोस, आतुन बोलतोस हे क्षणोक्षणी जाणवतं. निसर्गावर मनापासून प्रेम करतोस development च्या नादात खरंच निसर्गाशी असलेली नाळ कुठेतरी तुटत चाललेली आहे हे निश्चित तुझं बोलणं ऐकत रहावं..विशेषतः कोकणातील देवरायांबद्दल असलेली माहिती खुप छान आहे. खूप खूप धन्यवाद नाडकर्णी साहेबांना. आणि प्रसाद तुला पण खुप धन्यवाद
@philiprodrigues3344
@philiprodrigues3344 4 месяца назад
खूप छान...आपल्या भूमीवर , निसर्गावर प्रेम करणारा प्रसाद ...
@surekhaindap3794
@surekhaindap3794 8 дней назад
अतिशय प्रभावीपणे तुझे विचार मांडतो निसर्गाशी सुसंगत होऊन राहणे हे सर्वानी शिकले पाहिजे खूप छान प्रसाद 👍
@shobhatikam1334
@shobhatikam1334 4 месяца назад
कोकण वाचवण्याचा तुझा प्रयत्न खूप मोठ्ठा आहे.त्याला इतरांची ही साथ मिळणं आवश्यक आहे.असाच पुढे जा,कोकण आपलोच आसा.👍🌹🌹
@udaydabke1339
@udaydabke1339 4 месяца назад
मी पण राग माणूस होतो कारण मी मूळचा गुहाघरचा अजूनही मी अधून मधून गुहागरला जातो तिथे राहण्याचा आनंद उपभोगतो आणि शहराकडे परत येतो
@jinendrachougule1008
@jinendrachougule1008 4 месяца назад
तुज्या सारखे तरुण या आमच्या पीड़िला प्रेरणा स्तोत्र आहत
@arunkambli1105
@arunkambli1105 3 месяца назад
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. निसर्गा विषयी भर भरून बोलत असतो. या रणमानसा कडून बरंच शिकण्या सारखं आहे. 🙏
@prachikapse9590
@prachikapse9590 4 месяца назад
मुलाखत खूप छान झाली. लहानपणी आपण आपल्या मनाप्रमाणे जगत असतो. नंतर आजूबाजूच्या परिसराचां, समाजाचा आपल्यावर दबाव येऊन आपण आपल्या मनाविरुद्ध जगायला लागतो. मराठवाड्यात खरोखर मानवनिर्मित दुष्काळ आहे. नदीवर बांध बांधल्यामुळे नद्या वाहत नाहीत. आणि गावोगावच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीं. राजकारणी लोकं पाणी सुध्दा विकून टाकतात.
@jinendrachougule1008
@jinendrachougule1008 4 месяца назад
प्रसाद भाऊ तुझा कार्याला तर सलामच पन तुझा आवाज खुप आवडतो मला ❤❤ तुझा आवाज एकून कोकनाची खुप आठवण येते ।कोकण खराच स्वर्ग आहे❤
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 12 дней назад
नमस्कार प्रसादजी गावडे साहेब आपले विचार कोकणा बद्दल किती सुंदर आहेत तुम्हाला माझा सलाम
@maheshnerurkar6234
@maheshnerurkar6234 4 месяца назад
I have said this many times and shall say this once more, Prasad is UNIQUE! I have also watched many interviews on `Vedh' with admiration. You both are doing very important work. Your efforts have the potential of changing the world for the better! I am hoping that I will be able to actively participate/contribute to your efforts at some point.
@anuradhapatil2870
@anuradhapatil2870 4 месяца назад
प्रसाद तुझे मनापासून अभिनंदन!तुझ्या सारखे अनेक प्रसाद तयार होतील यासाठी प्रयत्न कर आणि त्यासाठी तुला शुभेच्छा!
@user-tl3se4xg2q
@user-tl3se4xg2q 4 месяца назад
अझुनही निसर्ग टीकण्याची आशा वाटते.तुझे काम बघुन.पुढील पिढी साठी तु अगदी योग्य आदर्श आहेस.तुझ्या कार्याला शुभेच्छा.
@nayanjadhav9567
@nayanjadhav9567 21 день назад
प्रसाद दादा तुझे विचार खरोखर च खूप मोठे आहेत, तू करत असलेले प्रामाणिक काम नक्कीच सर्वांना याचे महत्त्व लवकर कळेल.
@gayatripalled5146
@gayatripalled5146 15 дней назад
Engineering ,UPSC चा अभ्यास करून खऱ्या अर्थानं बुद्धिमत्तेची प्रगल्भता या व्यक्ती कडे इतक्या लहान वयात आली आहे 👌👌👍
@geetapednekar8681
@geetapednekar8681 4 месяца назад
प्रसाद गावडे कोकणातील निसर्गाची माहिती खूपच सुंदर आहे ❤ तुमचा सर्व कोकण वासियांना अभिमान वाटावा अशी माहिती दिली,💐👍 धन्यवाद 💐🙏
@rajendrapawar8186
@rajendrapawar8186 Месяц назад
प्रसाद कोकणचा आयकॉन आहे मला अभिमान आहे मी कोकणातील असल्याचा❤❤
@pravinparkar7006
@pravinparkar7006 15 дней назад
🙏प्रसाद मित्रा, तुझे हे विचार ऐकून मन भरून पावला रे!मी कणकवली कर मुंबई चो!तू मुलाखतीतून संपूर्ण कोकण नजरेत उभो केलस!आमका तुझो मनापासुन अभिमान आसा!तूच, तुझ्याच सारखीच पिढी घडव!तुझ्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा!मोडकी तोडकी मालवणी समजून घे!😊
@user-ir6gj5vy2n
@user-ir6gj5vy2n 4 месяца назад
प्रसाद तुझ खूप खूप अभिनंदन आणि अशीच एक मुलाखत आणि राजकीय पक्ष आणू नकोस सर्वांना म्हणजे कोकण करांना विनंती आहे की प्रसादला मदत करा
@jagdishkini8050
@jagdishkini8050 14 дней назад
या रान माणसाच्या स्वपनांची पूर्तता झालेली पहायच भाग्य याची देही याची डोळा मिळावे ही ईश्वरचरणी नम्र विनंती.श्री प्रसाद गावडेंच्या तळमळीच,पोटतिडकेच फक्त स्वगत राहू नये,हे कोकणावर नि:स्सीम प्रेम करणार्या प्रत्येक व्यक्तीच कर्तव्य असावं.
@prakashbhopale2606
@prakashbhopale2606 4 месяца назад
खूप छान विचार आहेत प्रसाद गावडे सरांचे खरचं आजच्या युगात गरज आहे यांच्या विचाराकडे लक्ष देण्याचे अन्यथा मानवजातीचा एकदिवस विनाश होईल १००%
@harshaldicholkar4419
@harshaldicholkar4419 4 месяца назад
नेहमी प्रमाणे प्रसाद ऐकायला खूप धान्य वाटते. अगदी मनातल बोलतो तू प्रसाद. देव तुला यश देईल.
@kundakelkar6523
@kundakelkar6523 3 месяца назад
You are simply brilliant Prasad!!!!!!!!!what depth of thinking at such a young age when most youngsters are happy spending weekends in restos and flashing their package lifestyle.hope you reverse the trend of village to city migration.loads of aashirwad✋✋✋✋✋✋
@asmitagad950
@asmitagad950 4 месяца назад
प्रसाद गावडे चे आनंदाचे अर्थकारण फारच अंतर्मुख करणारे
@armstrong172
@armstrong172 4 месяца назад
अतिशय सुंदर मुलाखत. प्रसाद तू हे जे काही कोकणाविषयी बोलतो आहेस ती व्यथा संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राची आहे. आहे ती शेती विकून टाकायची आणि विकेंडला ऍग्रो टुरिझम शोधत फिरायचं. एकेकाळी मावळही असाच सुंदर होता..शांतता होती..आता अनेक सुंदर गावं बेसुमार बांधकामाची जंगलं बनली आहेत.
@namratakambli1017
@namratakambli1017 Месяц назад
छान छान प्रसाद सर. Very nice speech
Далее
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Просмотров 74 тыс.
PORTAL SPAMMER🤬🤬🤬| Doge Gaming
00:19
Просмотров 1,3 млн
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
02:04
Просмотров 637 тыс.
PORTAL SPAMMER🤬🤬🤬| Doge Gaming
00:19
Просмотров 1,3 млн