आम्ही दर जून जुलै महिन्यात ही भाजी बनवायचो परंतु या वेळी दादरला ही भाजी मिळाली नाही.आणि लॉकडाऊन मुळे पूर्वी सारखे भाजीवाले पण येत नाही.भाकरी आणि भाजी चा वास आम्हाला ही जाणवला.विशेषतः प्रांजुला राहवले नाही.तिने पहिल्यांदा टेस्ट केली.
तरीपण एवढ्या लवकर नाही होत ही भाजी मी रत्नागिरी मध्ये राहिली जवळ जवळ 20 वर्ष. आता रानात काकवी ची भाजी तयार झालीय. टाकळा अजून लहान आहे. मी कालच गावी विचारलं.
ही भाजी कडू लागते आमच्याकडे या भाजीला उकळून पाणी गाळून नंतर बनवितो मी अशीच चिरून केली खूप कडू लागली. आमच्याकडे ही भाजी पावसाळ्यात न चूका आठवडाभर खाल्लं जाते
अरे भावा गमंतच झाली मी आज टाकळ्याची भाजी आणली साफ केली आणी शिजायला गॅस वर ठेवली नंतर म्हटल की रेसीपी बघुया तर ती चिरायला लागते. लगेच गॅस बंद करुन नंतर चिरली. पण आम्ही याला शिजवुन आतील पाणी काढुन पिळुन नंतर कांद्यामधे फोडणी देऊन शिजवतो