Тёмный

गीताध्यान व श्रीमद्भगवद्गीतामाहात्म्य | सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर | GeetaDhyan | Mrs. Aparna Abhyankar 

aditya pratishthan
Подписаться 61 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

सादरकर्त्या : सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
।। गीताध्यानम् ।।
गीता ध्यानम् - ज्याला गीता ध्यान किंवा गीतेशी संबंधित ध्यानश्लोक देखील म्हणतात, ही जणू ९ श्लोकांची संस्कृत कविता आहे जी हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता याचा पाठ म्हणण्या पूर्वी म्हणण्याची पध्दत आहे . हे श्लोक अतिशय पुण्यदायी आहेत .
१) पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्येमहाभारतम् ।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं
अम्ब त्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् ।।१।।
‘हे माते भगवद्गीते, भगवान नारायणांनी स्वत: अर्जुनाला उपदेशिलेली, प्राचीन मुनी व्यासांनी महाभारतामध्ये ग्रथित केलेली, अद्वैतरूप अमृताचा वर्षाव करणारी, संसाराला द्वेष म्हणजे उच्छेद करणारी, जिचे अठरा अध्याय आहेत, अशा गीतेचे मी चिंतन-स्मरण करतो.’
२) नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्ण: प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदीप: ।।२।।
‘फुललेल्या कमलपत्राप्रमाणे ज्यांचे आकर्णनेत्र आहेत, ज्यांची बुद्धी विशाल आहे, अशा हे व्यासमुने! ज्या तुम्ही भारतरूपी तेलाने भरलेला ज्ञानप्रचुर दीप प्रदीप्त केलात, त्या तुम्हाला नमस्कार असो.’
३) प्रपन्नपारिजाताय तोत्त्रवैत्रैकपाणये ।
ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नम: ।।३।।
‘शरणागतास कल्पवृक्षाप्रमाणे असलेल्या ज्याच्या एका हातात वेताची काठी आहे, ज्याने ज्ञानाची मुद्रा धारण केली आहे अशा गीतामृताचे दोहन करणार्‍या श्रीकृष्णाला नमस्कार असो.’
४) सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन: ।
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।।४।।
‘सर्व उपनिषदे याच गाई, नंद गोपालाचा पुत्र हा दोहन करणारा गवळी, पार्थ हे वासरू, गीतेचे अनुष्ठान करणारा बुद्धिमान जीव हा अमृत प्राशन करणारा भोक्ता, त्याच्यासाठी मोक्षासारखे श्रेष्ठ फल देणार्‍या गीतामृताचे दोहन केले.’
५) वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।।५।।
६) भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला
शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला ।
अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी
सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तक: केशव: ।।६।।
७) पाराशर्यवच:सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं
नानाख्यानककेसरं हरिकथासम्बोधनाबोधितम् ।
लोको सज्जनषट्पदैरहरह: पेपीयमानं मुदा
भूयाद्भारतपज्र्जं कलिमलप्रध्वंसि न: श्रेयसे ।।७।।
‘पराशरपुत्र भगवान व्यास यांच्या वचनरूपी सरोवरात उत्पन्न झालेले, निर्मल-शुद्ध-धर्म्य गीतार्थ हाच ज्याचा उत्कृष्ट सुवास आहे, नाना प्रकारची आख्याने हेच ज्यातील केसर आहे, हरिकथेच्या वर्णनाने जे प्रफुल्लित झाले आहे, या लोकी धार्मिक संतजनरूपी भ्रमरांकडून जे प्रत्यही मोठ्या आनंदाने वारंवार सेवन केले जाते, असे कलीचा मल घालविणारे, पातकाचा नाश करणारे, महाभारतरूपी कमल आमच्या कल्याणास कारण होवो.’
८) मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ् घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।८।।
९) यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत: स्तुन्वन्ति दिव्यै: स्तवै:
वेदै: साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा: ।
ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो
यस्यान्तं न विदु: सुरासुरगणा देवाय तस्मै नम: ।।९।।
‘ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, रुद्र व मरुद्गण ज्याला दिव्य स्तुतींनी स्तवितात, साम गायन करणारे वैदिक व्याकरणादी अंगे, पदे, क्रम व उपनिषदे यांसह वेदांनी ज्याचे गायन-वर्णन करतात, योगी ज्याला ध्यानाने स्थिर केलेल्या आत्मनिष्ठ मनाने पाहतात, देव व दानव यांचे समूह ज्याचा अंत जाणत नाहीत, देवादिकांनाही ज्याचा अंत लागत नाही, त्या स्वयंप्रकाश देवाला नमस्कार असो.’
ॐ श्री परमात्मने नम: ।
अथ श्रीमद्भगवद्गीतामाहात्म्यम् ।
श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वर्णिलेले हे ७ श्लोकांचे गीतामाहात्म्य केवळ अलौकिक आहे.
१) गीताशास्त्रमिदं पुण्यं य: पठेत्प्रयत: पुमान् ।
विष्णो: पदमवाप्नोति भयशोकादिवर्जित: ।।१।।
‘हे अतिशय पुण्यदायी असे गीताशास्त्र, जो निग्रही मनुष्य पठण करेल तो भय, शोक इ. पासून मुक्त होऊन विष्णुपद प्राप्त करून घेईल.’
२) गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च ।
नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च ।।२।।
‘गीताध्ययन करणार्‍यांची आणि प्राणायामपर मानवांची पूर्वजन्मकृत पापे रहात नाहीत.’ (नाश पावतात).
३) मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने ।
सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनम् ।।३।।
‘माणसाने प्रत्येक दिवशी जलाने केलेले स्नान हे शरीराचा मल नाहसिे करते. पण गीतारूपी जलात केलेले स्नान हे संसाररूपी मल नाहिसे करणारे असते.’
४) गीता सुगीता कर्तव्या किमन्यै: शास्त्रविस्तरै: ।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनि:सृता ।।४।।
५) भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनि:सृतम् ।
गीतागङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ।।५।।
‘भरतश्रेष्ठ अर्जुनाला अमृत आणि सर्वस्व असलेले, विष्णुच्या मुखातून बाहेर पडलेले गङ्गोदक प्राशन केल्यावर पुनर्जन्म रहात नाही.’
६) सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन: ।
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।।६।।
‘सर्व उपनिषदे या गायी आहेत, गोपालनन्दन श्रीकृष्ण हा दोहन करणारा आहे, पार्थ अर्जुन हा बालक आहे, ज्याची बुद्धी चांगली आहे असा पुरुष ते गीतामृतरूपी दूध प्राशन करतो.’
७) एकं शास्त्रं देवकीपुत्रगीत्तम् को देवो देवकीपुत्र एव ।
एकोमन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ।।७।।
‘एकच शास्त्र आहे- देवकीच्या पुत्राने गाइलेले गीत. एकच देव आहे- देवकीचा पुत्र. एकच मंत्र आहे - त्या परमत्माची नावे. एकच कर्म आहे- त्या देवाची केलेली सेवा.’ ।

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
Далее
Слушали бы такое на повторе?
01:00
गीता पठण अध्याय ७
8:07
Просмотров 44 тыс.
Meenakshi Ashtakam
7:30
Просмотров 1,5 тыс.
Marathi Shriramaraksha
13:11
Просмотров 878 тыс.