आचरे वासियांनी बागेश्री स्थान उर्जीतावस्थेत आणावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. तिथे पूर्वी पावसाळ्यामध्ये बहारदार वातावरण असायचे, नारायणदेवा चे मंदिर आहे, तिथे जाण्याचा रस्ता तरी रुंद असावा की पालखी नीट नारायणदेवाच्या मंदिरात जाऊ शकेल. एक छोटा धबधबा तिथे वाहत असायचा, खाली उतरलं तर फार जुनं असं गणपतीचे मंदिर आहे. त्या काळी तिथे संस्कृत ,पाठशाला गुरुशिष्य परंपरा चालत होती. फार पवित्र ठिकाण आहे ते. तिथे पोहोचल्यावर त्या पवित्र वातावरणातून हलू च नये असं वाटतं. कुणीतरी तिथेच राहणाऱ्या नी लक्ष ठेवले तर बरं होईल. लोकांनी स्वच्छता पाळावी,
आचरा गाव आणि समुद्र किनारा खूप छान आहे पण तीन दिवस आम्हाला खूप वाईट अनुभव आला तो म्हणजे सकाळी जवळपास पन्नास साठ लोकं हगायला बसली होती ते किळसवाणे द्रूष्य् बघून आम्हालाच लाज वाटली मी विनंती करतो की खरी वस्तूस्थिती कॅमेरात टिपून ती लोकांसमोर यावी म्हणजे ग्रामपंचायत ला जाग येईल आणि समुद्र किनारा स्वच्छ होईल
Third class video. Blog kartana audio chi tari kalaji ghya. Kokan vale jevadhe bloger aahet tya saglyanchi audio quality third class asate. Please improve.