Тёмный

जावली येथील मोरे घराण्याचे कुलदैवत , पार गावची आदिशक्ती श्री रामवरदायनी आणि भरण्याची आई काळकाई देवी 

Konkan_Beauty
Подписаться 73
Просмотров 545
50% 1

जावली येथील मोरे घराण्याचे कुलदैवत , पार गावची आदिशक्ती श्री रामवरदायनी आणि भरण्याची आई काळकाई देवी नवरात्र उत्सव निमित्त कुटुंबासहित दर्शन…
जावळी म्हणजेच जयवल्ली, ‘येता जावळी जाता गोवली’ म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वजावला अशी ती जावळी. .एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , भोरप्या(आता प्रतापगड) रायगड सारखे अभेद्य जंगल आणि किल्ले कपारी आणि तिथूनच कोकणात उतरला तर थेट अरबी समुद्र अशी ही जावळी खोऱ्याची रचना आहे.सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडे जावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलाग खोरं इतकं अवघड आणि अभेद्य की, १४ व्या शतकात ५००० मुसलमानी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाण देखील लागला नाही.अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होत.
जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव ‘चंद्रराव’ असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला. चंद्रराव मोर्‍यांनी आठ पिढ्या खपून त्यांनी आपले वैभव एखाद्या सार्वभौम राजासारखे वाढविले होते . मोऱ्यांजवळ १०-१२ हजार फौज होती. महाडपासून महाबळेश्वर पर्यंतचा डोंगरी भाग व बव्हंश सातारा जिल्हा त्यांनी काबीज केला होता. या बाजूने कोकणात उतरणाऱ्या हातलोट व पार घाटातील माल वाहतुकीची जकात मोरे वसूल करीत. त्यांच्या अमलाखाली महाबळेश्वर, जावळी(कोयनेचे खोरे), वरंधघाट, पारघाट, शिवथर, रायगड इतका प्रांत होता.
-------
श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. गाव प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. महाबळेश्वर - पार या रस्त्याने ते महबळेश्वरपासून २० मैलावर येते. छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळा पूर्वी पासून आहे. चंद्रराव मोरे घराण्याने पहिले मंदिर बांधले.
पार्वतीपूर (पार) ही एक बाजारपेठ होती. सातारा - वार्इ - मेढा त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील महाड, पोलदपूर इत्यादी ठिकाणाहून व्यापारी लोक पारला येऊन मोठा बाजार भरवीत असत. या व्यापारी पेठेचे विभाजन करून पारपार, पेठपार व सोंडपार अशी तीन गावे निर्माण केली व त्यांसाठी वेगवेगळी मुलकी व पोलीस पाटलांची व्यवस्था केली.
श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील एक जागॄत शक्तीपीठ आहे. ही महाराष्ट्रातील सर्व हिंदू - मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची कुलदेवता आहे..
--------
काळधर्म निवारण करणारी देवी म्हणून देवीचे नाव श्री काळकाई असल्याचे सांगतात. काळधर्म निवारणारी काळकाई देवी तमाम भक्तगणांच्या गळ्यातील ताईत बनली असून, महामार्गावरून येणारे-जाणारे नेहमीच या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करीत नाहीत. देवीच्या ठायी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊन मानसिक आधारही मिळतो.
#kokan #cinematic #travel #navrtari #hindu #goddess #ramvardayani #javali #satara #more #raje #kuldaivat #devi #aai #ratnagiri #rakshak

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@ChaitalisSecretCorner
@ChaitalisSecretCorner 3 дня назад
👌
@daredevilNeo
@daredevilNeo 3 дня назад
Wow😮😍😍
@supriyamore4127
@supriyamore4127 4 дня назад
कुंभाळजा माते की जय
Далее
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 24 млн