कधी लावणी संपते न तुम्ही फ्री कधी होताय? याची वाट पाहत होती तुुमचा व्लॉग पाहायचा होता सर. मि सुध्दा केली लावणी, माझी झाडे सुध्दा मोठी होत आहेत नवीन नवीन येणारी पालवी पाहुन मन समाधानी होते. स्वर्गरूपी रायगडमध्ये राहणारी मि खुप नशिबवान आहे 🥰🚩🙏🚩आपण सर्वच कोकणकरवासी🥰 सर्वानी काळजी घ्या माझ्या निसर्गाला दोष नाही लागणार याची. खुप सुंदर दादा 👌👌 आता टाइम काढून विडीओ पाहिजेत आपल्याकडून. 😊👍👌👌👌 खुप शिकते आहे तुमच्याकडून.
मी सुध्दा ह्या वर्षी पहिल्यांदाच कोकणात पारंपारिक पध्दतीने नांगरणी आणि लावणी केली...Inspired by you...Thank you for inspiring young generation like us ❤
गावची जीवन शैली आणि ही शेतातली काम पण शिकून निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचे स्वागत करायला आवडेल .आणि तुझ्या बरोबर त्या विहिरी चा पाणी प्यायला आणि त्याच पाण्यात बनवलेले रुचकर जेवण करायला खुपच आवडेल. ❤❤❤
प्रसाद जी खुप खुप सुंदर काम आहे तुमचे या कोकणी जनजागृती करत असताना सरकाने ग्रामीण भागामधे फळ शेतीला भाजी शेतीला त्याच बरोबर सरकारी नोकरीत भरती करणे खुप गरजेचे आहे .त्यामुळे तरुण मुले गावामध्ये रहातील आणि गाव भरलेले राहील .🙏🙏🙏
शेतीसाठी जे बैल वापरतात ते कोकण गिड्डा गाईपासून जन्माला येतात. कोकण गिड्डा गाय वाचली तर भविष्यात बैल जन्माला येतील. कोकणगिड्डा गाय वाचवण्यासाठी प्रसाद प्रयत्न केले पाहिजेत.
प्रसाद भाऊ खुप छान कोकणातील शेती दाखवतात. प्रत्येक माणसाला हे सर्व आपल्या गावात जाऊन आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . धन्यवाद भाऊ तुमच्या मुळे आम्ही कोकण पहात आहोत .
फक्त शेती जपून होणार नसून त्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका सावंतवाडी येथील येणाऱ्या गावात सुसज्ज मुंबईतील अंबानी सारखे हॉस्पिटल राज्य सरकार ह्यानी करण्याची आज गरज आहे.