त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना। सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैसी न कळे ही मात। पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचा पुरलासे अन्त ॥
दत्त येऊनियां ऊभा ठाकला । सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हरपले मन झालें उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥
6 окт 2024