हजार-बाराशे रुपयांत सुरू करा अक्षता व्यवसाय | कमी गुंतवणुकीत नफा, घरबसल्या पैसा | Shivar News 24
तुम्हाला जर एक हजार ते बाराशे रुपयांच्या गुंतवणुकीत व्यवसाय करायचा असेल तर अक्षता उद्योग खूपच फायदेशीर आहे. लातूर येथील पल्लवी वाकडे यांनी अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये अक्षता व्यवसाय सुरू केला आहे. त्या आज घरी बसून करा महिन्याला हजारोंची उलाढाल करीत आहेत. लातूर येथील वाटाड्या प्रशिक्षण संस्थेमुळे या उद्योगाला चालना मिळाल्याचे पल्लवी वाकडे यांनी नमूद केले आहे. झिप बॅग, पोटली, कोना अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अक्षतांची पॅकिंग केली जाते. झिप बॅग आणि कोन अक्षतांना मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. घरचा तांदूळ आणि फूड कलरमध्ये व्यवसायाची सुरवात करता येते. अक्षता व्यवसाय आता वर्षभर चालणारा आहे.
#akshatabusiness
#pallaviwakade
#marathiudyog
#businessideas
#shivarnews24
4 окт 2024