कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत. कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, रामदासी संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल. Email: sampark@kirtanvishwa.org
ಕೀರ್ತನ ಕೇಸರಿ ಶ್ರೀಮತಿ ಶೋಭಾ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜೈ.🙏🙏🙏💐💐 Excellent,what a brilliant presentation ಸ್ವರ ಲಯ ತಾಲಬದ್ಧ ಹಾಡು,ಸುಲಲಿತ ಕಥಾಶೈಲಿ ವೇಷಭೂಷಣ,ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೀರ್ತನೆ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ಸುಂದರ ಮುಖದಲ್ಲಿ ತೋರುವ ಮಂದಹಾಸ, ಮೈ ತೊ ಫಿದಾ ಹೋಗಯಿ. ನಿಮ್ಮ ಸೊಸೆಯಿಂದ ದೃಷ್ಟೀ ತೆಗೆಸಿಕೊಳ್ಳಿ.👑 kusuma kulkarni
Very excellent kirtan and explanation by didi ji .Jay shree Raghuvir Samarth.Har har Narmade, Har har Shambhu Har har Mahadev, Har har Gange.With regards.K.B. Khandale , Ex-Indian Navy Sailor.