नवोदितांसाठी अतिशय उपयुक्त माहिती संकल्पना छान सुंदर शब्दांत उदा.दाखलसहित पटवून दिले.मनापासून विषयाची संकल्पना समजावून देतांना मांडताना जाणवले.धन्यवाद ताई 🙏🌹
"साथ आमची यश आपले" K' D classes Net/Set/Pet Subject- Marathi. 1) काय वाचावे 2) कसा अभ्यास करावा 3) प्रत्येकाचा सहभाग 4) वैयक्तिक मार्गदर्शन / शंकानिरसन 5) परिक्षाभिमुख तयारी 6) प्रश्नोत्तर तयारी 7) संदर्भ ग्रंथ कसे हाताळावे 8) तुमच्याकडून बेसिक ( foundation) तयारी 9) नेमके स्वरूप व काय हेतू या परिक्षांचा. १००% हजेरी आवश्यक
'वनवास', हा प्रकाश नारायण संत यांचा कथासंग्रह आहे. वनवास, झुंबर, पंखा हे संत यांचे कथा साहित्य. प्रकाश संत यांचे हे कथालेखन असले तरी या कथांची भाषाशैली लालित्यपूर्ण, आठवणीपर, अनुभवसमृध्द, ओजस्वी अशी आहे. लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेल्या या कथा आहेत. कथा व ललित गद्य या साहित्यप्रकारातील सीमारेषा येथे धूसर झालेली दिसून येते.
कथा, कादंबरी या प्रमाणेच ललित लेखन हा एक साहित्य प्रकार आहे. कथा लेखन, कादंबरी लेखन यांची जशी वैशिष्टयै आहेत जसे आकारा वरून, प्रकारा वरून जसे की दीर्घ, लघु कथा, दीर्घ, लघु कादंबरी, ग्रामीण, स्त्रीवादी इ. तसेच 1)ललित लेखनाचा आकार हा मर्यादित असतो. 2) तो लवचिक, सर्वसमावेशक लेखन प्रकार आहे . 3) ललितलेखनाची भाषा ओजस्वी व प्रसन्नता हे गुण असतात. 4) आत्मनिष्ठ लेखनप्रकार आहे. इ. ललित लेखनाची वैशिष्टये आहेत.