Тёмный

संतचारणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..पारंपरिक चालीत गायलेला कीर्तन सेवेचा अभंग 

Vasantgadkar Official
Подписаться 250 тыс.
Просмотров 804 тыс.
50% 1

रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
.हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Опубликовано:

 

9 дек 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 299   
@sudeepmore4546
@sudeepmore4546 Год назад
या भवनदीचे पाणी रे गडीया मोठे ओढीते। भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटूनि पाडिते || १ || उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी । भरला पूर मायेचा लोंढा वाहूनिया जाशी ॥ध्रु॥ अविद्येचा पूर गड्या, वेगी ओसरेना । कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना ॥२॥ क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही। उरला नरतनु गेल्या वरती, होशील पस्ताई ||३|| म्हणे मुक्ताई जाण चांग्या अंतरीची खूण | धरी सद्गुरुचे पाय तूला नेतील तारून ॥४॥ - संत मुक्ताबाई
@chaitalijoshi7118
@chaitalijoshi7118 Месяц назад
भरला पुर मायेचा लोंढा ,वाहूनिया जाशी.... कलियुगाचे सत्य..आणि हा अभंग म्हणजे त्या सत्यावर मात करत परमेश्वराच्या नामात असलेलं सुख शोधण्याचं साधन 🙏
@ashishwankhade1853
@ashishwankhade1853 2 года назад
पंढरपूरचा श्रीहरी साक्षात येऊन पावली करत असेल इतक्या कर्णसूखद आणि प्रखर आवाजाचा आपणांवर सरस्वती मातेचा आशिष आहे.💐💐🙏 परस्पर भेटीची आशा आहे बाळकृष्ण दादा.....रामकृष्णहरि
@adityadeokate315
@adityadeokate315 2 года назад
🙏🌺🌸🌹🛕🚩
@omkarjadhav8875
@omkarjadhav8875 Год назад
मी माझे भाग्य समजतो माझ्याकडून महाराजांचा सत्कार झाला
@pravinvyawhare4806
@pravinvyawhare4806 7 дней назад
अतिशय सुंदर गायन महाराज आपणास माता सरस्वतीचा वरदहस्त च लाभला आहे .तुम्हाला सेवा करीत दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@arunwavare5891
@arunwavare5891 2 месяца назад
सकाळी 5.30 वाजता काकडा भजन व सायंकाळी 7.00 वाजता हरिपाठ ऐकणे ...हा माझा नित्य दिनक्रमाचाच भाग झालाय महाराज आपणास या सेवेकरीता उदंड आयुष्य लाभो हीच श्री पांडुरंग चरणी प्रार्थना..💐
@vijaygurav8909
@vijaygurav8909 3 года назад
ह.भ.प.वसंतगडकर दादा महाराज यांचे गायन अप्रतिम आहे सतत ऐकत रहावे असे वाटते. खुप खुप छान गायन.
@vineshsalvi2394
@vineshsalvi2394 3 года назад
माझा रोजचा दिवस या अभंगाने सुरू होतो...धन्यवाद ..शि.सा.नमस्कार ...महाराज.
@prashant4151
@prashant4151 3 года назад
बाळकृष्ण दादा यांचे अभंगाच्या चाली फारच छान असतात दादांचे गायन मला फारच आवडते ‌.यासाठी माझ्याजवळ शब्द नाही. 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
@ganeshmohite7269
@ganeshmohite7269 2 года назад
दादा तुंमचा आवाज आणि तुमच गायन एवढ सुंदर आहे की अस वाटत सतत ऐकत राहावं खूप अप्रतिम आवाज आहे तुमचा
@girishgorte6880
@girishgorte6880 3 года назад
गोड गोड आवाज सारख सारख ऐकावस वाटतय.कंटाळा अजिबात येत नाही..खरच धन्यवाद महाराज..जय माऊली जय विठ्ठल ...
@vijayappadomale8818
@vijayappadomale8818 2 года назад
अप्रतिम गायन दादा जीवनाचे सार आहे या अभंगात सद्गुरूंचे किती महत्त्व आहे. आपल्या जीवनात ते पण कळते .
@deepakdevlekar6391
@deepakdevlekar6391 3 года назад
किर्तन गायनातले भीष्म रुपी कीर्तनकार ❤️
@user-um5uv9ry4l
@user-um5uv9ry4l 3 года назад
सिद्ध, साधू, त्रिदेव आदि सब, पाच शब्द मे अटके ,मुद्रा साथ रहे घट भितर ,फिर औंधे मूह लटके ,परम पुरुष घर अधर तार है, अधर तार के आगे, उसके आगे कोण बतावे ,सभी शब्द मे पागे, ऊनके आगे भेद हमारा जाने गा कोई जानन हारा कहे कबीर जानेगा वही जिस पर कृपा सद्गुरु की होई साहेब बंदगी.. सतनाम...👋👋👋👋🚩🚩🙏🙏🙏
@gauravsutar5707
@gauravsutar5707 2 года назад
राम कृष्ण हरी महाराज तुमच्या आवाजात खरी जादू आहे तुमच्या आवाज मला ऐकला माझ्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले 🙏🙏 राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ II Ram Krishna Hari II II राम कृष्ण हरीII
@gorakhshingade1812
@gorakhshingade1812 3 года назад
खूप छान सुंदर आति सुंदर माउली वा माझे दंडवत माऊली
@akashbhadirge8883
@akashbhadirge8883 7 месяцев назад
साक्षात पांडुरंग परमात्मा रंगून जात असेल इतकी ताकद आहे महाराज तुमच्या भजना मध्ये 🙏🏼🙏🏼❤
@user-wm4qq1nm2d
@user-wm4qq1nm2d 3 года назад
अप्रतिम शब्द नाहीत. काय लिहाव सुचत नाही या अभंग जला कळाले तो जिनात तरला जय हरी राम कृष्ण हरी
@ravindrajaware8285
@ravindrajaware8285 3 года назад
बाळकृष्ण दादा यांचे अभंगाच्या चाली फारच छान असतात दादांचे गायन मला फारच आवडते आप्रतिम् आवाज महाराज...
@vilasjaitapkar403
@vilasjaitapkar403 3 года назад
अप्रतिम आवाज ..राम कृष्ण हरी.वाह बुवा
@vilasjaitapkar403
@vilasjaitapkar403 3 года назад
रोज iykato मी
@suhasmohite5138
@suhasmohite5138 3 года назад
दादा महाराज आपल्या वाणीतून साक्षात सरस्वती अवतरते माझ्या कडे तुमची प्रशंसा करण्यासाठी शब्द चं नाहीत
@gajananp049
@gajananp049 3 года назад
भावविभोर होऊन , डोळ्यातुन अश्रुधारा वाहू लागतात । किती सुंदर सतत ऐकत राहावे, आपले चरणी महाराज नमन करतो
@prajyotkambli8476
@prajyotkambli8476 Год назад
aapn pakvaj vajavta ka
@vikassubhedar1502
@vikassubhedar1502 3 года назад
खूब सुंदर इंदौर या वे राम kerashn heri
@sameerdamle6528
@sameerdamle6528 2 года назад
स्वामीजी आपल्यातील अहंकार पूर्णपणे जावून आपण एकरूप झालेले आहात त्यामुळे आपल्याकडून गुरू दत्तात्रेय स्वामी महाराज हे अप्रतिम कार्य घडवून आणत आहेत, आपल्याला शिरसाष्टांग नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयजयकार असो. श्रीपाद राजम शरणं प्रपदये🙏🙏🙏🙏
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
🌹॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ 🌹II Ram Krishna Hari II 🌹II राम कृष्ण हरीII 🌹🌹
@God-Adi07
@God-Adi07 6 месяцев назад
राम कृष्ण हरी महाराज 💐🙏🙏जय श्री राम
@devlaljiborde4902
@devlaljiborde4902 3 года назад
महाराज, नमन. तार सप्तकात सहजपणे आवाज जातो आणि गोडवा देखील कायम राहतो.मध्य सप्तकात आल्यावर सहजपणे नियंत्रण करता.मोठी कमाल आहे! साथसंगत उत्तम, टिपेचा तबला आणि मृदंगाचे एकरूप होणे म्हणजे नेहमीचे साथीदार आहात.टाळकरी एका सुरात आणि रममाण होऊन गातात. पहिल्यांदा ऐकले,आता नियमितपणे ऐकणार.जयहरी!
@vidyasawant7349
@vidyasawant7349 2 года назад
महाराज , तुमचं किर्तन पहिल्यांदा च ऐकलं आणि आता सतत ऐकत रहावं असं वाटतं, रात्री झोपण्यापूर्वी तुमचं एखादं किर्तन ऐकल्याशिवाय रहात नाही.इतकी गोडी आहे तुमच्या आवाजात.संपुर्ण ग्रुपच उत्तम आहे...
@dineshghogare719
@dineshghogare719 Год назад
बरोबर एकदम ह्यदयाची झेप घेणार किर्तन
@geetagaikwad9024
@geetagaikwad9024 3 года назад
जीवनाचे सार आहे या अभंगात ज्याला कळले तो या भवसागरात तरला 🙏🙏
@satsangkirtan4600
@satsangkirtan4600 3 года назад
Olppoo
@poojapawar6366
@poojapawar6366 3 года назад
Khupch mast 👌👌
@akshaykharade6376
@akshaykharade6376 3 года назад
Ram Krishna Hari.. Divsachi Suruvat ya abhangane hote.. Apratim..
@9226646334
@9226646334 Год назад
अतिशय मधाळ असा आवाज,, दादा खुप खुप धन्यवाद आणि गोड आवाज असाच नेहमी एकायला मिळो, पांडुरंग कृपा तुमच्यावर अशीच अखंडित राहावी हीच प्रार्थना करतो.......💐💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dsk35samadhi
@dsk35samadhi 2 года назад
वाह वाह....... गंगा प्रवाह गंगा प्रवाह... गंगा प्रवाह
@9011073855
@9011073855 2 года назад
राम कृष्ण हरी..खूप सुंदर चाल
@vilaslakule6793
@vilaslakule6793 3 года назад
साक्षात पांडुरंगाचे दर्शन तुमच्यामुळे होते तुमच्या चरणी नमस्कार
@rohitmore3464
@rohitmore3464 3 года назад
काय भारी गायन आहे महाराज आपलं ,मंत्रमुग्ध झालो आज,चाल 👌👌☝️
@shyam.Gaigole
@shyam.Gaigole 3 года назад
सप्रेम जय हरी. खूपच अप्रतिम चाल आणि तितकाच गोड आवाज. कितीही ऐकला तरी मन भरत नाही.
@shubhamraut1965
@shubhamraut1965 2 года назад
खरंच खूप छान आहे या अभंगातून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आपण या संसार मोह या सर्वात कुठेतरी वाहून जात आहोत पण त्यातून ही कस सावरता येईल असा गोड संदेश आदिशक्ती आई मुक्ताई मातेन दिला आहे खरंच खूप सुंदर झालाय अभंग महाराज असेच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच त्या पांडुरंगा चरणी प्रार्थना... राम कृष्ण हरी
@sureshpuri4148
@sureshpuri4148 3 года назад
Very nice abhang chal Thanksgiving guru vasantgadkar koti koti pranam naman
@meenasalunkhe4204
@meenasalunkhe4204 2 года назад
वा...... खुप सुंदर..... दादा 🌹🌹राम कृष्ण हरी 🙏🙏
@namdeoparthe2555
@namdeoparthe2555 2 года назад
खूप छान राम कृष्ण हरी...
@ramrajagoud5491
@ramrajagoud5491 3 года назад
मनाला भगवंताचे चरनाजवळ घेऊन जानारा सु़ंदर असा गोड आवाज
@kul12345
@kul12345 2 года назад
मनात स्वार्थ असेल तर प्रपंच,निस्वार्थ असेल तर परमार्थ।। किती सोपं आहे। राम कृष्ण हरि
@rekhadalve8581
@rekhadalve8581 Год назад
मन तूर्पत होते तुमचा आवाज ऐकुन 🙏🙏🙏
@vijayasalte2390
@vijayasalte2390 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏 सद्गुरु माऊली तुमच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झाले
@lingrajbirajdar522
@lingrajbirajdar522 Год назад
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी......‌
@shammore6677
@shammore6677 2 года назад
खुपच सुंदर मंत्रमुग्ध होऊन जातोय ऐकूण
@vyankteshsarang7234
@vyankteshsarang7234 2 года назад
Tumhi evadh chhan gayan karata maharaj tumach gayan yekayach vyasan lagalyasarakh zal kiti hi veles yekavach vavat
@anantutekar8219
@anantutekar8219 3 года назад
🌹🙏🙏 जय हरी माऊली 🌹🙏🙏 जीवन जगण्याचा सार आहे या आभगात आहे माऊली जय हरी जय हरी रामकृष्ण हरी 🙏🙏
@sureshpuri4148
@sureshpuri4148 3 года назад
Very nice chal aprtim awag balkrusnadada jai gruji
@mangeshmargi4998
@mangeshmargi4998 Год назад
अतिशय सुंदर माऊली 👌👌👌
@ravishinde5203
@ravishinde5203 Год назад
Naad khula aapla awaj aahe. Maharashtrat tari tod nahi.
@devdattaavhale6745
@devdattaavhale6745 Год назад
अतिशय अप्रतिम ,चाल,काकड आरतीने मन प्रसन्न होते जय गुरुदेव. राम कृष्णा हरी
@gayatrikhadilkar9198
@gayatrikhadilkar9198 2 года назад
सुरेखच.👌👍 आदर पूर्वक नमस्कार.
@rajchandane9837
@rajchandane9837 3 года назад
अध्यातमाची जोड असलेला अभंग खूप सुंदर रीतीने गायला तूम्ही दादा
@user-wm4qq1nm2d
@user-wm4qq1nm2d 3 года назад
असे वाटते एकतच रहाव ....
@purushottambhosale8773
@purushottambhosale8773 3 года назад
रामकृष्णहरि महाराजजी खूप सुंदर चाल आणि अभंगही
@motepradeep9562
@motepradeep9562 3 года назад
महाराज, उत्कृष्ट गायन, खूपच सुंदर.
@gajananchogale6488
@gajananchogale6488 3 года назад
अत्यंत महत्वाचा व आत्मज्ञान गाभा असणारा अभंग महाराज.असल्या अभांगवर कीर्तन प्रवचन फार कमी आईकायला मिळतात.शक्य असल्यास अभांगावर प्रबोधन झालं तर उत्तम.
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rUXLnbSXyQ4.html 👆👆 या अभंगावरील संपूर्ण कीर्तन
@NileshJadhav-xh6nf
@NileshJadhav-xh6nf 3 года назад
खूप खूप वास्तव मांडले खूप संदिग्न झालो. तासोन तास सांगण्यापेक्षा येका अभंगात 8 वर्षाच्या मुक्ताई बाई मांडले
@laxmanshete348
@laxmanshete348 Год назад
अतिशय सुंदर आवाज व गायन.. शेवटची ओळ अतिशय सुंदर... जा सद्गुरू शरण तुज नेतील तारून..🙏🙏
@atuljadhav6194
@atuljadhav6194 3 года назад
खूप वेळा ऐकत बसावं🙏
@user-yd2xx6lm5k
@user-yd2xx6lm5k 4 месяца назад
राम कृष्ण हरी .. महाराजांचा आवाजात स्वर्ग सुख भासते 👌
@panditgodse2085
@panditgodse2085 8 месяцев назад
जय हरी माऊली 🙏🚩 साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर विराजमान झाली आहे असा भास होतो.
@rekharewalkar2364
@rekharewalkar2364 3 года назад
खूप सुंदर सतत ऐकावे वाटते नि मी रोज ऐकते.मस्त बोथपर आहे. आवाज पण गोड. नमन माझे सदगुरूला
@sarveshwarisangeetvidyalay6540
फारच सुंदर गुरूजी अभंग आणि गायन चाल तर अप्रतिम 🙏🙏👌👌👌👌👌🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@hindiclasses1586
@hindiclasses1586 3 года назад
सुबह-शाम आपके अभंग गायन सुनता हूं आपको बहुत धन्यवाद
@raghunandaninamdar6754
@raghunandaninamdar6754 2 года назад
अति उत्तम महाराज💐💐🌹🌹 राम कृष्ण हरी
@saudagarpatil7641
@saudagarpatil7641 2 года назад
राम कृष्ण हरी 🙏🙏 अतिशय सुंदर आवाज व सुंदर अशी चाल 🙏🙏
@pramodjagdale1632
@pramodjagdale1632 3 года назад
सुंदर असा आवाज असतो नेहमी ऐकतच असे वाटते
@sopanpimple2283
@sopanpimple2283 3 года назад
अभंग एकुण....खुप ..छान....वाटले.... महाराज......जय हरी
@dipakdixit8369
@dipakdixit8369 3 года назад
पदमनाभ तबला,मृदंग... टोन...आस...बेस,बास.......सूदंर...ही रेजं कायम ठेव...,,🙏
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
थँक यु दीपक दादा 🙏🙏
@laxmanyamkar8722
@laxmanyamkar8722 3 года назад
अप्रतिम गायन, बाळकृष्ण दादा, जय हरि
@dhananjaygalande2249
@dhananjaygalande2249 11 месяцев назад
महाराज आपला आवाज खूप सुंदर आहे आम्ही सर्व घरचे लोकं तुमचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध होतो
@omkarsutar1782
@omkarsutar1782 3 года назад
खूपच छान 👌👌👌👌👌 || राम कृष्ण हरी ||
@shubhamjavalekar9906
@shubhamjavalekar9906 3 года назад
तुमच्या गायनाने मला परमार्थाची ओढ लागण्याची दाट शक्यता आहे🚩🙏🙏
@9320032402
@9320032402 3 года назад
नक्किच जरुर ऐका
@purnanandjambhavdekar2540
@purnanandjambhavdekar2540 3 года назад
Hi khup chan gost aahe.
@rahuljachak1559
@rahuljachak1559 3 года назад
maza ekahi divas ha avaj na aikta jat nahi :)
@padmakarpanchal.
@padmakarpanchal. 3 года назад
राम कृष्ण हरी
@yogeshgavhale731
@yogeshgavhale731 3 года назад
संतांची काव्य जन उद्धार करीत असतो त्यातुन आपण सादरीकरण केलेलं तर खूपच सुंदर निःशब्द....जय हरी माऊली 🙏
@anujadeshmukh8023
@anujadeshmukh8023 Год назад
कितीवेळा एकल तरी एकत च रहावे असे वाटते सुंदर अर्थ सुंदर चाल , जय सद्गुरू🙏
@pandurangbhalekar9727
@pandurangbhalekar9727 Год назад
अतिशय सुंदर आवाज व गायन ,धन्यवाद माऊली
@harishraikwad2472
@harishraikwad2472 Год назад
महाराजांचा अभंग लय बद्ध, तालबद्ध आणि सूर बद्ध. भारावून गेलो.
@shubhamkakde7490
@shubhamkakde7490 3 года назад
जय हरि महाराज अभंग खुपच गोड आहे
@ramakantpatil1071
@ramakantpatil1071 3 месяца назад
🙏🙏 आपल्या चरणापाशी साष्टांग दंडवत महाराज 🙏🙏🙏
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 3 года назад
खूप सुंदर आवाजात अभंग गायला आहे आम्ही दररोज सर्व अभंग ऐकतो रामकृष्ण हारी
@pramilawate8291
@pramilawate8291 3 года назад
खूपच छान अप्रतिम आवाज खुप मधुर हृदयाला भिडणारी.
@prathameshkambe7682
@prathameshkambe7682 3 года назад
आप्रतिम् आवाज महाराज....👌🏻👌🏻👌🏻👌🏻 राम कृष्ण हरी.🙏
@shivajisarode1216
@shivajisarode1216 3 года назад
जय हरी माऊली💐💐🙏🙏 माझा आवडी चा अंभग
@God-Adi07
@God-Adi07 6 месяцев назад
राम कृष्ण हरी महाराज किती वेळा ऐकले तरी एकावेसे वाटते 👍🙏🙏.
@sambhajishinde303
@sambhajishinde303 2 года назад
अप्रतिम
@yogeshraut9969
@yogeshraut9969 2 года назад
स्तुती काय करावी शब्दच नाही गुरुदेवा जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhausahebbhuse978
@bhausahebbhuse978 Год назад
देखनेवाले को देखणा ही ध्यान है ll आखोसे कौन झाक रहा है l कानो से कौन सून रहा है l पैरोसे कौन चल रहा है l आंख नहीं देख रही आखो से कोई ओर ही देख रहा है l कान नहीं सून रहे कान से कोई ओर ही सून रहा है l त्वचा नहीं स्पर्श कर रही है त्वचा से कोई ओर स्पर्श का अनुभब कर रहा है इन सबके जो पार है उसे जानना ही जीवन का लक्ष है ll धन्यवाद
@yogeshbagul-mn6iu
@yogeshbagul-mn6iu Год назад
खुप सुंदर आवाज आणि परत परत ऐकावेसे वाटते जय हरी माउली
@rameshwarsuslade875
@rameshwarsuslade875 4 месяца назад
राम कृष्ण हरी आपल्या चरणी दंडवत प्रणाम महाराज
@madhavwadare3087
@madhavwadare3087 Год назад
अतिशय सुंदर सादरीकरण
@sudarshanmahajan6646
@sudarshanmahajan6646 3 года назад
महाराजांची भजनाच्या चाली खुपच सुंदर असतात .
@pandurangkurade2485
@pandurangkurade2485 Год назад
अतिशय सुंदर अशी चाल लावून गायला ऐकतच बसावं अशी चाली असतात महाराज 🙏🙏🙏🙏
@mahadevsonwane5607
@mahadevsonwane5607 Год назад
राम कृष्ण हरी माऊली ऐसा आवाज कोणी नाही
@sudhirhashilkar1927
@sudhirhashilkar1927 6 месяцев назад
,🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 2 года назад
राम कृष्ण हरी दादा शुभ सकाळ.... 🙏🙏
@santoshlakhan3872
@santoshlakhan3872 11 месяцев назад
जय हरी माऊली
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 3 года назад
दादा ! अत्यंत गोड चालीत भावपूर्ण आणि आपल्या हृदयाची तळमळ आमच्या हृदयापर्यंत पोहचून स्थिरावली !
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 года назад
चरणस्पर्श गुरुजी...🙏🙏
@sopansule1873
@sopansule1873 3 года назад
अप्रतिम दादा जी
@sachinbaravakar1148
@sachinbaravakar1148 2 года назад
प्रणाम बाबा काय स्वर काय आवाज आणि काय ती टाळकर्यांची साथ बोलायला शब्द च नाही आणि पखवाज कदम बाबा असल्यावर बोलायला च नको
Далее