Тёмный

प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan) 

S FOR SATISH
Подписаться 372 тыс.
Просмотров 570 тыс.
50% 1

प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan) आम्ही प्रांजू प्रदनुला घेऊन मामाच्या गावी गेलो होतो. प्रदनु प्रांजुच्या मामाचे गाव साखरी आहे, हे गाव मंडणगड तालुक्यातील आहे. आम्ही मुंबईवरून जेव्हा पण गावी जातो तेव्हा एक दिवस वस्तीला साखरीला जातोच जातो. यावेळेस आमच्या आंबवली वरून साखरी जाण्यासाठी गाडी न मिळाल्यामुळे आम्ही साखरीला चालत गेलो. प्रदनु आणि प्रांजू जाम खुश होते. प्रदनु निसर्गाचा आनंद घेत होता. सासुरवाडीला गेलो की मामी जावयासाठी आणि पोरीसाठी जाम भारी पाहुणचार करतात. कोकणी पद्धतीचा पाहुणचार गावी गेलो की असतो. कधी चिकन तर कधी मच्छी असा मांसाहारी जेवणाचा बेत असतो. वर्षा माहेरी गेली तेव्हा तिची बहीण सुद्धा आली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून रात्रीचे जेवण बनवले. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा सोबत कोंबडी वडे बनवले होते. कोंबडी वड्यांचा बेत जाम भारी झाला होता. रात्री आम्ही सगळेजण एकत्र पंगतीने जेवायला बसलो. गावचं चुलीवरचं जेवण खूपच छान झालं होतं. आम्ही आमच्या गावातील नातेवाईकांकडे गेलो त्यांना भेटुन आलो. साखरी गाव अतिशय सुंदर असं गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव पावसाळ्यात खूपच छान दिसतं. आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा आमच्या आंबवली गावी आलो. #MamacheGavSakhari #ChickenSukka #ChickenRassa #sforsatish
तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रदनु प्रांजूचे मामाचे गाव दाखवले आहे. माझ्या सासरोडी जाऊन बायकोने म्हणजे वर्षाने बनवलेले जेवण चिकन सुक्का आणि चिकन रस्सा दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्या लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
www.imstagram.com/koknatlamum...

Опубликовано:

 

14 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 705   
@samikshakadam3423
@samikshakadam3423 3 года назад
hii दादा....मी समीक्षा कदम. तु खुप ग्रेट आहेस दादा..तुझं तुझ्या मुलान वरच प्रेम बायको वरचं प्रेम.खरंच तुझा आदर्श घ्यावा.नेहमी हसरा चेहरा असतो तुझा.Always happy राहा.
@pravinjathore8485
@pravinjathore8485 3 года назад
मला कोकणातली माणसे तिथलं वातावरण खूप आवडतं. तुझा व्हिडिओ सतत पहावासा वाटतो. तुझ्या बोलण्यामध्ये मायाळूपणा, शांत स्वभाव. खूप चांगला वाटतो.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️
@vaibhavishinde27
@vaibhavishinde27 2 года назад
Really
@arnavbhilare1745
@arnavbhilare1745 3 года назад
कोकणा सारख स्वर्ग सुख कुठे नाही. तुम्ही खूप लकी आहात.
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
सतीश भाऊ आणि आई यास अभिवादन...!!🙏🙏 ❤️सदर चित्रफिती चे वैशिष्ट्य म्हणजे आईने तथा आजीने प्रदनू तथा पदुडिला साखरी ला जतेवेळी मायेने खांद्यावर बसवून घरापासून रस्त्यापर्यंत सोडायला आली तो क्षण म्हणजे हृदयस्पर्शी आणि आठवणीतला . त्यामुळेच सदर चित्रफीत संस्मरणीय झाली.👍✌️🎥✌️ ❤️कोंबडी वडे ❤️ चाफा , केळी ❤️कोको ❤️ कालवे ❤️नारळाचे पाणी सारे काही अद्भुत असते जेव्हा की ज्यावेळी सदर बाबतीत सतीश भाऊ विवेचन करतात . असो.. 👍मातीचा सुगंध आणि वाऱ्याची मंजुळ शीळ अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात एस फोर सतीश या चॅनेल चे चित्रफिती चे आगमन होते त्यावेळी सारा यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर फक्त आणि फक्त आंबवली गावातील निसर्ग सौंदर्य अक्षरशः खुलून येते असेच म्हणावे लागते. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास जादुई जगत विख्यात सुप्रसिद्ध शेन वॉर्न यांची गुगली आणि प्रतिस्पर्धी संघ अवाक झाल्यासारखा. ....आणि इथे पनवेल उसारली सुप्रसिद्ध चित्रफीत कार सतीश भाऊंची अनोखी 👍❤️🎥✌️🎥 दर्जेदार चित्रफीत मोठ्या दिमाखात प्रदर्शित आणि यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर स्तब्धता निरव शांतता....सर्वजण अजरामर कलाकृती पाहण्यात मग्न मंत्रमुग्ध झाले...असो. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
साहेब, तुमच्या प्रतिक्रियेतून ऊर्जा मिळते
@tosushil
@tosushil 3 года назад
Khoop yogya aani madta varnan kele tumhi, dhanyavad👌🔥
@kharkande
@kharkande 3 года назад
कोकणातील ग्रामीण जीवन कसे असते याची परिपूर्ण माहिती आपल्या व्हिडीओ मधून पाहायला मिळते. या साठी सतीशभाऊंना खूप धन्यवाद. ग्रामीण भागातील रस्ते, घरे, शाळा, वाहतूक व्यवस्था, शेती, निसर्ग, आहार, पाहुणचार, संस्कृती या सगळ्या गोष्टी विलक्षण आहेत. कौतुकास्पद आहेत. कोकण ग्रेट.
@abcdefgh9380
@abcdefgh9380 3 года назад
Khupach chan gavacha najara pahun char pn chhan jhala
@savitapatil2202
@savitapatil2202 3 года назад
जय सदगुरू आम्ही पण बैठकीला जातो आता सगळ्या मैत्रिणीना आणि श्रवण खूप मिस करतोय
@sunilsalvi1339
@sunilsalvi1339 3 года назад
खेड्यातले जीवन हा एक ठेवा आहे, जपून ठेवा हा वारसा!
@sarahchordker8180
@sarahchordker8180 3 года назад
Khup chaaan 👌👌👌👌👌
@sanjanagurav4569
@sanjanagurav4569 3 года назад
वाहिनीचे माहेर खूप छान आहे,वहिनीच्या घरातली माणसे खूप मन मिळाऊ आहेत आणि मस्त पाहुणचार केला जावईचा👍👍
@ashishkadam6877
@ashishkadam6877 3 года назад
जावयाला लेग पिस 😀 सतीश मज्जा आहे तुझी. आम्हाला काही कारणामुळे गावी शिमग्याला जाता आले नाही पण सतीश तुझ्यामुळे आम्हाला गावचे शिमगा नी बाकी गोष्टींचे दर्शन दिले , खूप आनंद झाला आणि खूप बरे वाटले त्याच्याबद्दल तुला माझ्याकडुन मानाचा मुजरा 🙏❤️.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️❤️🙏😊
@sanikakupte217
@sanikakupte217 3 года назад
गावचे जीवन किती शांत निवांत. आता शहरातले पण शांत झाले कोरोनामुळे. पण गावच्या सारखा निसर्ग नाही. वर्षाचे माहेर व माहेरची माणसे खूप छान.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😊❤️❤️
@deepalolayekar6735
@deepalolayekar6735 3 года назад
खूप छान तुझे video असतात. तू तुझ्या कुटुंबाची ज्या पद्धतीने काळजी घेतोस ते खूप मनाला भावते. कष्टाळू आहेस. आईला नेहमीच जप. तुझी पिल्ले खूप गोंडस आहे. आणि धर्मपत्नी लाघवी.
@sachinchavan8447
@sachinchavan8447 2 года назад
मित्रा तू कोकण दर्शन चांगलं उत्तमात उत्तम रित्या घडवून देतो त्याबद्दल तुझे जेवढे मानावे तितके आभार कमीच आहे ह्या तुझ्या कार्याला मनापासून मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@krantipatil1962
@krantipatil1962 3 года назад
खुपच सुंदर व्हीडीओ कोकण बघायची मजा येते अस वाटत मी स्वतः च प्रत्यक्ष कोकणात आली आहे आहे खुपसुंदर गांव तेथील घरे मस्त घरे असेच छान छान व्हीडीओ पाठवत जा भाऊ जय सदगुरू🙏🙏🙏
@sumitkamble6381
@sumitkamble6381 2 года назад
शेवटी कोकणा त ली माणस सादी भोली शेवटी कोकण आपल स करतों ❤️👍
@pradnyeshkalamkar978
@pradnyeshkalamkar978 3 года назад
आजी आणि नातवंडांच नात लयच भारी असत😍❤️✨💯
@rohinimatange7858
@rohinimatange7858 3 года назад
माहेरी येताना पाठीवर ओझे व तरीही सपाट्याने चालणे याला म्हणतात माहेरची ओढ
@viveksamarth5739
@viveksamarth5739 3 года назад
Chan tich tr asti mulina maheri aaychi oodh great
@priyankagavandhe1725
@priyankagavandhe1725 3 года назад
खुप छान आहे ताईचं माहेर आजीचं प्रेम बघुन डोळ्यात पाणी आलं
@ramdalvi7706
@ramdalvi7706 3 года назад
तुझं हे सगळं बघून डोळ्यातून पाणी आलं
@vishaljagdale1733
@vishaljagdale1733 3 года назад
खूप छान व्हिडिओ.... पायी प्रवास भारी वाटला....very down to earth personality keep it up....खूप छान पाहुणचार केला....गावच्या व्हिडिओ खूप भारी वाटतात गावी न जाता आम्हाला गावची फिलिंग देता... धन्यवाद 🙏
@ketanmore9136
@ketanmore9136 2 месяца назад
खुप दिवसांनी ही जुनी व्हिडीओ पाहिली वहिनीच्या आज्जी ला परत पाहून खूप बर वाटलं किती गोड असतात जुनी माणसं
@kunalshirke4149
@kunalshirke4149 3 года назад
एक नंबर व्हलोग, साधेपणा खुप भावतो, अजिबात सोडू नकोस, खूप छान
@gajanantotre9969
@gajanantotre9969 3 года назад
अतिशय सुंदर असा विडिओ गावचा साधेपणा आणि निसर्ग सौंदर्य खुलून दिसते खुप छान
@smitanaik5465
@smitanaik5465 3 года назад
खूप छान सासुरवाडी पाहुणचार...
@pravinwanivadekar7326
@pravinwanivadekar7326 3 года назад
दादा मस्त वाटला व्हिडिओ वहिनी माहेरी आल्यावर खुप खुश दिसते हे सर्व आपल्या कोकणातच पाहायला मिळत
@sangeetanaik1056
@sangeetanaik1056 3 года назад
छान छान बाळा जय सदगुरू मस्त आवडलं सासुरवाडी चार पाऊचार सर्मथा़च दर्शन मीळाल🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏
@ajitkalekar1550
@ajitkalekar1550 3 года назад
पाहुणचार लाजवाब होता वहिणी.
@krantipatil1962
@krantipatil1962 3 года назад
सदगुरुं चे अधीष्ठाण पाहुन खुप आनंद वाटला🙏🙏
@amitkolhevloge4344
@amitkolhevloge4344 3 года назад
Khup ch bhari ahe dada vedio mala khup aavdato aani gavala mhanje kokan tr lay bhari pan amcha nagpur pasun khup jast lamb ahe kokan.... I like kokan❤❤❤😍
@hemant84patere99
@hemant84patere99 3 года назад
आज मामाची आठवण आली दादा खूप सुंदर 👌👌💫💫🌹🌹
@fatimairfan4527
@fatimairfan4527 3 года назад
Wah paidal aik gaon say dousrey gaon, bohot himmat ki bat hay Masha Allah.
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
तुझे व्हिडिओ बघताना एक प्रकारचा आपलेपणा वाटतो. आम्ही पण तुमच्या कुटुंबातला एक घटक असल्यासारखे वाटते. आज मी हा व्हिडिओ सलग दोन वेळा पहिला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️😊
@dnyanudhone7634
@dnyanudhone7634 3 года назад
खूपच छान अशीच माणूसकी जपली पाहिजे ❤️
@santoshnachanekar4931
@santoshnachanekar4931 3 года назад
खरच खूपच छान गावचा नजराणा कोकणची शान आहे. आणि आपला भाऊ दादा मजेदार video तयार करताना आपण सर्वजण पाहत आहात सर्वानी like करा. 👌🙏अभिनंदन दादा 🙏💐💐👌👏👏👏👏
@narendrabelose3710
@narendrabelose3710 2 года назад
खूप छान मित्रा
@prasadchavan2033
@prasadchavan2033 3 года назад
Ek no. ahe rav
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 3 года назад
तुम्ही सर्व नशीबवान आहात तुमचे नातेवाईक खूप निरपेक्ष प्रेम करतात पैसा देऊन असे प्रेम मिळणार नाही
@snehaindulkar7158
@snehaindulkar7158 3 года назад
Khub छान वाटले . सासर v Maher पाहून बाकी काही बोलायला शब्द नाही.nice gavatali lok v त्याच पाहुणचार.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 года назад
छान सतिष बघुन खुप बर वाटल आमचा पण मुक्काम ऱ्झालया सारखं वाटल गांवचे सगळे किती प्रेमाने जेवण करतात मस्त
@mahendrakirpan76
@mahendrakirpan76 3 года назад
मस्त सर्व बैठकीला जातायत वाटतंय जय सद्गुरू🙏🙏
@kalpanabhosale1294
@kalpanabhosale1294 3 года назад
Kiti sundar sasarvadi premal manse tuzha gaav pan khup chhan aahe Satish Samarthancha Adhishthan pan aahe mast darshan zhale... Jay Sadguru🙏🌹 ashi sundar premal family baghun khupach aanand zhala asech hasat raha khush raha.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Khup khup chaan video dada Vahini khup premal Sarva Jana Ashi Mansa bhettat nahi khup durmil bhaghayela miltat aani jevaan ek no. Jai sadguru
@siddheshdhadve235
@siddheshdhadve235 3 года назад
aaji la pahun khup bar vatl mhatari mans hi gavchi khari sampatti aahe 😘🧡🧡
@nitindhurat8322
@nitindhurat8322 2 года назад
Kup chaan
@shwetadukhande6160
@shwetadukhande6160 3 года назад
खूपच छान गावाकडचे जीवन 👌👌
@kailaskurkute7305
@kailaskurkute7305 Год назад
तुमचे व्हिडिओ पाहील्यावर कोकणात फेरफटका मारल्या सारखे वाटते 👌👌
@prakashnaik837
@prakashnaik837 3 года назад
Mast aahe pahunchar sasurwadi chaa
@swarangijogle2175
@swarangijogle2175 2 года назад
Khupach chhan
@ashashirodkar3235
@ashashirodkar3235 3 года назад
खुप छान गाव मस्तच व्हिडीओ👍👌👌
@kiranbhojane7329
@kiranbhojane7329 2 года назад
गावातील घरं खुप सुंदर आहेत 🥰🥰🥰🥰🥰
@kalpnakurhade3386
@kalpnakurhade3386 Год назад
सतिश भाऊ तुमची सासुरवाडी खूप छान आहे
@TheJayawant
@TheJayawant 3 года назад
खूप छान video सतीश भाऊ. असेच आनंदी राहा!
@nareshkirve
@nareshkirve 3 года назад
Mast gavi khup maza kartoys 👍👍👌👌👌
@sidharthparab9170
@sidharthparab9170 3 года назад
खूप छान सासर आणि माणसं, अप्रतिम विडिओ होत.
@ambarjain1923
@ambarjain1923 3 года назад
Traditional village houses. Traditional food.Traditional lifestyle. Wonderful presentation. City life se ekdam hatke. Ekdam jhakaas video.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏😊
@swatinaik8774
@swatinaik8774 3 года назад
जय सद्गुरु 🙏 श्री राम समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
@viveksamarth5739
@viveksamarth5739 3 года назад
Jay Jay raghvir samarth
@siyamore2159
@siyamore2159 3 года назад
Lai bhari dada.sasar cha pahunchar
@apekshahaldankar3239
@apekshahaldankar3239 3 года назад
Khup chan,yet natural....just feel at gavchi wonderful natural life, thanks for beautiful experience .....👍🙏😊🌹💞🕉️🐿️
@ashwinikadam
@ashwinikadam 3 года назад
Khupchhhhh mst video bghun chan vatle Keep it up 👍🏻
@kamleshshinde238
@kamleshshinde238 3 года назад
लय भारी विडिओ♥️♥️ वहिनीचा माहेरी जाताना उत्साह भारी होता..पाहुणचार खूप छान केला........
@rajeshkulecommentator3537
@rajeshkulecommentator3537 3 года назад
खुप सुंदर video. आम्हाला देखील आमचे जुने दिवस आठवले.. मन भरून आले पहिल्यानंतर. खूप मस्त. जी आपली संस्कृती आपल्या परंपरा आणि नातीगोती, पाहुणचार. Hats of. Really nice 👌👌👌👌.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏 कोकणातील जुने दिवस
@FOODandMOREbySurekha
@FOODandMOREbySurekha 3 года назад
दादा लय भारी विडिओ♥️♥️ वहिनीचा माहेरी जाताना उत्साह भारी होता..पाहुणचार खूप छान केला. तुझे विडिओ पाहायला खूप छान वाटत👌👌🏡🏡
@yaminiborkar5993
@yaminiborkar5993 2 года назад
विडिओ खूप छान!
@DS-kl7fiswara
@DS-kl7fiswara 3 года назад
Tu khup chan boltoas pradnu and pranju premane haak martoas bharich ekdum. Plus 🥰pradnu khupach cute golu...
@deepaknale1764
@deepaknale1764 3 года назад
सतीश सर खूप छान आहे तुमचं गाव
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 года назад
मस्त परत पाहीला व्हिडिओ किती प्रेमाने आदरातिथ्य करतात बर वाटल मिसेस दिक्षीत
@veenawaikar5008
@veenawaikar5008 3 года назад
Mastach. Gavavhe jeevan ekdam mast.
@prajaktapatil7202
@prajaktapatil7202 2 года назад
Ek no bro
@mayurshelar6745
@mayurshelar6745 3 года назад
Khup chan bhava👍👍👍👌👌👌♥️⛳🌴
@vidhyarasoi4368
@vidhyarasoi4368 3 года назад
कोंबडी वडे मस्त 👍🎉
@dilipbhide7089
@dilipbhide7089 3 года назад
मी सबस्रायबर आहे.मूळचा गोव्यातील.vlog आवडतात याचे कारण साधेपणा,आणिक बारिकसारिक बाबीतून तुम्चे कुटुंब enjoy करतात..ही बाब.Keep it up pl.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️
@vaishalipatil5425
@vaishalipatil5425 3 года назад
सहसा गावातील घरे दूरदूर असतात इथे फारच जवळ जवळ आहेत
@ajayswami9775
@ajayswami9775 3 года назад
प्रांजु प्रध्नु खुप गोड आहेत. दादा आपला परिवारच गोड आहे.😍😍 गाव म्हटल की आपल मन त्या मातीत रमत
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you 🙏❤️
@rupaliphulore4873
@rupaliphulore4873 3 года назад
खूप छान...👌👌👌
@siddharthjadav6870
@siddharthjadav6870 2 года назад
Brother, it is very nice to see your simplicity... Good father, good son, good husband, good brother.... And taking family with you...because of this I am a big fan of yours...and especially your wife who supports you like your pitch shadow...Your mother also works hard and salutes her...and your children are also very cute...and I pray you and your family are always happy...And keep making beautiful vlogs like this and keep making everyone see Konkan.🙏❤😊👍
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you so much, ❤️❤️☺️🙏
@madukarlandge1611
@madukarlandge1611 2 года назад
खूप सुंदर भाऊ छान वाटले खूप जुन्या आठवणी जाग्या झालात 🙏🙏
@neetasalunke2232
@neetasalunke2232 3 года назад
साखरी गाव खूप छान आहे👌👌चालत गावाला जाण्यात जी मजा आहे ती शब्दात सांगण कठीण.. वर्षा वहिनींची बहीण आई आजी सर्वजण साधी भोळी माणसं..खूप प्रेमळ..पाहुणचार एक नंबर👍👍video एकदम भारी👌👌पुन्हा पुन्हा पहावा असा...प्रांजू प्रद्नु मस्त निसर्गाचा आनंद घेतात..चिकन सुका ,रस्सा वडे लय भारी😋
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@viraldurgoli4934
@viraldurgoli4934 3 года назад
Konti sakhri
@swissgear8103
@swissgear8103 3 года назад
Tu khup सच्चा माणूस आहेस दादा....
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@shekharkangude685
@shekharkangude685 3 года назад
दोन्ही गाव सुंदरच सासुरवाडीचा पाहुणचार मस्त.
@prathameshnimbare7939
@prathameshnimbare7939 3 года назад
खूप छान आणि सुंदर,🥰👌👌👌👌👌👌
@pravin1122
@pravin1122 3 года назад
दादा, खूपच सुंदर व छान निसर्गसौंदर्याने नटलेल गाव आहे. बरंच लांब चालत यावं लागलं. गावाकडे चालण्याची मजाच वेगळी असते.
@NKsEntertainment
@NKsEntertainment 3 года назад
वा! मस्त 👍
@pratikshapadgham7871
@pratikshapadgham7871 2 года назад
तुमचे कोकण चे निसर्ग आणि रेसिपिज् खूप छान असतात ,साधें आणि सिम्पल् बोली भाषा खुप् छान
@anilmohite5658
@anilmohite5658 2 года назад
विडीओ बघताना आमच्या गावची आठवण येते गावी गेल्याचा फिल येतो खूपछान असेच विडीओ पाठवत राहा👌👍
@pritikarande6976
@pritikarande6976 3 года назад
Khup chan bare vatal kautabik vatavaran😍👌👌
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 года назад
खूप खूप छान व्हिडीयो मस्तच गावाला जे सूख आहे ना ते कुठेच नाही छान
@vikramjanugade9332
@vikramjanugade9332 3 года назад
अतिशय सुंदर असा व्हिडिओ.. छान गाव आणि गावाकडील लोक..☺️
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 года назад
Khup Chhan aahe Vahininche gav aani javalach dongar suddha aahe mastach...👌👍
@sachingavali184
@sachingavali184 3 года назад
खूप खूप भारी दादा ..🌞🌙🌚⚡🔥💧🌹🌼🍀☘🍁😍😘😊💘💴📙🙏🙏🍁🍁
@jaimatadi2691
@jaimatadi2691 3 года назад
Khup Chan aahe ghar👍👍👍
@amitmodak5246
@amitmodak5246 2 года назад
Satish Bhava Tuze Sare Video Eka Peksha Ek...Exdam Bhari... Lay Bhari...Best amongst greatest
@mimumbaikar45
@mimumbaikar45 3 года назад
Sweet vlog. . Mastach. Kokan chi manase sadhi bholi aani premal.
@mayabandal4196
@mayabandal4196 3 года назад
दादा गावाचे लोक खरच खूप छान व पे्मळ आहे आजी खूप छान दिसतात व ताई खूप खुश होत्या माहेरी जायचे म्हणून पाहुणचार अप्रतिम व हे गावाकडचे करू शकणार शहरातील नाही सासुरवाडी मस्तच व बहिणीने लगेच अबोली गजरा ताईंना दिला हे पे्म महत्वाचे व मुलांना खूप छान वळण दादा तुमच्या सारखे च पाया पडले सगळ्यांच्या खलाशी खूप खूप रमला आहे गावाला व मुंबईत येण्याची घाई करू नका परिस्थिती खूप वाईट आहे लॉगडाऊन आहे तिथेच रहा निदान मुलांन व ताईंना तरी अजिबात आणू नका निसर्ग सौंदर्य सुंदर 👆🙏😊
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️😊
@rahullokhande1635
@rahullokhande1635 3 года назад
Bhari pahunchar zalay!
@pankajubale9047
@pankajubale9047 3 года назад
बापरे...किती प्रेमळ लोक आहेत
@paragpatil3932
@paragpatil3932 3 года назад
खुप सुंदर छान व्हिडिओ आहे
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 3 года назад
खुप सुंदर अप्रतिम आहे तुमचं कुटुंब आणि गाव
@anitatalekar1707
@anitatalekar1707 3 года назад
Khup cha chan video ahe👌
@rajendrakasar9408
@rajendrakasar9408 3 года назад
जावयला लेग पिस वाह भाई वाह
@nitindhalpe809
@nitindhalpe809 3 года назад
Mast Satish bhau.. Chan gavachi safar👌👌👍👍
Далее
Косплей на ГОЛОВОЛОМКА 2!
15:20
Просмотров 562 тыс.